मृत्यू पंचक सुरु होण्यासाठी अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक, चुकूनही करू नका असं काम

2024 या वर्षातील शेवटचा महिना सुरु आहे. या महिन्यात ग्रहाच्या दृष्टीने बऱ्याच उलथापालथी होत आहेत. या महिन्यात सर्वात त्रासदायक पंचक लागणार असून अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक आहे. कारण शनिवारी सुरु होणारं पंचक अशुभ मानलं जातं. चला जाणून घेऊयात काय करायचं आणि काय नाही ते..

मृत्यू पंचक सुरु होण्यासाठी अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक, चुकूनही करू नका असं काम
Follow us
| Updated on: Dec 04, 2024 | 4:31 PM

हिंदू धर्मात कोणतंही शुभ कार्य करण्यासाठी मुहूर्त पाहिला जातो. काही मुहूर्त टाळले जातात. कारण त्यावेळेस केलेलं कोणतंही कार्य फळास येत नाही अशी धार्मिक मान्यता आहे. हिंदू धर्मशास्त्रानुसार प्रत्येक महिन्यातील पाच दिवस कोणतंही शुभ कार्य करण्यास उचित मानले जात नाहीत. या पाच दिवसांना पचक मानलं जातं. पण हे पंचक कोणत्या वाराला सुरु झालं आहे हे देखील तितकंच महत्वाचं आहे. त्यावरूनच शुभ कार्य करू शकतो की नाही हे ठरवलं जातं. ज्योतिषशास्त्रानुसार, चंद्र हा सर्वात वेगाने गोचर करणारा ग्रह आहे. एका राशीतून दुसऱ्या राशीत अवघ्या अडीच दिवसात प्रवास करतो. जेव्हा चंद्र धनिष्ठा, शतभिषा, पूर्वा भाद्रपद, उत्ररा भाद्रपद आणि रेवती नक्षत्रातून प्रवास करतो. या प्रवासासाठी पाच दिवसांचा कालावधी लागतो त्याला पंचक संबोधलं जातं. विशेष म्हणजे या प्रवासाला शनिवारी सुरुवात होणार आहे. त्यामुळे हे पंचक सर्वात भीतीदायक मानलं जातं.

द्रिक पंचांगानुसार, 7 डिसेंबरला शनिवारी सकाळी 5 वाजून वाजून 7 मिनिटांनी पंचक सुरु होईल. हे पंचक 11 डिसेंबरपर्यंत सकाळी 11 वाजून 48 मिनिटांपर्यंत असेल. ज्योतिषशास्त्रानुसार, आठवड्यातील कोणत्या वाराला पंचक लागतं यावरून त्याची वर्गवारी केली जाते. शनिवारी सुरु होणाऱ्या पंचकाला मृत्यूपंचक संबोधलं जातं. हे पंचक सर्वात त्रासदायक असते. दुसऱ्या पंचकांच्या तुलनेत पाचपट अधिक अशुभ परिणाम देते.

मृत्यू पंचकात अशी कामं करू नका

  • मृत्यू पंचक लागत असल्याने या कालावधीत शुभ कार्य करू नका. अन्यथा त्याची अशुभ फळं मिळतात.
  • मृत्यू पंचक असताना विवाहित स्त्रियांनी सासरी किंवा माहेरीच राहावं. या काळात प्रवास करणं अशुभ मानलं जातं.
  • मृत्यू पंचकात चारपाई, बेड, पलंग बनवणं अशुभ मानलं जातं. इतकंच काय तर घरावर छतही टाकू नये. असं केल्यास घरात सुख शांती राहात नाही. कुटुंबातील सदस्यांची प्रकृती खालावते.
  • पंचक कालावधीत दक्षिण दिशेला प्रवास करू नये. कारण दक्षिण दिशा ही यमाची दिशा आहे. या दिशेला प्रवास केल्यास अपघात होण्याची शक्यता असते. या काळात प्रवास करावाच लागला तर हनुमान चालिसेचं पठण करावं.
  • पंचक काळात कोणाचा मृत्यू झाला तर पंचक दोषापासून वाचण्यासाठी शवासोबत पाच कुश किंवा पिठाचे पुतळे बनवून तिरडीवर ठेवले जातात. तसेच त्याचं विधिवत अंतिम संस्कार केले जातात.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

‘शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद द्या, नाहीतर...’,पोलीस कर्मचाऱ्याचा इशारा
‘शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद द्या, नाहीतर...’,पोलीस कर्मचाऱ्याचा इशारा.
'... मी तर शपथ घेणार, थांबणार नाही', दादांच्या वक्तव्यानंतर सगळेच हसले
'... मी तर शपथ घेणार, थांबणार नाही', दादांच्या वक्तव्यानंतर सगळेच हसले.
'फडणवीसांनी माझं नाव सुचवलं, आता मी...', शिंदेंनी सांगितला तो किस्सा
'फडणवीसांनी माझं नाव सुचवलं, आता मी...', शिंदेंनी सांगितला तो किस्सा.
शिंदे DCM पद स्वीकारणार? मंत्रिमंडळात असणार की नाही? फडणवीस म्हणाले..
शिंदे DCM पद स्वीकारणार? मंत्रिमंडळात असणार की नाही? फडणवीस म्हणाले...
महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा
महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा.
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या...
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या....
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट.
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण.
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्...
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्....
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता.