Nagpanchami 2022: नाग पंचमीला जुळून येतोय विशेष योग, मुहूर्त आणि पूजा विधी
यावेळी मंगळवार 2 ऑगस्ट रोजी येणाऱ्या नागपंचमीला (Nagpanchami 2022) शिव आणि सिद्धी योग (shivsiddhi yog) जुळून येत आहे. नागपंचमीला शिव आणि त्यांच्या गण नागदेवतेची पूजा केली जाते. या दिवशी स्त्रिया मंगळा गौरीचे व्रत ठेवतात आणि कुटुंबात सुख-समृद्धीची कामना करतात. शिवाशी संबंधित नागपंचमी आणि पार्वतीशी संबंधित मंगळा गौरी व्रत (Mangla gauri vrat) हे शिव-सिद्धी योगाचे विशेष […]
यावेळी मंगळवार 2 ऑगस्ट रोजी येणाऱ्या नागपंचमीला (Nagpanchami 2022) शिव आणि सिद्धी योग (shivsiddhi yog) जुळून येत आहे. नागपंचमीला शिव आणि त्यांच्या गण नागदेवतेची पूजा केली जाते. या दिवशी स्त्रिया मंगळा गौरीचे व्रत ठेवतात आणि कुटुंबात सुख-समृद्धीची कामना करतात. शिवाशी संबंधित नागपंचमी आणि पार्वतीशी संबंधित मंगळा गौरी व्रत (Mangla gauri vrat) हे शिव-सिद्धी योगाचे विशेष संयोजन मानले जाते. जोतिषशास्त्रज्ञांच्या मते 2 ऑगस्टला संध्याकाळी 6.35 पर्यंत शिवसिद्धी योग असेल. या काळात भाविकांनी शिवमंदिरांमध्ये नागदेवतेची पूजा करावी. तसेच महिलांनी मंगळा गौरीचे व्रत करून उपवास करावा. भक्तांना शिव आणि पार्वती या दोघांचाही आशीर्वाद मिळेल.
जिवंत सापाची नाही तर प्रतिमेची पूजा करा
शास्त्रीय मान्यतेनुसार नागदेवता हे शिवाचे गण मानले जाते. भोलेनाथ नेहमी गळ्यात नाग धारण करतात. नाग हे शिवाचे गण असल्यामुळे नागपंचमीला नागाची पूजा केली जाते. अनेक जण पूजेसाठी जिवंत नाग शोधतात, हे चुकीचे आहे. मंदिरात शिवलिंगावर बसवलेल्या नागाच्या मूर्तीचीच पूजा करावी. मंदिरात जाणे शक्य नसल्यास घरी नागाच्या प्रतिमेची पूजा करावी.
सर्पदोष मुक्तीसाठी करा रुद्राभिषेक
ज्योतिष शास्त्रानुसार ज्या व्यक्तीच्या कुंडलीत सर्पदोष असतो त्याला जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. सर्प दोषाने पीडित व्यक्तीला कठोर परिश्रम करूनही योग्य यश मिळत नाही. सर्प दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी श्रावण शुक्ल पंचमी तिथीला म्हणजेच नागपंचमीला शिवाचा रुद्राभिषेक करावा असे मानले जाते. रुद्राभिषेक केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि त्यांना सुखी जीवनाचा आशीर्वाद देतात.
शुभ मुहूर्त
पंचमी तिथीचा प्रारंभ – 2 ऑगस्ट रोजी सकाळी 5.15 वा
समाप्ती- 3 ऑगस्ट सकाळी 5.40 वाजता
पूजा मुहूर्त- 2 ऑगस्ट रोजी सकाळी 5.40 ते 8.25 पर्यंत, एकूण कालावधी दोन तास 45 मिनिटे
अशी पूजा करा
नागदेवता आणि शिव-पार्वतीच्या मूर्तीसमोर धूप, दिवा लावावा. नागदेवतेच्या प्रतिमेला पंचामृताने स्नान करावे. बेलपत्र आणि पांढरीफुलं वाहावी. लाह्या, बत्तासे आणि शिऱ्याचा नैवेद्य दाखवावा. अनेकांकडे नागपंचमीच्या दिवशी कात्री, चाकू, तवा, कंगवा इत्यादींचा वापर करत नाही. ज्यांच्याकडे जी पद्धत आहे ती पाळावी.
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)