Mohini Ekadashi 2023 : मोहिनी एकादशीला आहे विशेष महत्त्व, या चुका अवश्य टाळा

मोहिनी हा भगवान श्री हरीचा एकमेव स्त्री अवतार आहे. म्हणूनच या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते. या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते. या दिवशी पूजा केल्याने दारिद्र्य दूर होते, अशी धार्मिक मान्यता आहे.

Mohini Ekadashi 2023 : मोहिनी एकादशीला आहे विशेष महत्त्व, या चुका अवश्य टाळा
मोहिनी एकादशीImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Apr 30, 2023 | 6:48 PM

मुंबई : हिंदू धर्मानुसार वैशाख शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला मोहिनी एकादशीचे (Mohini Ekadashi 2023) व्रत पाळण्यात येते. यावेळी मोहिनी एकादशीचे व्रत 01 मे 2023 रोजी पाळले जाणार आहे. या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते. या दिवशी पूजा केल्याने दारिद्र्य दूर होते, अशी धार्मिक मान्यता आहे. या व्रताबद्दल अशी मान्यता आहे की या दिवशी भगवान विष्णूने राक्षसांचा नाश करण्यासाठी मोहिनीचे रूप धारण केले होते. मोहिनी हा भगवान श्री हरीचा एकमेव स्त्री अवतार आहे. म्हणूनच या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते. या व्रताबद्दल पुराणात सांगितले आहे की, जेव्हा देव आणि असुर यांच्यामध्ये समुद्रमंथन झाले तेव्हा त्यातून अमृताचा कलश प्राप्त झाला.

देव आणि दानव दोघांनाही अमृत प्यायचे होते, यावरून देव आणि दानवांमध्ये अमृत मिळण्यावरून वाद झाला. हा वाद संपवण्यासाठी भगवान विष्णूंनी एका सुंदर स्त्रीचे रूप धारण केले. ज्या दिवशी भगवान विष्णूंनी मोहिनीचे रूप धारण केले, तो दिवस होता वैशाख महिन्यातील शुक्ल एकादशी. या दिवशी विष्णूजींनी मोहिनीचे रूप धारण केले होते, म्हणून हा दिवस मोहिनी एकादशी म्हणून साजरा केला जातो. या दिवशी भगवान विष्णूच्या मोहिनी रूपाची पूजा केली जाते.

हे सुद्धा वाचा

मोहिनी एकादशीचा उपाय

  • या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला गाईच्या दुधापासून बनवलेली खीर अर्पण करावी.
  • यानंतर लक्ष मातेला लाल वस्त्र आणि भगवान विष्णूला पिवळे वस्त्र अर्पण करावे.
  • संध्याकाळी तुळशीसमोर शुद्ध देशी तुपाचा दिवा लावा आणि ॐ श्री तुळस्यै विद्महे म्हणा. विष्णु प्रिये धीमही । तन्नो वृंदा प्रचोदयात् । मंत्राचा उच्चार करताना 11 परिक्रमा करा.

मोहिनी एकादशी व्रताच्या दिवशी या चुका करू नका

  1. मोहिनी एकादशी व्रताच्या संदर्भात शास्त्रात काही विशेष नियम सांगण्यात आले आहेत. असे मानले जाते की या नियमांचे पालन केल्याने व्रत यशस्वी होते आणि भगवान विष्णू प्रसन्न होतात.
  2. मोहिनी एकादशी व्रताच्या दिवशी पती-पत्नीमध्ये वाद होऊ नयेत. त्यापेक्षा घरात धार्मिक वातावरण राखले पाहिजे.
  3. एकादशी व्रताच्या दिवशी मांस किंवा मद्य सेवन करू नये. असे केल्याने देवाचा कोप होतो आणि व्यक्तीच्या जीवनात अनेक समस्या निर्माण होतात.
  4. जे व्रत करतात त्यांनी या दिवशी मन शांत ठेवावे. तसेच राग चुकूनही करू नये. चुकीचे विचार मनात येणार नाहीत याचीही विशेष काळजी घेतली पाहिजे.
  5. एकादशी व्रताच्या दिवशी लोभ किंवा खोटे बोलल्यामुळे माणसाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. म्हणूनच या सवयी किमान एकादशी व्रताच्या दिवशी तरी करू नयेत.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.