Mokshada Ekadashi 2024 : पितरांच्या मोक्षप्राप्तीसाठी करा मोक्षदा एकादशीचे व्रत, वाचा पौराणिक कथा
पौराणिक कथेनुसार, एकदा वैखानस नावाच्या राजाने स्वप्नात पाहिले की त्याचे पूर्वज नरकात खूप यातना सहन करत आहेत. सकाळी उठल्याबरोबर त्याने आपल्या दरबारात पुजाऱ्यांना बोलावून या स्वप्नाचा अर्थ विचारला. मग पुरोहितांनी राजाला या समस्येच्या निराकरणासाठी पर्वत मुनींकडे जाण्याचा सल्ला दिला.
मुंबई : भगवान श्रीकृष्णाचा आवडता मार्गशीर्ष सुरू होणार आहे. या महिन्यात असे अनेक उपवास आणि सण आहेत, ज्यांचे हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे. यामध्ये मार्गशीर्ष महिन्यातील एकादशी व्रताचा समावेश होतो. ज्याला उत्पन्न एकादशी आणि मोक्षदा एकादशी (Mokshada Ekadashi 2023) म्हणतात. मार्गशीर्ष महिन्यात सत्यनारायणाची पूजा केल्याने पुण्य प्राप्त होते. तसेच या दोन्ही एकादशीचे व्रत केल्याने भगवान श्रीहरींचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो. मोक्षदा एकादशीचे व्रत केल्याने भक्ताला सर्व सुख प्राप्त होते आणि त्याची सर्व पापे नष्ट होतात. तसेच त्याच्या पूर्वजांना मोक्ष प्रदान करते. मोक्षदा एकादशीचे व्रत पाळणे, विधीपूर्वक पूजा करणे आणि व्रताची कथा पठण केल्यास खूप फायदा होईल.
या तिथीला आहे मोक्षदा एकादशी
मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथी 22 डिसेंबर रोजी सकाळी 08.16 वाजता सुरू होईल आणि 23 डिसेंबर रोजी सकाळी 7.00 वाजता समाप्त होईल. उदय तिथीनुसार मोक्षदा एकादशी साजरी केली जाईल आणि 22 डिसेंबरलाच उपवास केला जाईल.
मोक्षदा एकादशी व्रताची कथा
पौराणिक कथेनुसार, एकदा वैखानस नावाच्या राजाने स्वप्नात पाहिले की त्याचे पूर्वज नरकात खूप यातना सहन करत आहेत. सकाळी उठल्याबरोबर त्याने आपल्या दरबारात पुजाऱ्यांना बोलावून या स्वप्नाचा अर्थ विचारला. मग पुरोहितांनी राजाला या समस्येच्या निराकरणासाठी पर्वत मुनींकडे जाण्याचा सल्ला दिला.
जेव्हा राजा पर्वत मुनी ऋषीकडे गेला आणि त्यांना त्याचा अर्थ आणि उपाय विचारला तेव्हा ऋषींनी काही काळ डोळे बंद केले. यानंतर ऋषींनी सांगितले की, आपल्या पूर्वजांनी केलेल्या पापांमुळे त्यांना नरकात यातना सहन कराव्या लागतात. राजाने ऋषींना आपल्या पूर्वजांना छळातून मुक्त करण्यासाठी आणि मोक्ष प्राप्तीसाठी उपाय विचारला. तेव्हा ऋषींनी सांगितले की, मोक्षदा एकादशीचे व्रत पूर्ण भक्तिभावाने पाळले तर त्यांच्या पूर्वजांना नक्कीच मोक्ष प्राप्त होईल. यानंतर राजाने पत्नी, मुले आणि नातेवाईकांसह मोठ्या भक्तिभावाने हे व्रत पाळले. यावर भगवान विष्णू प्रसन्न झाले आणि त्यांनी आपल्या पितरांना मोक्ष दिला.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)