Nag Panchami 2022: कधी येत आहे यंदाची नागपंचमी? जाणून घ्या तिथी, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी

नागपंचमी (Nag panchami 2022) हा सण श्रावण महिन्यातील (Shrawan 2022) शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो. नागांच्या पूजेचा हा सण हिंदू धर्मात खूप महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी नाग देवतेची पूजा केली जाते. नाग देवता शिवाचे अलंकार मानले जातात. धार्मिक शास्त्रानुसार, नागाची पूजा केल्याने आध्यात्मिक शक्ती, अपार संपत्ती आणि इच्छित फल प्राप्त होतात. साधारणपणे […]

Nag Panchami 2022: कधी येत आहे यंदाची नागपंचमी? जाणून घ्या तिथी, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी
Follow us
| Updated on: Jul 17, 2022 | 9:16 AM

नागपंचमी (Nag panchami 2022) हा सण श्रावण महिन्यातील (Shrawan 2022) शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो. नागांच्या पूजेचा हा सण हिंदू धर्मात खूप महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी नाग देवतेची पूजा केली जाते. नाग देवता शिवाचे अलंकार मानले जातात. धार्मिक शास्त्रानुसार, नागाची पूजा केल्याने आध्यात्मिक शक्ती, अपार संपत्ती आणि इच्छित फल प्राप्त होतात. साधारणपणे हरियाली तीजनंतर दोनच दिवसांनी नागपंचमीचा सण साजरा केला जातो. नागपंचमीच्या दिवशी घरोघरी नागाच्या प्रतिमेची पूजा करतात. यावर्षी नागपंचमीचा सण 2 ऑगस्ट 2022 रोजी साजरा होणार आहे. श्रावण महिन्यातील पंचमी तिथी नागदेवतांच्या पूजेसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते.

नागपंचमीचा शुभ मुहूर्त

नागपंचमी, मंगळवार 2 ऑगस्ट 2022

पंचमी तिथी 2 ऑगस्ट 2022 रोजी पहाटे 05:13 पासून सुरू होईल

हे सुद्धा वाचा

पंचमी तिथी 3 ऑगस्ट 2022 रोजी पहाटे 05:41 वाजता संपेल

नागपंचमी पूजनाचा मुहूर्त सकाळी 06:05 ते 08:41 पर्यंत

नागपंचमीची पूजा विधी

नागपंचमीच्या दिवशी अनंत, वासुकी, पद्म, महापद्म, तक्षक, कुलीर, कर्कट, शंख, कालिया आणि पिंगल या देवतांची पूजा केली जाते. नागदेवतांची पूजा करताना हळद, रोळी, तांदूळ, फुले अर्पण केली जातात. कच्च्या दुधात तूप आणि साखर मिसळून नागदेवतेची पूजा करावी. यानंतर नागदेवतेची आरती करून नागदेवतेचे मनाने ध्यान करावे. शेवटी नागपंचमीची कथा ऐकावी.

पौराणिक कथा

असे मानले जाते की, श्रावण महिन्याच्या पाचव्या दिवशी नाग ब्रह्मदेवांना भेटायला गेले होते आणि त्या दिवशी नागांची शापातून मुक्तता झाली होती. त्या दिवसापासून नागांची पूजा करण्याची परंपरा सुरू झाली. वराह पुराणानुसार या दिवशी ब्रह्माजींनी आपल्या कृपेने शेषनागाला सजवले होते आणि पृथ्वीचे भार वाहण्याची सेवा घेतली. त्यादिवशी लोकांनी नाग देवतेची पूजा केली होती. श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने वृंदावनात कालिया या महाकाय नागाचा पराभव करून लोकांचे प्राण वाचवले. तो सापाच्या फडावर नाचायचा आणि त्याला नाग नथैया म्हणत. तेव्हापासून नागांची पूजा करण्याची परंपरा सुरू असल्याचे मानले जाते.  समुद्रमंथनात वासुकी नागाचा दोरी म्हणून वापर केला गेला होता. लोकधर्मात नागांचा उल्लेख अर्ध मानवाच्या रूपातही आढळतो. असे मानले जाते की, आपले पूर्वज सापाच्या रूपात अवतरले होते. सापांची आई असलेल्या सुरासा या नावाने मानसा मातेचे मंदिर भारतात अनेक ठिकाणी आहे. जिथे पूजा केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना लवकर पूर्ण होतात, मंदिरांमध्ये नागाच्या मूर्तींना स्नान घालण्याची परंपरा आहे. नागपंचमीच्या दिवशी पंचामृताने नागाच्या प्रतिमेला अभिषेक करतात.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.