Navratri 2022: नवरात्रीत कधी आहे अष्टमी आणि नवमी, जाणून घ्या कन्या भोजनाचे महत्त्व

26 सप्टेंबरपासून नवरात्रोत्सवाला सुरवात होणार आहे. या दिवसात देवीची मनोभावे पूजा करण्यात येते. नवरात्रात कन्या भोजनाला विशेष महत्त्व आहे.

Navratri 2022: नवरात्रीत कधी आहे अष्टमी आणि नवमी, जाणून घ्या कन्या भोजनाचे महत्त्व
कन्या भोजन Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Sep 23, 2022 | 11:27 AM

मुंबई,  26 सप्टेंबरपासून शारदीय नवरात्रीला (Navratri 2022) सुरुवात होत आहे. या काळात संपूर्ण नऊ दिवस माता दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा करण्याचा नियम आहे. नवरात्रीमध्ये दुर्गा मातेची पूजा केल्याने व्यक्तीचे निद्रस्त भाग्य जागृत होते, असे म्हटले जाते. नवरात्रीची सुरुवात घटस्थापनेने होते आणि अष्टमी आणि नवमी तिथीला कन्या भोजनाने (Kanya Bhojan) समाप्त होते. या वर्षी नवरात्रीत अष्टमी आणि नवमी तिथी कोणत्या दिवशी येत आहे ते जाणून घेऊया.

अष्टमी

शारदीय नवरात्रीमध्ये अष्टमी तिथीचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. या दिवशी महागौरीची पूजा केली जाते. अनेक ठिकाणी लोक अष्टमी तिथीलाच कन्येची पूजा करतात. या वेळी महाअष्टमी सोमवार, 3 ऑक्टोबर रोजी येत आहे. आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाची अष्टमी तिथी रविवार, 2 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 06.47 ते सोमवार, 03 ऑक्टोबर रोजी दुपारी 04.37 पर्यंत असेल. उदय तिथीमुळे अष्टमीचा उपवास 3 ऑक्टोबरलाच ठेवला जाणार आहे.

हे सुद्धा वाचा

नवमी

जे लोकं अष्टमी तिथीला कन्येची पूजा करत नाहीत ते नवमीला ही प्रथा पाळतात. या दिवशी माता सिद्धिदात्रीची पूजा केली जाते. यावेळी अश्विन शुक्ल नवमी तिथी सोमवार, 03 ऑक्टोबर रोजी दुपारी 04.37 ते मंगळवार, 04 ऑक्टोबर रोजी दुपारी 02.20 पर्यंत असेल. उडीया तिथीमुळे नवमीची पूजा 04 ऑक्टोबरलाच होईल.

कन्या भोजनाचे महत्त्व

नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी कुमारिकेच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. उपवास करणारे भाविक कन्या भोजनंतरच उपवास सोडतात. कुमारिकांना देवी मातेचे रूप मानले जाते. असे मानले जाते की, या दिवशी कुमारिकांना अन्नदान केल्याने घरात सुख, शांती आणि समृद्धी येते. कन्याभोज दरम्यान नऊ कुमारिका असणे आवश्यक आहे. दरम्यान, जर मुलींचे वय 10 वर्षांपेक्षा कमी असेल तर त्या व्यक्तीला कधीही पैशाची कमतरता भासत नाही आणि त्यांचे जीवन समृद्ध राहते,अशी धार्मिक मान्यता आहे.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Non Stop LIVE Update
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....