Navaratra 2022: या तारखेपासून सुरु होतेय शारदीय नवरात्र, यंदाचे नवरात्र आहे दरवर्षीपेक्षा विशेष

यावर्षी शारदीय नवरात्री 26 सप्टेंबरपासून सुरू होत आहे, जे 05 ऑक्टोबर 2022 पर्यंत साजरे केले जाईल. नवरात्रीच्या काळात अनेक जण उपवास करतात आणि देवीची पूजा करतात.

Navaratra 2022: या तारखेपासून सुरु होतेय शारदीय नवरात्र, यंदाचे नवरात्र आहे दरवर्षीपेक्षा विशेष
नवरात्र २०२२Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Sep 21, 2022 | 11:28 AM

Navaratra 2022: यावर्षी शारदीय नवरात्रीची सुरुवात 26 सप्टेंबर 2022 पासून होत आहे. नवरात्रीच्या सणाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांत दुर्गेच्या नऊ (Durga devi) रूपांची पूजा केली जाते. देवीचे भक्त तिची पूजा करण्यासाठी वर्षभर शारदीय नवरात्रीची वाट पाहत असतात. पंचांगानुसार, अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून शारदीय नवरात्रीची सुरुवात होते. यावर्षी शारदीय नवरात्री 26 सप्टेंबरपासून सुरू होत आहे, जे 05 ऑक्टोबर 2022 पर्यंत साजरे केले जाईल. नवरात्रीच्या काळात अनेक जण उपवास करतात आणि देवीची पूजा करतात. याशिवाय अनेकांच्या घरी घटस्थापना (Ghat sthapna 2022) देखील होते. काही मंदिरातदेखील घट मांडण्याची व्यवस्था केली जाते. यावेळी शारदीय नवरात्र दरवर्षीपेक्षा विशेष आहे,  कारण यंदा देवीचे वाहन  हत्ती आहे. या वाहनाचे काय महत्त्व आहे जाणून घेऊया.

यंदाचे नवरात्रोत्सव आहे विशेष

यंदाचे शारदीय नवरात्र खूप खास आहे, कारण यंदा नवरात्र उत्सव सोमवारपासून सुरू होत आहे. जेव्हा नवरात्र रविवार किंवा सोमवारपासून सुरु होते तेव्हा देवीचे वाहन सहसा हत्तीच असते.

समृद्धीचे प्रतीक हत्ती

हत्ती हा समृद्धीचे प्रतीक आहे. धार्मिक दृष्टिकोनातून हत्तीचे विशेष महत्त्व आहे. यंदा देवीचे वाहन हत्ती आहे, याचाच अर्थ यंदाचे नवरात्र समृद्धीकारक ठरणार आहे. गेली दोन वर्ष कोरोना काळात सगळ्यांनीच अनेक आव्हानांचा सामना. आर्थिक संकटंही झेलली. यंदा हत्तीवर रूढ होऊन देवीचे आगमन होत असल्याने हे नवरात्र आर्थिक सुबत्तेचे आणि समृद्धीचे ठरेल.

हे सुद्धा वाचा

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)   

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.