Meditation: ध्यान करण्याची योग्य पद्धत कोणती? ध्यानाचे असंख्य फायदे
मेडिटेशन किंवा ध्यान हा एक मानसिक व्यायाम आहे, ज्यामध्ये विश्रांती, एकाग्रता आणि जागरुकता यांचा समावेश होतो. ज्याप्रमाणे शारीरिक व्यायाम हा आपल्या शरिराच्या हालचालींसाठी कार्य करते.
आयुष्याच्या प्रत्येक स्थरावर स्पर्धा वाढली आहे. स्वतःच्या आयुष्यापेक्षा दुसऱ्याच्या आयुष्यात डोकावणे आता नित्याचेच झाले आहे. जीवनशैली (Stressful Life style) खानपानाच्या सवयी यामुळे दिवसभराचा तणाव कमी करण्यासाठी मेडिटेशन (Meditation) म्हणजेच ध्यान तुम्हाला आराम करण्यास मदत करते. जेव्हा आपली इंद्रिये सुस्त किंवा कंटाळवाणी होतात, तेव्हा ध्यान आपल्याला आपली जागरूकता वाढवण्याची संधी देते. संशोधनामध्ये असे सांगण्यात आले आहे की, ध्यान केल्यामुळे तात्पुरत्या स्वरूपातील तणाव दूर केला जाऊ शकतो. आरामदायी आणि सुखदायी फायद्यांमुळे, अनेक तज्ज्ञ आपल्याला निरोगी आणि सक्रिय जीवनासाठी ध्यान करण्याचा सल्ला देतात.
तुम्हाला माहिती आहे का ? की ध्यानाचे अनेक प्रकार आहेत आणि प्रत्येक प्रकार शरीराच्या वेगवेगळ्या भागांसाठी फायदेशीर असतो. अध्यात्मिक गुरू आणि मानसिक आरोग्य तज्ज्ञांनी ध्यानाचे अनेक प्रकार विकसित केले आहेत. या प्रकारांमधून दिसून येते की, ध्यान प्रत्येक व्यक्तिमत्व आणि जीवनशैलीतील लोकांसाठी अतिशय योग्य आहे आणि प्रत्येकजण याचा सराव करू शकतो.
जे लोक नियमितपणे ध्यान करतात, त्यांना सरावाद्वारे त्यांचे शारीरिक आरोग्य तसेच भावनिक आरोग्य सुधारण्याची संधी मिळते. आजच्या लेखामध्ये आम्ही ध्यानाचे काही प्रकार सांगितले आहेत. ज्यातून तुम्ही तुमच्यासाठी कोणते मेडिटेशन सर्वोत्तम आहे, त्याची निवड करू शकता.
मेडिटेशन किंवा ध्यान काय आहे ?
मेडिटेशन किंवा ध्यान हा एक मानसिक व्यायाम आहे, ज्यामध्ये विश्रांती, एकाग्रता आणि जागरुकता यांचा समावेश होतो. ज्याप्रमाणे शारीरिक व्यायाम हा आपल्या शरिराच्या हालचालींसाठी कार्य करते. अगदी, त्याचप्रमाणे ध्यान हा मनाचा आणि मेंदूचा व्यायाम आहे. हा व्यायाम सहसा वैयक्तिकरित्या शांत स्थितीत बसून आणि डोळे मिटून केला जातो.
ध्यान हा एक सराव आहे, ज्यामध्ये एखादी व्यक्ती माईंडफूलनेस सारखी पद्धत वापरून विशिष्ट वस्तू, विचार किंवा गती यावर लक्ष केंद्रित करत., जेणेकरून जागरूकता आणि एकाग्रता वाढवली जाऊ शकेल. ध्यानाचा सराव हा एखाद्या व्यक्तीला मानसिकदृष्ट्या स्पष्ट करतो आणि भावनिकदृष्ट्या शांतता आणि स्थिरता प्रदान करते.
एकत्रित मेडिटेशन करण्याचे फायदे
जेव्हां 100 लोकं एकत्रितपणे साधना करतात तेंव्हा त्यांच्या लहरी जवळजवळ ५ कि.मी. पर्यंत पसरतात आणि नकारात्मकता नष्ट करून सकारात्मकता निर्माण करतात. आइन्स्टाईनने शास्त्रीय दृष्टिकोनातुन सांगितले आहे की एका अणुचे विघटन केल्यास तो त्याच्या शेजारील अनेक अणूंचे विघटन करतो. त्यालाच आपण अणुविस्फ़ोट म्हणतो. हीच गोष्ट आपल्या ऋषी-मुनीनी आपल्याला हजारो वर्षांपूर्वी सांगितली आहे की, पृथ्वीवरील केवळ 4% लोकच ध्यान करतात, त्याचा फायदा उर्वरीत 96% लोकांना होतो. आपणसुद्धा जर 90 दिवस सलग ध्यान केले तर आपल्या कुटुंबातील इतर व्यक्तींवरील सकारात्मक परिणाम आपल्यास दिसून येईल.
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)