Importance Of Chandan : हिंदू धर्मात चंदनाला का आहे इतके महत्त्व? किती प्रकारचे असतात चंदन?

श्री हरी विष्णूला टिळा लावण्यासाठी चंदनाचा वापर केला जातो याशिवाय मंत्रोच्चारासाठी त्याची माळ वापरली जाते. चंदन केवळ तुमच्या श्रद्धेशीच नाही तर तुमच्या इच्छेशीही संबंधित आहे.

Importance Of Chandan : हिंदू धर्मात चंदनाला का आहे इतके महत्त्व? किती प्रकारचे असतात चंदन?
चंदनImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: May 14, 2023 | 12:03 PM

मुंबई : चंदनाचा वापर केवळ आयुर्वेदातच नाही धार्मिक विधींमध्येही केला जातो. कोणत्याही देवतेची पूजा चंदनाशिवाय पूर्ण होत नाही. पूजेसाठी लाल चंदन, पिवळे चंदन, पांढरे चंदन, हरिचंदन, गोपी चंदन इत्यादी चंदनाचे अनेक प्रकार आहेत. श्री हरी विष्णूला टिळा लावण्यासाठी चंदनाचा वापर केला जातो याशिवाय मंत्रोच्चारासाठी त्याची माळ वापरली जाते. चंदन केवळ तुमच्या श्रद्धेशीच नाही तर तुमच्या इच्छेशीही संबंधित आहे. चला जाणून घेऊया विविध चंदन लावण्याचे महत्त्व (Importance Of Chandan) काय आहे.

पांढर्‍या चंदनाचे महत्त्व

गळ्यात पांढर्‍या चंदनाची माळ घातल्याने श्री हरी विष्णूची कृपा राहते आणि साधकाला मानसिक शांती आणि सुख-समृद्धी मिळते, असा समज आहे. चंदनाच्या माळेप्रमाणेच चंदनाचा टिळाही शुभकार्यासाठी आहे. श्री राम, श्रीकृष्ण आणि शिवजींच्या पूजेत चंदनाचा तिलक अर्पण केल्यानंतर प्रसादाच्या रूपात कपाळावर लावल्यास सर्व पापांचा नाश होऊन पुण्य प्राप्त होते. कपाळावर टिळक लावल्याने सर्व संकटांपासून रक्षण होते आणि सुख आणि सौभाग्याचे कारक बनते. पांढर्‍या चंदनाच्या माळाने महासरस्वती, महालक्ष्मी मंत्र, गायत्री मंत्र इत्यादींचा जप करणे विशेष शुभ असते.

लाल चंदनाचे महत्त्व

ज्योतिष शास्त्रानुसार शक्तीच्या पूजेमध्ये चंदनाचा वापर विशेष केला जातो. असे मानले जाते की लाल चंदनाच्या मण्यांनी दुर्गा देवीच्या मंत्रांचा जप केल्याने तिच्याकडून केवळ इच्छित वरच मिळत नाही, तर या उपासनेच्या पद्धतीद्वारे मंगळाशी संबंधित दुष्ट प्रभाव देखील दूर होतो. रोज सकाळी तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन त्यात लाल चंदन, लाल फुले व तांदूळ घालून सूर्यमंत्राचा प्रसन्न मनाने जप करून सूर्याला अर्घ्य अर्पण करावे. अर्घ्यदानाने प्रसन्न होऊन भगवान सूर्य वय, आरोग्य, संपत्ती, धान्य, पुत्र, मित्र, वैभव, कीर्ती, विद्या, वैभव आणि सौभाग्य प्रदान करतात.

हे सुद्धा वाचा

गोपी चंदन

स्कंद पुराणानुसार, बहुतेक गोपी चंदन भगवान श्रीकृष्णाला अर्पण करतात आणि नंतर भक्त त्यांच्या कपाळावर लावतात. हा टिळा लावणाऱ्याला सर्व तीर्थक्षेत्रात दान केल्याचे फळ मिळते. असे मानले जाते की जो मनुष्य दररोज गोपी-चंदनासह टिळक धारण करतो तो भगवान श्रीकृष्णाचे निवासस्थान असलेल्या गोलोक वृंदावनात जातो.

हरी चंदन

शास्त्रानुसार भगवान विष्णू आणि त्यांच्या अवतारांना हरी चंदन तिलक लावल्यानंतर कपाळावर लावा. असे केल्याने तुमचे मन आणि शरीर दोन्ही शांत राहतील. यासोबतच व्यक्तीला प्रत्येक क्षेत्रात यश आणि मान-सन्मान मिळेल. तुळशीच्या फांद्या आणि मुळापासून हरि चंदन तयार केले जाते. हे धारण केल्याने मनुष्याचे रोग आणि दुःख दूर होऊन भगवान विष्णूचा आशीर्वाद प्राप्त होतो.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

'दोन्ही पवारांनी भविष्य़ात एकत्रित...',रोहित पवारांच्या आईच मोठ वक्तव्य
'दोन्ही पवारांनी भविष्य़ात एकत्रित...',रोहित पवारांच्या आईच मोठ वक्तव्य.
'पवारांचे 5 खासदार फोडा, केंद्रात मंत्रिपद', राऊतांच्या दाव्यानं खळबळ
'पवारांचे 5 खासदार फोडा, केंद्रात मंत्रिपद', राऊतांच्या दाव्यानं खळबळ.
अल्लू अर्जूनच्या जामिनाचा मार्ग मोकळा,इतक्या दिवसांची न्यायालयीन कोठडी
अल्लू अर्जूनच्या जामिनाचा मार्ग मोकळा,इतक्या दिवसांची न्यायालयीन कोठडी.
'ते' मंदिर कोणाचं हेही माहिती नाही अन्.., चित्रा वाघ यांचा कोणाला टोला
'ते' मंदिर कोणाचं हेही माहिती नाही अन्.., चित्रा वाघ यांचा कोणाला टोला.
रविवारी भाजप, शिवसेनेसह राष्ट्रवादीचे कोणते नेते घेणार मंत्रिपदाची शपथ
रविवारी भाजप, शिवसेनेसह राष्ट्रवादीचे कोणते नेते घेणार मंत्रिपदाची शपथ.
आता मुंबईऐवजी 'या' ठिकाणी येत्या १५ तारखेला होणार मंत्रिमंडळ विस्तार
आता मुंबईऐवजी 'या' ठिकाणी येत्या १५ तारखेला होणार मंत्रिमंडळ विस्तार.
'राष्ट्रवादीवर बोलणारे मिटकरी कोण? त्यांना अकोल्यात..', कोणाचाी टीका?
'राष्ट्रवादीवर बोलणारे मिटकरी कोण? त्यांना अकोल्यात..', कोणाचाी टीका?.
विधानसभेतील पराभवानंतर मोठा निर्णय, नाना पटोले यांचं दिल्लीत पत्र अन्.
विधानसभेतील पराभवानंतर मोठा निर्णय, नाना पटोले यांचं दिल्लीत पत्र अन्..
राष्ट्रवादी पुन्हा एक होणार? रोहित पवारांच्या आईनं काय केलं वक्तव्य?
राष्ट्रवादी पुन्हा एक होणार? रोहित पवारांच्या आईनं काय केलं वक्तव्य?.
साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनला ‘पुष्पा 2’प्रकरणी अटक, नेमकं काय घडलं?
साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनला ‘पुष्पा 2’प्रकरणी अटक, नेमकं काय घडलं?.