Navratri 2023 : नवरात्रीच्याआधी घरी घेऊन या वस्तू, लाभेल देवीचा आशिर्वाद

नवरात्रीमध्ये दुर्गा देवीच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते. नवरात्रीमध्ये दुर्गा देवीची उपासना केल्याने ती प्रसन्न होते आणि भक्तांवर आशिर्वादाचा अर्शाव करते. अशा काही गोष्टी आहेत ज्या नवरात्रीमध्ये घरी आणून मातेचा आशीर्वाद मिळवता येतो.

Navratri 2023 : नवरात्रीच्याआधी घरी घेऊन या वस्तू, लाभेल देवीचा आशिर्वाद
गटस्थापनाImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Oct 11, 2023 | 8:17 PM

मुंबई : रविवार, 15 ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रीला (Navratri 2023) सुरुवात होणार आहे. नवरात्रीमध्ये दुर्गा देवीच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते. नवरात्रीमध्ये दुर्गा देवीची उपासना केल्याने ती प्रसन्न होते आणि भक्तांवर आशिर्वादाचा अर्शाव करते. अशा काही गोष्टी आहेत ज्या नवरात्रीमध्ये घरी आणून मातेचा आशीर्वाद मिळवता येतो. या गोष्टी अतिशय शुभ मानल्या जातात. चला तर मग जाणून घेऊया अशा कोणत्या गोष्टी आहेत, ज्या नवरात्रीमध्ये घरात ठेवल्या तर नेहमी सुख-समृद्धी येते.

या वस्तूंची करा खरेदी

कलश

हिंदू धर्मात पूजेच्या वेळी कलशाचे खूप महत्त्व आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कलशाची स्थापना केली जाते. अशा स्थितीत नवरात्रीच्या काळात तुम्ही माती, पितळ, सोने किंवा चांदीचा कलश घरी आणावा. हे अत्यंत शुभ मानले जाते.

हे सुद्धा वाचा

लाल चंदनाची माला

माता दुर्गाला लाल चंदनाची माळ खूप आवडते. नवरात्रीमध्ये लाल चंदनाच्या माळा घालून भक्त माँ दुर्गेच्या मंत्रांचा जप करतात. या वेळी नवरात्रीमध्ये लाल चंदनाच्या माळा घरी नक्की आणा. लाल चंदनाच्या जपमाळेने जप केल्याने दुर्गा देवीचा आशीर्वाद प्राप्त होतो.

दुर्गा देवीची मूर्ती

नवरात्रीच्या नऊ दिवसात दुर्गा देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. अनेकजण आपल्या घरी देवीची मूर्ती बसवतात. त्यामुळे नवरात्रीच्या काळात तुम्ही माता दुर्गेची मूर्ती घरी आणू शकता. याशिवाय घरातील मंदिरातही दुर्गेच्या पादुका ठेवता येतात. यामुळे भक्तांवर मातेची कृपा राहते.

साडी चोळी

नवरात्रीमध्ये दुर्गा देवीला लाल, गुलाबी किंवा पिवळ्या रंगाची साडी चोळी अर्पण करा. यामुळे माता दुर्गा प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात.  दुर्गेच्या आशीर्वादाने घरात समृद्धी येते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Non Stop LIVE Update
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....
महाराष्ट्रात महायुतीची लाट नाही त्सुनामी, भाजपन स्वतःचा मोडला रेकॉर्ड
महाराष्ट्रात महायुतीची लाट नाही त्सुनामी, भाजपन स्वतःचा मोडला रेकॉर्ड.
लाडक्या बहिणी वनसाईड महायुतीच्या बाजूने, सत्तेच्या दिशेने वाटचाल
लाडक्या बहिणी वनसाईड महायुतीच्या बाजूने, सत्तेच्या दिशेने वाटचाल.
मलिक बाप-लेक पिछाडीवर,अणूशक्तीनगर-मानखुर्द शिवाजीनगरमध्ये कोण आघाडीवर?
मलिक बाप-लेक पिछाडीवर,अणूशक्तीनगर-मानखुर्द शिवाजीनगरमध्ये कोण आघाडीवर?.
परळीत कोणाच्या घड्याळ्याची टीक-टीक वेगानं, राष्ट्रवादीत गुलाल कोणाचा?
परळीत कोणाच्या घड्याळ्याची टीक-टीक वेगानं, राष्ट्रवादीत गुलाल कोणाचा?.
कोपरी-पाचपाखाडीतून कोण आघाडीवर? एकनाथ शिंदे गड राखणार की...?
कोपरी-पाचपाखाडीतून कोण आघाडीवर? एकनाथ शिंदे गड राखणार की...?.
छगन भुजबळांना मोठा धक्का, EVM मोजणीत पिछाडीवर, येवल्यात गुलाल कोणाचा?
छगन भुजबळांना मोठा धक्का, EVM मोजणीत पिछाडीवर, येवल्यात गुलाल कोणाचा?.
माहिम मतदारसंघातील तिरंगी लढतीत आमित ठाकरे आघाडीवर, बाजी मारणार?
माहिम मतदारसंघातील तिरंगी लढतीत आमित ठाकरे आघाडीवर, बाजी मारणार?.
वरळीचा पहिला कल हाती, आदित्य ठाकरे आघाडीवर, विजयाचा गुलाल उधळणार?
वरळीचा पहिला कल हाती, आदित्य ठाकरे आघाडीवर, विजयाचा गुलाल उधळणार?.
बारामतीत अजितदादांना धक्का, पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर
बारामतीत अजितदादांना धक्का, पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर.