Navratri 2022: डायबिटीस आहे पण नवरात्रीचे उपवास करायचे आहे? मग या गोष्टी ठेवा ध्यानात

तुम्ही जर मधुमेहाचे रुग्ण असाल आणि आणि येत्या नवरात्रीत उपवास करण्याचा विचार करीत असाल तर तज्ज्ञांचे यावर काय मत आहे हे नक्की जाणून घ्या.

Navratri 2022: डायबिटीस आहे पण नवरात्रीचे उपवास करायचे आहे? मग या गोष्टी ठेवा ध्यानात
डायबिटीस आणि उपवास Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Sep 24, 2022 | 8:54 PM

मुंबई,  26 सप्टेंबरपासून शारदीय नवरात्रीला (Navratri 2022) सुरुवात होत आहे. नवरात्रीमध्ये उपवासाला (Fat) खूप महत्त्व आहे. हिंदू धर्मात उपवासाचा नियम शास्त्रीय आधारावर ठेवण्यात आला आहे. शरीरातील तामसी घटक बाहेर काढण्यासाठी उपवास हा सर्वोत्तम मार्ग आहे, पण आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करून उपवास करणे चुकीचे आहे. जर तुम्हाला मधुमेहाचा (Diabetes) त्रास असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय उपवास करू नका. आहार तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, मधुमेहाच्या रुग्णांनी  रिकाम्या पोटी राहणे धोक्याचे आहे. विशेषत: टाइप 1 मधुमेहाने ग्रस्त असलेल्यांनी उपवास करू नये कारण उपवासामुळे त्यांच्या आरोग्यासाठी अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. टाइप 2 मधुमेह असलेल्या लोकांना उपवासाचा धोका थोडा कमी असतो. त्यामुळे काही गोष्टींचे पालन करून ते उपवास करू शकतात. याशिवाय उपवासाच्या वेळी दिवसातून काही वेळा साखरेची पातळी तपासणे आवश्यक आहे.

मधुमेहाच्या रुग्णांवर उपवासाचा काय परिणाम होतो

नवरात्रीच्या काळात मधुमेही उपवास करतात तेव्हा त्यांच्या रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण कमी होऊ शकते, याला हायपोग्लायसेमिया म्हणतात. रक्तातील कमी साखरेची लक्षणे सहज ओळखता येतात. रक्तातील कमी साखरेमुळे अचानक घाम येणे, अशक्तपणा किंवा शरीरात कंप येणे, हृदयाचे ठोके जलद होणे इत्यादी गोष्टी जाणवतात.

अशा प्रकारे मधुमेह नियंत्रणात ठेवा

मध, साखर, ग्लुकोज घेऊन कमी झालेल्या साखरेच्या पातळीला नियंत्रणात आणता येते. काही लोकांमध्ये उपवासाच्या वेळी रक्तातील साखर वाढते. त्यामुळे या काळात रक्तातील साखरेची नियमित तपासणी करून ती शक्यतो नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे.

हे सुद्धा वाचा

उपवास करणे टाळा

टाईप 2 मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी जे लोक इन्सुलिन घेत आहेत त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय उपवास करण्याचा निर्णय घेऊ नये. विशेषत: ज्यांची रक्तातील साखर नियंत्रणात नाही अशा लोकांनी उपवास करू नये. ज्यांना मधुमेहाशी संबंधित इतर समस्या आहेत जसे की मूत्रपिंड, यकृत किंवा हृदयविकार, त्यांच्यासाठी उपवास करणे योग्य नाही.

टाईप 1 मधुमेह असलेल्या लोकांसाठी देखील उपवास योग्य नाही. जे पूर्णपणे इन्सुलिनवर अवलंबून आहेत. मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्या लोकांना नवरात्रीचा उपवास करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे अनिवार्य आहे

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.