Mesh Sankranti 2021 | या दिवसापासून शुभ कार्यांना सुरुवात होईल, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि इतर माहिती

हिंदू धर्मात सण आणि तिथीचं खास महत्त्व असते (Mesh Sankranti 2021). ज्योतिष शास्त्रानुसार, संक्रांतीच्या दिवशी सूर्य हा एका राशीतून दिसऱ्या राशीत प्रवेश करतो.

Mesh Sankranti 2021 | या दिवसापासून शुभ कार्यांना सुरुवात होईल, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि इतर माहिती
Lord Surya
Follow us
| Updated on: Apr 07, 2021 | 11:40 AM

मुंबई : हिंदू धर्मात सण आणि तिथीचं खास महत्त्व असते (Mesh Sankranti 2021). ज्योतिष शास्त्रानुसार, संक्रांतीच्या दिवशी सूर्य हा एका राशीतून दिसऱ्या राशीत प्रवेश करतो. दर वर्षी मेष संक्रांती (Mesh Sankranti) 14 एप्रिलला येते. या दिवशी सूर्य मीन राशीतून मेष राशीमध्ये प्रवेश करतो. या सणाला उत्तर भारतातील लोक अत्यंत उत्साह आणि जल्लोषात साजरं करतात. याला सत्तू संक्रांती आणि सतुआ संक्रांती देखील म्हणतात (Mesh Sankranti 2021 Date Puja Shubh Muhurat And Importance).

शास्त्रांनुसार, या दिवशी खारमास समाप्त होतो. या दिवसानंतर विवाह, गृह प्रवेश आणि जमीन खरीदी करण्यासारख्या शुभ कार्यांची सुरुवात होते. चला जाणून घेऊ या मेष संक्रांतीबाबत काही खास माहिती –

मेष संक्रांतीचा शुभ मुहूर्त

मेष संक्रांतीचा शुभ मुहूर्त 14 एप्रिल, 2021 ला सकाळी 5 वाजून 57 मिनिटांपासून ते 12 वाजून 22 मिनिटांपर्यंत राहील

मेष संक्रांतीचं महत्त्व

हिंदू धर्मात मेष संक्रांतीचं विशेष महत्त्व असते. या दिवसी सकाळी लवकर उठून स्नान करा त्यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य द्यावं. याच दिवशी सूर्यदेवाची आरधना केल्याने सूर्य ग्रहसंबंधित दोषांतून मुक्तता मिळेल. सूर्यदेवाची आराधना केल्याने घरात धन आणि यश लाभ होतो. या दिवशी सत्यनारायण देवाची पूजा करायला हवी. त्यांना सत्तूचा भोग लावायला हवा.

देशात वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं या सणाला

मेष संक्रांतीला वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं. मेष संक्रांतीला पंजाबमध्ये वैशाख, तामिळनाडूमध्ये पुथांदु, बिहारमध्ये सतुआनी, पश्चिम बंगालमध्ये पोइला वैशाख आणि ओदिशामध्ये पना संक्रांती म्हटलं जातं.

मेष संक्रांतीच्या दिवशी दान करा

मेष संक्रांतीच्या दिवशी पवित्र नदीत स्नान करुन आणि दान-पुण्य करण्याचं विशेष महत्त्व असते. या दिवशी दान-पुण्य केल्याने सूर्यदेव प्रसन्न होतात. जर तुम्ही पवित्र नदीत स्नान करु शकत नसाल तर घरातील बादलीत गंगाजल टाकून स्नान करा. यादिवसी सत्तू खाल्ल्यानेही विशेष फळ प्राप्त होते.

Mesh Sankranti 2021 Date Puja Shubh Muhurat And Importance

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Pradosh Vrat 2021 | चंद्राने क्षय रोगातून मुक्तीसाठी पहिल्यांदा केलं होतं प्रदोष व्रत, जाणून घ्या पौराणिक कथा…

Papmochani Ekadashi 2021 | जाणून घ्या पापमोचनी एकादशी व्रताचं महत्त्व, शुभ मुहूर्त आणि कथा

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.