Narak chaturdashi 2023 : दिवाळीत अभ्यंग स्नानाला का असते विशेष महत्त्व? मुहूर्त आणि विधी

नरक चतुर्दशीचा दिवस मृत्यूची देवता यमराजाला समर्पित मानला जातो. या दिवशी अभ्यंगस्नान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार, जे लोकं या विशेष दिवशी अभ्यंग स्नान करतात ते नरकात जाणे टाळू शकतात तसेच त्याना मृत्यू पश्चात स्वर्ग प्राप्ती होते, अशी धार्मिक मान्यता आहे.

Narak chaturdashi 2023 : दिवाळीत अभ्यंग स्नानाला का असते विशेष महत्त्व? मुहूर्त आणि विधी
अभ्यंग स्नानImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Nov 11, 2023 | 1:37 PM

मुंबई : दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला नरक चतुर्दशी साजरी केली जाते. पंचांगानुसार, सूर्योदयापूर्वी चतुर्दशी तिथी असते आणि सूर्यास्तानंतर अमावस्या तिथी असते तेव्हा नरक चतुर्दशी आणि लक्ष्मी पूजा एकाच दिवशी केली जाते. यावर्षी नरक चतुर्दशी आणि लक्ष्मी पूजन एकाच दिवशी आले आहे. म्हणजेच उद्या 12 नोव्हेंबरला, रविवारी साजरी केली जाणार आहे. या दिवशी अभ्यंग स्नान (abhyanga snan 2023) केले जाते. जोतिषी पराग कुळकर्णी यांच्याकडून जाणून घेऊया अभ्यंग स्नानाचे महत्त्व.

अभ्यंगस्नानाचे महत्व

नरक चतुर्दशीचा दिवस मृत्यूची देवता यमराजाला समर्पित मानला जातो. या दिवशी अभ्यंगस्नान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार, जे लोकं या विशेष दिवशी अभ्यंग स्नान करतात ते नरकात जाणे टाळू शकतात तसेच त्याना मृत्यू पश्चात स्वर्ग प्राप्ती होते, अशी धार्मिक मान्यता आहे. अभ्यंगस्नान हे केवळ धार्मिक दृष्टीकोनातूनच महत्त्वाचे नाही तर त्यामुळे अनेक शारीरिक फायदेही होतात.

अभ्यंगस्नानाचा शुभ मुहूर्त

कार्तिक महिन्याची चतुर्दशी तिथी 11 नोव्हेंबर रोजी दुपारी 01:57 वाजता सुरू होत आहे. तसेच, 12 नोव्हेंबर रोजी दुपारी 02:44 वाजता संपेल. अशा स्थितीत उदय तिथीनुसार अभ्यंगस्नानाचा शुभ मुहूर्त 12 नोव्हेंबर रोजी पहाटे 5:28 ते 6:41 पर्यंत असेल. तसेच या दिवशी चंद्रोदय पहाटे 5.28 वाजता होईल.

हे सुद्धा वाचा

अभ्यंग स्नान पद्धत

नरक चतुर्दशीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून तिळाच्या तेलाने अंगावर मसाज करा. यानंतर काही वेळ बसा. यानंतर अंगावर उबटान लावा. हळद, चंदन पावडर, तीळ पावडर आणि दही मिसळून हे उटणं तयार केले जाते. ते शरीरावर नीट चोळल्यानंतर कोमट पाण्याने आंघोळ करा. स्नान झाल्यानंत देवघर स्वच्छ करा. देवाजवळ दिवा लावा. देवाची पूजा केल्यानंतर गरातल्या वडीलधाऱ्यांचा आशिर्वाद घ्या. त्यानंतर सूर्याला अर्घ्य देवून लाल फुल वाहावे.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.