Navratri 2023 : आयुष्य, यश, शक्ती आणि आरोग्यात वाढ करणारी देवी कुष्मांडा, नवरात्रीचा चौथा दिवस व्यक्तिमत्त्व खुलविणाऱ्या निळ्या रंगाचा

कुष्मांडाच्या उपासनेमुळे भक्तांचा आजार बरा होतो. आयुष्य, यश, शक्ती आणि आरोग्यात वाढ होते. मनुष्य पूर्णपणे देवीला शरण गेला तर ही देवी प्रसन्न होते. त्याला शांती आणि समृद्धीच्या वाटेवर जाता येते.

Navratri 2023 : आयुष्य, यश, शक्ती आणि आरोग्यात वाढ करणारी देवी कुष्मांडा, नवरात्रीचा चौथा दिवस व्यक्तिमत्त्व खुलविणाऱ्या निळ्या रंगाचा
MATA KUSHMANDA AND NAVRTARI DAY 4 BLUE COLOUR Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: Oct 17, 2023 | 10:52 PM

मुंबई : 17 ऑक्टोबर 2023 | दुर्गेचे चौथे रूप म्हणजे देवी कुष्मांडा. आपल्या स्मित हास्यामुळे ब्रह्मांड उत्पन्न केल्यामुळे या देवीला कुष्मांडा देवी असे म्हटले जाते. नवरात्रीच्या चौथ्या दिवशी या देवीची पूजा केली जाते. ही सृष्टीची आद्यशक्ती आहे. ब्रह्मांडात असलेल्या सर्व वस्तू आणि प्राण्यांमधील तेज या देवीच्या कृपेमुळेच आहे. कमंडलू, धनुष्य, बाण, कमळाचे फूल, अमृत कलश, चक्र आणि गदा तिच्या अष्टभुजात सामावले आहे. आठव्या हातात जपमाळा त्यामुळे ही अष्टभुजा नावाने देखील प्रसिद्ध आहे. या दिवशी साधकाचे मत अदाहत चक्रात स्थिर झालेले असते. अत्यंत पवित्र आणि स्थिर मनाने कुष्मांडादेवीला समोर ठेवून पूजा उपासना करावी. नवरात्रीच्या चौथ्या दिवसाचा मान निळ्या रंगाला देण्यात आलाय.

अखिल जगताचा मनभावन असा हा निळा रंग. सगळ्यांत आवडता. वर पसरलेले निळसर शुभ्र आकाश आणि ७१ टक्के निळसर पाण्याने व्यापलेली भूमी. दोन्हीही निळेच. मन आणि शरीराला शीतल करणारी निसर्गातली ही निळी उधळण. प्रामाणिकपणा, विश्वासार्हता, आदर्शता याचा हा रंग. उत्तम संवाद, विचारांची देवाण-घेवाण, मनमोकळेपणा, विचारांची सुसूत्रता या रंगात आहे. म्हणूनच या रंगाची टॅगलाईन आहे, ‘आय स्पीक, आय अ‍ॅम हर्ड’.

आध्यात्मिक वैभव लाभलेय

पिंक फॉर गर्ल्स अँड ब्ल्यू फॉर बॉईज असं म्हणतात. पण, फक्त मुलांनाच नाही तर मुलींवर देखील निळ्या रंगछटेचे कपडे अधिक खुलून दिसतात. कान्हाचाही रंग निळाच. त्यामुळे या रंगाला आध्यात्मिक वैभव लाभलेय. आपल्या समजाच्या, जाणीवांच्या पलिकडचे जे आहे त्याचा रंग निळा. मग ते अथांग आकाश असेल नाही तर अथांग सागर, अथवा अनादी अनंत परमेश.

हे सुद्धा वाचा

खूपच प्रामाणिक आणि खरे आहात

सर्वांना आपलं म्हणणारा, सामावून घेणारा. या रंगाची मानसिकता अशी की हा रंग तुमचं व्यक्तिमत्त्व अधिक सकारात्मकरित्या लोकांसमोर आणतो. मुलाखतीला जाताना किंवा आपल्या क्लाएंटला भेटायला जाताना निळ्या रंगसंगतीचे कपडे घालावे असे एका रिसर्च मध्ये म्हटलंय. तुम्ही खूपच प्रामाणिक आणि खरे आहात असे हा रंग दर्शवतो.

आद्य परमेशाचा, समस्त मातांचा, मनमोहक, समुपदेशक, मनात अथांग प्रेमाचा ठेवा. इथे माता म्हणजे मातृभाव अपेक्षित आहे. मग ती काळ्या रात्रीत उभा कडा उतरुन जाणारी हिरकणी असेल वा आपल्या कच्याबच्यांना दोन घास पोटाला मिळावेत म्हणून उन्हातान्हात शेतात राबणारी माय असेल.

रश्मी पांढरे ( लेखिका निर्मात्या आणि सामाजिक कार्यकर्त्या आहेत.)

Non Stop LIVE Update
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्...
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्....
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य.
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात..
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात...
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान.
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?.
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले..
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले...
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप.
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?.
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा.
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?.