प्राण प्रतिष्ठापणेच्या दिवशी मुंबईचा डबेवालादेखील सुट्टीवर, विविध कार्यक्रमात होणार सहभागी
Ram Mandir अयोध्येतील श्रीराम मंदिर जिर्णोद्धार आणि मुर्ती प्राणप्रतिष्ठापणेच्या निमित्त्याने मुंबई डबेवाल्यांनी सोमवार दिनांक 22 जानेवारी रोजी मुंबईचा डबेवाला आपला व्यावसाय बंद ठेवत श्री रामाच्या आगमनाचा आनंदोत्सव साजरा करण्याचे निश्चित केले आहे. या उत्सवाची सुरूवात आज ग्रँड रोड येथे श्री सत्यनारायणाची महापूजा, आरती, भजन, महाप्रसाद आणि किर्तनाने होणार आहे.
निवृत्ती बाबर, मुंबई : 22 जानेवारीला संपूर्ण देश राम मंदिराच्या उद्घाटनाची आणि रामललाच्या प्राण प्रतिष्ठापणेच्या सोहळा देशभरात साजरा होणार आहे. या निमित्त ठिकठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 22 जानेवारीला अनेक ठिकाणी सुट्टी जाहिर करण्यात आली. मुंबईची ओळख असलेल्या जगप्रसिद्ध मुंबईचा डबेवाला (Mumbaicha Dabewala) देखील या दिवशी सुट्टीवर असणार आहे. या संबंधी संघटनेने एक परिपत्रक जारी करून याची माहिती दिली आहे. या परिपत्रकात नेमकं काय म्हंटलं आहे ते आपण जाणून घेऊया.
मुंबईचा डबेवाला 22 जानेवारीला सुट्टीवर
अयोध्येतील श्रीराम मंदिर जिर्णोद्धार आणि मुर्ती प्राणप्रतिष्ठापणेच्या निमित्त्याने मुंबई डबेवाल्यांनी सोमवार दिनांक 22 जानेवारी रोजी आपला व्यावसाय बंद ठेवत श्री रामाच्या आगमनाचा आनंदोत्सव साजरा करण्याचे निश्चित केले आहे. या उत्सवाची सुरूवात आज ग्रँड रोड येथे श्री सत्यनारायणाची महापूजा, आरती, भजन, महाप्रसाद आणि किर्तनाने होणार आहे. समस्त मुंबई डबेवाला कामगारांंमध्ये भक्तीभावाचे नवचैतन्य संचारले आहे.
श्री राम मंदिर उभारणी आणि त्यामागील सुमारे पाचशे वर्षांची अखंड संघर्षाची परंपरा आणि न्यायालयीन प्रक्रिया पाहाता हा तमाम हिंदूसाठी आनंदाचा क्षण आहे असं संघटनेचं म्हणणे आहे. वारकरी सांप्रादायाचे पाईक असलेल्या मुंबई डबेवाल्यांच्या वतीने सोमवारी सकाळी 7 वाजेपासून भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन केले असून माहिम येथे पूरातन काशी विश्वनाथ मंदिरात सकाळी महाआरती, कलशपूजन, शोभायात्रा, तसेच दिंडी सोहळा आणि पालखी मिरवणूक काढून भजन आणि सामूहिक हनुमान चालिसा पठण केले जाणार आहे.
तमाम डबेवाले कामगार वर्ग आणि मंडळ ट्रस्ट या दैदिप्यमान सोहळ्यासाठी सज्ज झाले असून या कार्यक्रमाच्या निमित्त्याने एक दिवसाची सार्वजनिक सुट्टी घेत असून सर्वांनी दिपोत्सव व एकमेकांना शुभेच्छा देत हा कार्यक्रम साजरा करण्याचे आवाहन संस्थेच्या अध्यक्षांकडून करण्यात आले आहे.
मुंबईत ठिकठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन
22 जानेवारीला रामलला प्राणप्रतिष्ठापणे निमित्त मुंबईत ठिकठिकाणी कार्यक्रमांचे आजोन करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी थेट प्रक्षेपण दाखण्यासाठी एलएडी स्क्रिनची सोय करण्यात आली आहे. याशिवाय शहरात मोठ्याप्रमाणात भगवे झेंडे लागले असल्याचे पाहायला मिळत. याशिवाय अनेक सामाजिक संस्थांनी भजन किर्तनाचा कार्यक्रमही आयोजित केला आहे. हा उत्सव साजरा करता यावा यासाठी अनेक ठिकाणी सुट्टीची घोषणा देखील करण्यात आली आहे.