अंधश्रद्धा नव्हे, वाडवडीलांच्या ‘या’ गोष्टीमागे दडलीत वैज्ञानिक कारणे! जाणून घ्या या कारणांबद्दल…
धार्मिक शास्त्रात सर्व दैनंदिन कामांसाठी काही नियम बनवले गेले आहेत. या नियमांमध्ये केवळ धार्मिकच नाही, तर वैज्ञानिक कारणे देखील आहेत.(Myths and Scientific facts)
मुंबई : धार्मिक शास्त्रात सर्व दैनंदिन कामांसाठी काही नियम बनवले गेले आहेत. या नियमांमध्ये केवळ धार्मिकच नाही, तर वैज्ञानिक कारणे देखील आहेत. या वैज्ञानिक कारणांमुळेच आपळ्या घरातील वडीलधारी मंडळी काही घरगुती कामासंदर्भातील नियमांचे पालन करतात आणि आपल्यालाही लहानपणापासून हे नियम शिकवतात (Myths and Scientific facts about the traditional superstitious things).
परंतु, आजच्या निकृष्ट जीवनशैली आणि भरपूर धावपळीच्या जीवनात आपण सगळेच हळूहळू त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत आहोत. यामागील एक महत्त्वाचे कारण म्हणजे कदाचित आपल्याला त्या तथ्यांबद्दल योग्यप्रकारे माहिती नाही. अशाच काही गोष्टींबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत…
रात्री खरकटी भांडी ठेवू नयेत.
घरातली अस्वच्छता दारिद्र्याचे लक्षण समजले जाते. ज्या घरात अस्वच्छता असते, तेथे माता लक्ष्मीचे निवासस्थान नाही, असे शास्त्रांमध्ये म्हटले आहे. यामुळे गरिबी येऊ लागते आणि घरातील समृध्दी नाहीशी होते. परंतु, जर आपण त्याच्या वैज्ञानिक कारणांकडे लक्ष दिले, तर लक्षात येईल की जेवण केलेली खरकटी, उष्टी भांडी रात्रभर ठेवल्यास त्यामध्ये जंतू तयार होतात आणि रात्रीत त्यांची संख्या बर्याच प्रमाणात वाढते. जेव्हा, आपण सकाळी ही भांडी साफ करतो, तेव्हा बर्याचदा या भांड्यांमध्ये ते जंतू राहतात आणि ते आपल्याला आजारी करण्यास कारणीभूत असतात. आजारपणामुळे घरात नकारात्मकता निर्माण होते आणि अशा प्रकारे पैसे देखील खूप खर्च केले जातात (Myths and Scientific facts about the traditional superstitious things).
दक्षिणेकडे पाय करून झोपू नये.
बरेचदा आपल्या घरातील वडीलधारी मंडळी म्हणतात की, दक्षिण दिशेकडे पाय करून झोपू नये, हे चांगले नाही. पण, आपण त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतो. परंतु वस्तुतः याचे वैज्ञानिक कारण म्हणजे सौर मंडळाच्या चुंबकीय लहरी दक्षिणेकडून उत्तरेकडे सरकतात. अशा परिस्थितीत जेव्हा आपण डोक्यावर दक्षिणेकडे तोंड करून झोपतो, तेव्हा पुरोगामी विद्युत प्रवाह आपल्या डोक्यात प्रवेश करतो आणि पायांमधून बाहेर पडतो. त्याच वेळी, जर पाय दक्षिणेकडे केले असतील आणि डोके उत्तरेकडे ठेवले असेल तर, प्रतिकर्षण बळ पृथ्वीच्या उत्तर आणि डोक्याच्या उत्तरेला एकत्र आणून काम करते. या बलामुळे आपल्या शरीरात संकुचन होते. अशा परिस्थितीत शरीरात रक्ताचा प्रवाह पूर्णपणे नियंत्रणाबाहेर जाण्याची भीती असते आणि हाय बीपीची समस्या देखील उद्भवू शकते.
रात्री झाडू मारू नये.
बऱ्याच लोकांच्या घरात रात्री झोपण्यापूर्वी झाडू मारण्यास मनाई आहे. असे मानले जाते की यामुळे माता लक्ष्मी नाराज होते. पण यामागील खरे कारण म्हणजे वर्षांपूर्वी खेड्यांमध्ये वीज नव्हती. रात्री दिवे किंवा मेणबत्त्या प्रकाशित करायच्या, ज्याचा प्रकाश खूपच कमी होता. अशा परिस्थितीत रात्री स्वच्छता करून सूक्ष्मजीवांचा मृत्यू होण्याची भीती होती. तसेच, घरात पडलेली कोणतीही विशेष वस्तू कचर्याच्या निमित्ताने बाहेर फेकली गेली, तर ती पुन्हा मिळणार नाही. यामुळे रात्री कचरा काढायला मनाई होती. जरी ते करावे लागलेच, तरी घरातच कचरा गोळा केला जात असे.
(Myths and Scientific facts about the traditional superstitious things)
हेही वाचा :
Vastu Tips : झाडू मारताना ‘या’ चुका करु नका, नाहीतर कंगाल व्हाल
शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी दानधर्म करा, साडेसातीची पीडा निवारण्याचे ज्योतिषशास्त्रात उपाय काय?
Gupt Navratri 2021 | गुप्त नवरात्रीमध्ये पूर्ण होतील सर्व मनोकामना, पण चुकूनही करू नका ‘ही’ कामे! https://t.co/AMs7zPj0gc #GuptNavaratri | #Navratri
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 20, 2021