Masik Shivratri 2021 | चैत्र मासिक शिवरात्री, जाणून घ्या पूजेची तिथी, मुहूर्त आणि महत्त्व…

| Updated on: Apr 09, 2021 | 2:50 PM

हिंदू पंचांगानुसार कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला मासिक शिवरात्री (Masik Shivratri) साजरी केली जाते. यावेळी मासिक शिवरात्री 10 एप्रिलला आहे. या दिवशी भगवान शिवची पूजा केली जाते.

Masik Shivratri  2021 | चैत्र मासिक शिवरात्री, जाणून घ्या पूजेची तिथी, मुहूर्त आणि महत्त्व...
shiv and parvati
Follow us on

मुंबई : हिंदू पंचांगानुसार कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला मासिक शिवरात्री (Masik Shivratri) साजरी केली जाते. यावेळी मासिक शिवरात्री 10 एप्रिलला आहे. या दिवशी भगवान शिवची पूजा केली जाते. मान्यता आहे की, देवी-देवातांमध्ये सर्वात लवकर भगवान शिव प्रसन्न होतात. जो कोणी त्यांची मनोभावे त्यांची पूजा-अर्चना करतात त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. चला जाणून घेऊया मासिक शिवरात्रीचा शुभ मुहूर्त आणि पूजा विधीबाबत (Masik Shivratri 2021 Know The Shubh Muhurat And Importance)-

चैत्र मासिक शिवरात्री पूजा मुहूर्त

ही शिवरात्री चैत्र महिन्यात येते त्यामुळे याला चैत्र मासिक शिवरात्रीही म्हटलं जातं. चैत्र चतुर्दशी आरंभ – 10 एप्रिल 2021 शनिवारच्या सकाळी 4 वाजून 27 मिनिटांपासून ते 11 एप्रिल 2021 रविवारी सकाळी 06 वाजून 03 मिनिटांपर्यंत असेल. शिवरात्रीची पूजा रात्रीच्यावेळी केली जाते, त्यामुळे मासिक शिवरात्री 10 एप्रिलला येत आहे. या दिवशी भाविक महादेवाची आरधना करतात. तर काही लोक त्यांना प्रसन्न करण्यासाठी बेलपत्र, भांग, धतुरा, चंदन, फूल, दूध आणि मध अर्पण करतात.

मासिक शिवरात्रीचं महत्व

हिंदू धर्मात शिवरात्रीचं विशेष महत्त्व आहे. पौराणिक मान्यतेनुसार, या दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वती एकत्र आले होते. त्यामुळे या दिवशी पूजा-पाठ केल्याने भगवान शिव अत्यंत प्रसन्न होतात आणि त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. हा व्रत केल्याने विवाहात येणाऱ्या समस्यांमधून मुक्ती मिळते. भोलेनाथच्या आशीर्वादाने तुमचं दाम्पत्य जीवनही आनंदमय राहाते.

मासिक शिवरात्रीची पूजा विधी

1. मासिक शिवरात्रीच्या पूजेची तयारी त्रयोदशीपासून सुरु होऊन जाते. या दिवशी प्रदोष काळात भगवान शिवची पूजा आणि मासिक शिवरात्री करण्याचा संकल्प घ्या.

2. चतुर्दशीच्या दिवशी सकाळी उठून स्नान करा आणि शंकराला बेलपत्र, भांग, धतुरा, आकची पानं, दूध आणि गंगाजलचा अभिषेक करावा.

3. या दिवशी शिव पुराण आणि महामृत्युंजय मंत्राचा जप करणे अत्यंत शुभ असते. या दिवशी भक्त निराधर व्रत ठेवतात.

Masik Shivratri 2021 Know The Shubh Muhurat And Importance

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Pradosh Vrat 2021 | चंद्राने क्षय रोगातून मुक्तीसाठी पहिल्यांदा केलं होतं प्रदोष व्रत, जाणून घ्या पौराणिक कथा…

Lord Vishnu | भगवान विष्णूंना प्रसन्न करायचं असेल, तर गुरुवारी ‘या’ मंत्रांचा जप करा…