Chaitra Navratri : नवरात्रीच्या सातव्या दिवशी करा माता कालरात्रीची आराधना, अकाल मृत्यूचे भय होईल दूर
ज्योतिषशास्त्रीय मान्यतेनुसार कालरात्री देवी शनि ग्रहावर नियंत्रण ठेवते म्हणजेच तिची पूजा केल्याने शनीचे अशुभ प्रभाव दूर होतात.
मुंबई : नवरात्रीच्या सातव्या दिवशी दुर्गा देवीची (Durga Devi) सातवी शक्ती कालरात्री देवीची पूजा करण्यात येते. माता कालरात्रीला (Mata Kalratri) यंत्र, मंत्र आणि तंत्राची देवी म्हणूनही ओळखले जाते. ज्योतिषशास्त्रीय मान्यतेनुसार कालरात्री देवी शनि ग्रहावर नियंत्रण ठेवते म्हणजेच तिची पूजा केल्याने शनीचे अशुभ प्रभाव दूर होतात. दुर्गापूजेच्या दिवशी साधकाचे मन ‘सहस्त्रर चक्र’ मध्ये वसलेले असते. विश्वातील सर्व सिद्धींचे दरवाजे त्याच्यासाठी उघडू लागतात. या चक्रात स्थित साधकाचे मन माता कालरात्रीच्या रूपात पूर्णपणे स्थिर राहते. ही शुभंकारी देवी आहे, तिची पूजा केल्याचे शुभ परिणाम प्राप्त होतात.
देवीचे स्वरूप
पुराणानुसार, रक्तबीज राक्षसाचा वध करण्यासाठी दुर्गादेवीने आपल्या तेजाने कालरात्रीची निर्मिती केली होती. त्यांची पूजा केल्याने साधक भयमुक्त होतो. देवीच्या अंगाचा रंग दाट काळोखासारखा पूर्णपणे काळा असून डोक्याचे केस विखुरलेले आहेत. गळ्यात विजेसारखी चमकणारी माळ आहे आणि तीन तीन नेत्र आहेत जे विश्वासारखे गोल आहेत. त्यांच्यातून विजेसारखे तेजस्वी किरण निघत आहे. त्यांच्या नासिकाच्या श्वासातून अग्नीच्या प्रखर ज्वाला बाहेर पडत राहतात आणि त्यांचे वाहन म्हणजे गधा. उजव्या हाताने देवी सर्वांना आशीर्वाद देत आहे. डावा हात अभय मुद्रेत आहे. वरच्या डाव्या हातात लोखंडी काटा आणि खालच्या हातात खंजीर आहे. देवी कालरात्रीचे रूप दिसायला खूप भयंकर आहे, पण ती नेहमीच शुभ फल देणारी असते. म्हणूनच तिला शुभंकारी नाव देखील आहे, त्यामुळे भक्तांनी तिच्यापासून घाबरण्याची गरज नाही.
पूजा फळ
माता कालरात्री तिच्या उपासकांचेसुद्धा काळापासून रक्षण करते म्हणजेच त्यांचा अकाली मृत्यू होत नाही. तिच्या नामाचा उच्चार केल्याने भूत,प्रेत,राक्षस आणि सर्व नकारात्मक शक्ती पळून जातात. तिच्या उपासकाला कधीही अग्नी-भय नसते, जल-भय, पशु-भय, शत्रू-भय, रात्र-भय दुर होते म्हणून आपण त्यांचे सतत स्मरण, ध्यान आणि पूजा केली पाहिजे. सर्व रोग आणि शत्रूपासून मुक्ती मिळवण्यासाठी माता कालरात्रीची उपासना फार फलदायी आहे.
पूजा पद्धत
कलशाचे पूजन केल्यानंतर मातेसमोर दिवा लावून अक्षत, फळे, फुले इत्यादींची पूजा करावी. देवीला लाल फुल खूप प्रिय आहे, म्हणून पूजेत जास्वंदाचे किंवा गुलाबाचे फूल अर्पण करावे. देवी कालीच्या ध्यान मंत्राचा जप करा, मातेला गुळ अर्पण करा आणि ब्राह्मणाला गुळ दान करा.
ध्यान मंत्र
एकवेणी जपाकर्णपूरा नग्ना खरास्थिता। लम्बोष्ठी कर्णिकाकर्णी तैलाभ्यक्त शरीरिणी॥ वामपादोल्लसल्लोह लताकण्टकभूषणा। वर्धन मूर्धध्वजा कृष्णा कालरात्रिर्भयङ्करी॥
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)