Vastu : घरात लक्ष्मी यंत्राची पूजा केल्यास, धनाचा वर्षाव होईल, जाणून घ्या रंजक माहिती
जगात क्वचितच अशी कोणती व्यक्ती असेल ज्याला पैशांची (Money) गरज नाही. प्रत्येक व्यक्ती जो सकाळपासून रात्रीपर्यंत कठोर परिश्रम करतो त्याची इच्छा असते की अमाप संपत्ती कमवायची आणि देवी लक्ष्मी नेहमी त्याच्यावर प्रसन्न राहावी करते.
मुंबई : जगात क्वचितच अशी कोणती व्यक्ती असेल ज्याला पैशांची (Money) गरज नाही. प्रत्येक व्यक्ती जो सकाळपासून रात्रीपर्यंत कठोर परिश्रम करतो त्याची इच्छा असते की अमाप संपत्ती कमवायची आणि देवी लक्ष्मी नेहमी त्याच्यावर प्रसन्न राहावी करते. कठोर परिश्रमाबरोबरच सौभाग्याचीही गरज असते, जी फक्त देवी लक्ष्मीच्या कृपेने मिळते.अशा परिस्थितीत देवी लक्ष्मी ज्या घरातून जाते, तेथे दुःख आणि गरिबी वाढते. यामुळेच प्रत्येकाची इच्छा असते की त्यांच्या घरात नेहमी देवी लक्ष्मी(Laxmi) निवास करो आणि पैशांचा पाऊस पडो. शास्त्रानुसार, देवी लक्ष्मीचा जन्म समुद्रमंथनाच्या वेळी झाला होता. तेव्हापासून ती भगवान विष्णूच्या सेवेत मग्न आहेत. असे म्हणतात की देवी लक्ष्मी चंचल स्वभावाची आहे, ती एका स्थानी जास्त काळ स्थिरावत नाही. पण, ज्याच्यावर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद (Blessing) असतो, त्याच्याकडे कोणत्याही प्रकारे धन-वैभवची कमतरता नसते.अशा परिस्थितीत जर तुम्हालाही देवी लक्ष्मीला प्रसन्न करायचे असेल तर त्यासाठी ज्योतिषशास्त्रात काही निश्चित उपाय सांगण्यात आले आहेत, ज्याद्वारे तुम्हाला देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होऊ शकते. चला जाणून घेऊया ते उपाय –
1. संपत्तीच्या देवीला प्रसन्न करण्यासाठी सर्वात पहिली अट म्हणजे आपले घर आणि कार्यस्थळ नेहमी स्वच्छ आणि शुद्ध ठेवा.
२. देवी लक्ष्मीची कृपा हवी असल्यास स्वयंपाकघरात कधीही घाणेरडी भांडी ठेवू नका.
3. रोज सकाळी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर तांब्याच्या कलशात पाणी घेऊन ते शिंपडा. जर घरातील स्त्रीने हा उपाय केला तर तो अधिक शुभ होतो.
4. घरात दररोज देवी लक्ष्मीची पूजा करा आणि संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला तुपाचा दिवा लावा.
5. देवी लक्ष्मीचे आशीर्वाद राहण्यासाठी चुकूनही रात्री तांदूळ, दह्याचं सेवन करु नका.
6. घरात विधीवत पद्धतीने महालक्ष्मी यंत्राची स्थापना करा आणि दररोज भक्तीभावाने त्याची पूजा करा.
7. घरातील पैशांच्या ठिकाणी किंवा पर्सला कधीही उश्ट्या हाताने स्पर्श करु नका आणि थुंकी लावून पैसे मोजू नका.
8. घराच्या पूजेच्या ठिकाणी देवी लक्ष्मीची मूर्ती किंवा चित्रासोबत शंख ठेवा. हे लक्षात घेण्यासारखे आहे की शंख समुद्र मंथनाच्या वेळी प्राप्त झालेल्या 14 मौल्यवान रत्नांपैकी एक आहे.
9. पिवळ्या कौडी या लक्ष्मीचे प्रतीक मानली जाते, म्हणून देवीची कृपा प्राप्त करण्यासाठी काही पांढऱ्या कौडींना केशर किंवा हळदीच्या द्रव्यात भिजवा आणि त्यांना लाल कपड्यात बांधून ठेवा आणि जिथे तुम्ही तुमचे पैसे ठेवता त्या ठिकाणी ठेवा. या ठिकाणी श्रीफळ म्हणजेच नारळाची पूजा करणे देखील शुभ मानले जाते.
10. श्री यंत्राची पूजा करुन आणि श्री सूक्ताचे पठण केल्याने देवी लक्ष्मीची कृपा फार लवकर प्राप्त होते.
(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)
संबंधीत बातम्या :
नारायण राणे आणि मिलिंद नार्वेकरांमध्ये ट्विटरवॉर; राणे म्हणतात मला बोलायला लावू नका!
बॉय का? मिलिंद नार्वेकरांनी उत्तर देताना थेट नारायण राणेंच्या मेमरीची घंटी वाजवली !