Nag Panchami 2023 : या तारखेला साजरी होणार नाग पंचमी, पूजा विधी आणि महत्त्व
नाग देवता हे शिवाच्या गळ्यातील अलंकार मानले जाते. श्रावणात नागदेवतेची पूजा केल्याने जीवनातील भय दूर होते. नागपंचमीच्या दिवशी नाग देवतेला दूध अर्पण केल्याने शुभ फळ मिळते
मुंबई : श्रावण महिना सुरू होताच सण आणि उपवासही सुरू होतात. नागपंचमी (Nag Panchami 2023) हा सणही त्यापैकीच एक. हिंदू धर्मात नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या तिथीला साजरा केला जातो. या दिवशी नागदेवतेची पूर्ण विधीपूर्वक पूजा केली जाते. प्रत्येक महिन्याच्या पाचव्या तिथीला नागदेवतेची पूजा करण्याची प्रथा असली तरी श्रावण शुक्ल पक्षातील पाचवी तिथी ही नामपंचमी म्हणून साजरी केली जाते. नागपंचमीचा सण कधी साजरी होणार आहे आणि पूजेचा शुभ मुहूर्त याबद्दल माहिती जाणून घेऊया.
या वर्षी किती तारखेला साजरी होणार नागपंचमी
यंदा नागपंचमी 21 ऑगस्ट, सोमवारी साजरी होणार आहे. या दिवशी दोन सण एकत्र साजरे केले जातात. श्रावण सोमवारसोबतच या दिवशी भगवान शंकराला प्रिय असणाऱ्या नागाची पूजाही केली जाते. या दिवशी नाग आणि सर्प या दोघांची पूजा करण्याची प्रथा आहे. नागपंचमीच्या दिवशी नाग आणि साप दिसणे खूप शुभ मानले जाते. नागपंचमीला नागदेवतेची पूजा केल्याने सुख, सौभाग्य तसेच धनप्राप्ती होते, असे मानले जाते.
नागपंचमीच्या पूजेचा शुभ मुहूर्त
नागपंचमी तिथी 21 ऑगस्ट रोजी दुपारी 12:20 वाजता सुरू होईल आणि ही तारीख 22 ऑगस्ट, मंगळवारी दुपारी 2:00 वाजता समाप्त होईल. मात्र हा सण 21 ऑगस्टलाच साजरा केला जाणार आहे. पूजेचा शुभ मुहूर्त 21 ऑगस्ट, सोमवार, सकाळी 5.53 ते सकाळी 8.30 पर्यंत आहे. शुभ मुहूर्तावर नागदेवतेची पूजा केल्याने चांगले फळ मिळेल.
नागपंचमीचे धार्मिक महत्त्व काय आहे?
नाग देवता हे शिवाच्या गळ्यातील अलंकार मानले जाते. श्रावणात नागदेवतेची पूजा केल्याने जीवनातील भय दूर होते. नागपंचमीच्या दिवशी नाग देवतेला दूध अर्पण केल्याने शुभ फळ मिळते आणि या दिवशी पूजा केल्याने सापांपासून कुटुंबाचे रक्षण होते, असे मानले जाते.
नाग पंचमी उपाय
- नागपंचमीच्या दिवशी नागांना दूध अर्पण करावे.
- हळद, कुंकुम, चंदन आणि रोळीने नाग देवतेची पूजा करा आणि नंतर त्यांची आरती करा.
- पत्रिकेतील कालसर्प दोष दूर करण्यासाठी चांदीच्या सापाची जोडी वाहत्या पाण्यात सोडावी.
- नागपंचमीच्या दिवशी चांदीच्या नागाची जोडी ब्राह्मणाला दान केल्याने धन आणि धान्य वाढते आणि सर्पदंशाची भीती दूर होते.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)