Moni Amavasya 2024 : मौनी अमावस्येला आहे विशेष महत्त्व, या दिवशी कोणकोणत्या चुका टाळाव्या

Mouni Amavasya मौनी अमावस्येला धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय महत्त्व आहे. यवेदिक ज्योतिषशास्त्रानुसार माघ महिन्यात मकर राशीत चंद्र आणि सूर्य एकत्र येतात तेव्हा मौनी अमावस्या साजरी केली जाते. चंद्र आणि सूर्य या दोन्ही ग्रहांच्या उर्जेच्या प्रभावामुळे या दिवसाचे महत्त्व अधिक वाढते.

Moni Amavasya 2024 : मौनी अमावस्येला आहे विशेष महत्त्व, या दिवशी कोणकोणत्या चुका टाळाव्या
मौनी अमावस्या Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jan 30, 2024 | 12:25 PM

मुंबई : हिंदू धर्मात मौनी अमावास्येला विशेष महत्त्व मानले जाते. पौष महिन्यात येणाऱ्या अमावस्याला मौनी अमावस्या म्हणतात. ही अमावस्या मराठी भाविक दर्श अमावस्या म्हणून पाळतात. तर मौनी अमावस्या (Mouni Amavasya) ही जैन धर्मीय पाळतात. धार्मिक मान्यतांनुसार, या दिवशी व्यक्तीने मौन बाळगले पाहिजे आणि पवित्र नद्यांमध्ये स्नान केले पाहिजे. यावेळी मौनी अमावस्या 9 फेब्रुवारीला येणार आहे. पौराणिक मान्यतेनुसार, या दिवशी मुनी ऋषींचा जन्म झाला, म्हणून मौनी शब्दाची उत्पत्ती मुनी शब्दापासून झाली असे मानले जाते. असे मानले जाते की या दिवशी गंगा नदीचे पाणी अमृताचे बनते. या दिवशी देवता गंगेच्या पाण्यात वास करतात. शास्त्रानुसार मनाचा कारक चंद्रदेव आहे. अमावस्येच्या दिवशी चंद्राचे दर्शन न झाल्यामुळे मनाची स्थिती बिघडू लागते. त्यामुळे मौनी अमावस्येच्या दिवशी मौन पाळले जाते.

मौनी अमावस्या का साजरी केली जाते?

मौनी अमावस्येला धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय महत्त्व आहे. यवेदिक ज्योतिषशास्त्रानुसार माघ महिन्यात मकर राशीत चंद्र आणि सूर्य एकत्र येतात तेव्हा मौनी अमावस्या साजरी केली जाते. चंद्र आणि सूर्य या दोन्ही ग्रहांच्या उर्जेच्या प्रभावामुळे या दिवसाचे महत्त्व अधिक वाढते. ज्योतिषशास्त्रात सूर्य हा पिता आणि धर्माचा कारक मानला जातो, म्हणून जेव्हा सूर्य आणि चंद्र मकर राशीत एकत्र येतात तेव्हा मौनी अमावस्या साजरी केली जाते. यामुळे या दिवशी दान केल्याने अनेक पटींनी लाभ होतो.

मौनी अमावस्येच्या दिवशी काय करावे?

मौनी अमावस्येला स्नान केल्यानंतर तीळ, तिळाचे लाडू, तिळाचे तेल, आवळा, कपडे इत्यादी दान करावे. या दिवशी गरीब, साधू, महात्मा आणि ब्राह्मण यांना अन्नदान करा आणि त्यांना लोकरीचे कपडे जसे ब्लँकेट इत्यादी दान करा. या दिवशी गुळात काळे तीळ मिसळून लाडू बनवावेत आणि ते लाल कपड्यात बांधून दान करावे. या दिवशी स्नान आणि दान इत्यादी व्यतिरिक्त पितृ श्राद्ध देखील करावे.

हे सुद्धा वाचा

मौनी अमावस्येला महिलांनी आपले सौभाग्य वाढवण्यासाठी पिंपळाच्या झाडाखाली बसून भगवान विष्णूची पूजा करावी. या दिवशी पिंपळाच्या झाडाची प्रदक्षिणा करावी. शास्त्रानुसार या दिवशी नर्मदा, कावेरी, गंगा, सिंधू आणि इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान करावे. असे केल्याने अनेक दोष दूर होतात.

मौनी अमावस्येच्या दिवशी काय करू नये?

मौनी अमावस्येच्या दिवशी आंघोळ करताना काहीही बोलू नये आणि आंघोळीपूर्वी गप्प राहावे. घरात वादाचे वातावरण निर्माण होऊ देऊ नका. या दिवशी भांडणे व वाद टाळावेत. या दिवशी कोणाशीही खोटे बोलू नका किंवा कटू बोलू नका. या दिवशी अंगाला तेल लावू नये तसेच तेलाने मसाज करू नये.

मौनी अमावस्येचे व्रत करणाऱ्यांनी कोणत्याही प्रकारचा मेकअप करू नये. या दिवशी पूर्ण ब्रह्मचर्य पाळा आणि तामसिक आहार घेऊ नका. सकाळी उशिरापर्यंत झोपू नये आणि अंघोळ केल्याशिवाय अन्न खाऊ नये. अमावस्येला निर्जन स्थळे, स्मशानभूमी इत्यादी जवळ जाऊ नका.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.