Mokshada Ekadashi 2022: ‘या’ तारखेला आहे मोक्षदा एकादशी, महत्त्व आणि पूजा विधी
मोक्षदा एकादशीचे व्रत केल्याने मृत्यूनंतर मोक्ष मिळतो अशी मान्यता आहे. हे व्रत कसे केल्या जाते याबद्दल जाणून घेऊया.
मुंबई, मोक्षदा एकादशी (Mokshada Ekadashi 2022) दरवर्षी मार्गशीष महिन्यातील तेजस्वी पंधरवड्याला साजरी केली जाते. या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते आणि उपवास केला जातो. मोक्षदा एकादशीचे व्रत करून श्रीहरीची पूजा केल्याने व्यक्तीला सौभाग्य प्राप्त होते. तसेच जो पूर्ण भक्ती आणि खऱ्या मनाने भगवान विष्णूची पूजा करतो. मृत्यूनंतर त्याला स्वर्गात स्थान मिळते. या तिथीला भगवान श्रीकृष्णाने जगाला गीतेचा उपदेश केला. म्हणूनच मोक्षदा एकादशीच्या दिवशी गीता जयंतीही साजरी केली जाते.
कधी आहे मोक्षदा एकादशी?
पंचांगानुसार, मार्गशीष मासातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी 3 डिसेंबर रोजी पहाटे 05.39 पासून सुरू होत आहे. एकादशी तिथीची समाप्ती दुसऱ्या दिवशी 4 डिसेंबर रोजी पहाटे 5.34 वाजता होईल. 3 डिसेंबर रोजी मोक्षदा एकादशीचे व्रत केले जाणार आहे. या दिवशी सूर्योदय 06.58 वाजता होईल.
महत्त्व
शास्त्रानुसार मोक्षदा एकादशीचे व्रत केल्याने मनुष्याला सौभाग्य प्राप्त होते. या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते. या दिवशी केलेल्या पूजेने माणसाला मृत्यूनंतर स्वर्ग प्राप्त होतो अशी धार्मिक मान्यता आहे. ही एकादशी माणसाला जीवन-मरणाच्या बंधनातून मुक्त करते, म्हणून या एकादशीला मोक्षदा एकादशी म्हणतात.
मोक्षदा एकादशीच्या व्रताचे नियम
मोक्षदा एकादशीचे व्रत दशमी तिथीपासून सुरू होऊन द्वादश तिथीला समाप्त होते. एकादशीच्या रात्री जागरण केले जाते आणि रात्री भगवान विष्णूचे नामस्मरण केले जाते. मोक्षदा एकादशीच्या दिवशी उपवास ठेवता येत नसेल तर या दिवशी भाताचे सेवन करू नये.
द्वादशीला व्रताचे पारण करावे. याशिवाय द्वादशी तिथीच्या दिवशी सकाळी ब्राह्मणांना भोजनदान करूनच उपवास सोडावा. जर द्वादशी तिथी सूर्योदयापूर्वी संपत असेल तर अशा स्थितीत सूर्योदयानंतर उपवास केला जातो.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)