Navratri 2022: नवरात्रीच्या दिवसात केलेल्या ‘या’ उपायांनी घरातला वास्तूदोष होईल दूर
नवरात्रीच्या या पवित्र दिवसांमध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार असतो. या दिवसात काही उपाय केल्यास घरातील वास्तुदोष दूर होऊन समृद्धी नांदते. जाणून घेऊया हे उपाय.
मुंबई, येत्या 26 ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रीला (Navratri 2022) सुरुवात होत आहे. नवरात्रीच्या काळात देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. या नऊ दिवसांमध्ये पवित्रता आणि शुद्धतेला विशेष महत्त्व आहे. नवरात्रीच्या दिवसात केलेल्या उपासनेचे विशेष फळ मिळते अशी धार्मिक मान्यता आहे. आयुष्यात सुख शांती लाभण्यासाठी नवरात्रीच्या दिवसात देवीच्या उपासनेला विशेष महत्त्व आहे. याशिवाय नवरात्रीत केलेल्या काही उपायांनी घरातला वास्तूदोष (Wastudosh) देखील दूर करता येतो.
- नवरात्रात घराच्या मुख्य दारावर देवीचे पाऊलं लावावी या पाउलांचा पुढचा भाग घराच्या दिशेने असावा. रोज आंघोळ झाल्यानंतर या पाऊलांवर हळद कुंकू वाहावे. असे केल्याने देवीचा आशीर्वाद मिळतो आणि घरात कधीही धन-वैभवाची कमतरता भासत नाही.
- ज्या घरात घटस्थापना केली आहे, त्यांनी नवरात्रीच्या दिवशी 9 कुमारिकांचे कन्या भोजन करावे. याशिवाय आपल्या क्षमतेनुसार दक्षिणा द्यावी. असे केल्याने देवी प्रसन्न होते आणि घरातील वास्तुदोष दूर होतात असे मानले जाते.
- जर तुम्ही दुर्गापूजेसाठी अखंड ज्योत प्रज्वलित केली असेल तर त्याची दिशा आग्नेय दिशेला ठेवावी. वास्तुशास्त्रानुसार यामुळे घरातील सर्व दोष दूर होतात. घरातील सदस्यांचे आजार दूर होतात आणि हितशत्रूंपासून बचाव होतो.
- देवीसमोर लावलेल्या दिव्यात तूप किंवा तिळाचे तेल टाकावे. तुपाचा दिवा देवीच्या उजव्या बाजूला म्हणजेच आपल्या डाव्या बाजूला आणि तिळाच्या तेलाचा दिवा देवीच्या डाव्या बाजूला लावावा.
- नवरात्रीच्या दिवसात घरात सकाळ संध्याकाळ कापूर जाळावा. हा कपूर घरातील सर्व खोल्यामध्ये फिरवावा. यासोबतच सकाळी आणि संध्याकाळी घरात शंख वाजवावा याने घरातील नकारात्मकता दूर होते.
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)