Navratri 2022: यंदाच्या नवरात्रीत करा वास्तुशास्त्राचे हे उपाय, घरात नांदेल सुखसमृद्धी
सध्या नवरात्रोत्सव धुमधडाक्यात सुरु आहे. या दिवसात काही वास्तू शास्त्रातले उपाय केल्यास घरात सुखसमृद्धी नांदेल. जाणून घेऊया उपाय
मुंबई, देशात शारदीय नवरात्र (Navratri 2022) सुरू झाले असून यंदाचा उत्सव निर्बंधमुक्त साजरा होत असल्याने विशेष उत्साह दिसून येत आहे. 23 सप्टेंबरपासून सुरु झालेला नवरात्रोत्सव 4 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 5 ऑक्टोबरला दुर्गा मातेच्या मूर्तींचे विधीवत विसर्जन करण्यात येणार आहे. असे म्हणतात की जर तुम्ही गरिबी, आजारपण, मानसिक ताणतणावातून जात असाल तर नवरात्रात वास्तुचे (Vastu Tips) काही खास उपाय केल्याने त्या सर्व त्रासांपासून मुक्ती मिळते. ते खास उपाय कोणते आहेत आणि ते कसे करता येतील ते जाणून घेऊया.
नवरात्रात करा हे वास्तु उपाय
- नवरात्रात दुर्गामातेच्या मंदिरात जाऊन लाल रंगाचा ध्वज अर्पण करावा. असे मानले जाते की दुर्गा मातेला लाल रंग खूप प्रिय आहे आणि या रंगाचा ध्वज अर्पण केल्याने भक्ताच्या कुटुंबावर तिची कृपादृष्टी राहते. यासोबतच अडकलेली सर्व कामे पूर्ण होतात.
- नवरात्रात घराच्या मुख्य दारावर दोन्ही बाजूंना शेंदूर लावून स्वस्तिक काढावे. यानंतर पाण्यात हळद टाकून पिंपळाच्या झाडाला अर्पण करा. असे मानले जाते की, वास्तूच्या या उपायाने नकारात्मक शक्ती घरापासून दूर राहते आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो.
- मुख्य दारावर अशोक किंवा आंब्याच्या पानाचे तोरण लावावे. वास्तुशास्त्राच्या या उपायाने नकारात्मक शक्ती घरात प्रवेश करत नाही आणि घरात धन-संपत्तीचा प्रवाह वाढतो. असे केल्याने घरातील वास्तुदोषही दूर होतो.
- नवरात्रीत सुपारीच्या दोन्ही बाजूंनी मोहरीचे तेल लावावे. यानंतर ती माता दुर्गाला अर्पण करा आणि देवीची मनोभावे पूजा करा. पूजा केल्यानंतर त्या सुपाऱ्या डोक्याजवळ ठेवून झोपावे. असे केल्याने व्यवसाय आणि नोकरीतील अडचणी दूर होतात असे म्हणतात.
हे सुद्धा वाचा
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)