विनायक चतुर्थीच्या दिवशी करा ‘या’ वस्तूंचे दान, घरात राहील आनंदी वातावरण

हिंदू धर्मात गणपतीला विघ्नविनाशक मानले जाते. कारण गणपतीची मनोभावे पूजा केल्याने आपल्यावर आलेले संकट दूर होतात आणि जीवनात यश मिळते. याशिवाय बुद्धिमत्तेत वाढ होऊन ज्ञानप्राप्ती होते.

विनायक चतुर्थीच्या दिवशी करा 'या' वस्तूंचे दान, घरात राहील आनंदी वातावरण
Follow us
| Updated on: Dec 04, 2024 | 5:30 PM

आपल्या हिंदू धर्मात श्री गणेशाला अग्रपूजेचा मान आहे. आपल्यामध्ये प्रत्येक शुभकार्याची सुरुवात गणेश पूजनानं केली जाते. गणेशपूजेशिवाय कोणताही मंत्र, जप, विधी यशस्वी होत नाही. तसेच संकष्टी चतुर्थी प्रमाणेच देखील विनायक चतुर्थी साजरी केली जाते. मार्गशीष महिन्याच्या विनायक चतुर्थीच्या दिवशी प्रथम पूज्य गणपती बाप्पाची पूजा केल्याने लोकांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि घरात सुख-शांती राहते. तसेच श्री गणेशाला प्रसन्न करण्यासाठी दानालाही विशेष महत्त्व आहे. विनायक चतुर्थीच्या दिवशी दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. दान केल्याने श्री गणेश भगवान प्रसन्न तर होतातच, शिवाय लोकांना मानसिक शांती आणि समाधानाची ही भावना मिळते. त्यामुळे विनायक चतुर्थीच्या दिवशी गरजूंना मदत करा आणि दान करा.

पंचांगानुसार मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षाची चतुर्थी तिथी 4 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 1 वाजून 10 मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी 5 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 12 वाजून 49 मिनिटांनी संपेल. उदय तिथीनुसार विनायक चतुर्थीचे व्रत गुरुवार, 5 डिसेंबर 2024 रोजी ठेवण्यात येणार आहे.

विनायक चतुर्थीला करा ‘या’ वस्तूंचे दान

  • आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे की श्री गणेशाला मोदक अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे विनायक चतुर्थीच्या दिवशी लोकांना प्रसाद म्हणून मोदकाचे वाटप करणे शुभ मानले जाते.
  • या दिवशी फळांचे दान केल्याने लोकांना आरोग्यलाभ होतो आणि घरात आनंद वातावरण राहते आणि मिठाई दान केल्याने मन प्रसन्न होते आणि नातेसंबंध गोड होतात.
  • विनायक चतुर्थीला तुम्ही जर गरिबांना कपडे दान केल्याने पुण्य मिळते. याशिवाय अन्नदान केल्याने उपाशी लोकांचे पोट भरते. त्यामुळे तुमच्या घरात अन्नाची कधीच कमतरता भासत नाही.
  • गरीब आणि गरजूंना पैसे दान नक्की करा, यामुळे लोकांची आर्थिक स्थिती मजबूत होते आणि तुम्हाला सुद्धा आयुष्यात कधीही पैशाची कमतरता भासत नाही.
  • विनायक चतुर्थीनिमित्त गरजूंना वस्त्रदान केल्याने त्यांच्या जीवनातील सर्व संकटे संपतात. व त्यांचा आशीर्वाद तुम्हाला मिळतो.

दान करताना या गोष्टी लक्षात ठेवा

  • दान करताना मनात कोणत्याही प्रकारची अपेक्षा ठेवू नये.
  • गरजू लोकांना नेहमीच दान करावे.
  • हसतखेळत दान केल्याने दानाचे पुण्य अनेक पटींनी वाढते.
  • दान करताना ‘ॐ गण गणपतये नम:’ या मंत्राचा जप करावा. या मंत्राचा जप केल्याने तुम्हाला दानाचे अधिक फळ मिळते.

दान करण्याचे हे आहेत फायदे

  • विनायक चतुर्थीच्या दिवशी दान केल्याने श्रीगणेश भगवान प्रसन्न होतात आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.
  • दान केल्याने घरात सुख-शांतीचा वास राहतो आणि नकारात्मक ऊर्जा निघुन जाते
  • दान केल्याने आर्थिक स्थिती मजबूत होते आणि संपत्तीत वाढ होते.
  • दान केल्याने आरोग्यलाभ होतो आणि कोणतेही आजार बरे होतात.
  • दान केल्याने पुण्य प्राप्त होते आणि मोक्ष प्राप्त होतो.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

‘शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद द्या, नाहीतर...’,पोलीस कर्मचाऱ्याचा इशारा
‘शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद द्या, नाहीतर...’,पोलीस कर्मचाऱ्याचा इशारा.
'... मी तर शपथ घेणार, थांबणार नाही', दादांच्या वक्तव्यानंतर सगळेच हसले
'... मी तर शपथ घेणार, थांबणार नाही', दादांच्या वक्तव्यानंतर सगळेच हसले.
'फडणवीसांनी माझं नाव सुचवलं, आता मी...', शिंदेंनी सांगितला तो किस्सा
'फडणवीसांनी माझं नाव सुचवलं, आता मी...', शिंदेंनी सांगितला तो किस्सा.
शिंदे DCM पद स्वीकारणार? मंत्रिमंडळात असणार की नाही? फडणवीस म्हणाले..
शिंदे DCM पद स्वीकारणार? मंत्रिमंडळात असणार की नाही? फडणवीस म्हणाले...
महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा
महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा.
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या...
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या....
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट.
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण.
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्...
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्....
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता.