Shardiya Navratri : नवरात्रीच्या नऊ दिवसांत शरीराशी संबंधीत या चुका अवश्य टाळा, शास्त्रात दिले आहे कारण
नवरात्रीच्या दिवसांमध्ये तुम्ही काही चुका केल्या तर देवी लक्ष्मीला राग येऊ शकतो. तर आता आपण काही अशा गोष्टींबाबत जाणून घेणार आहोत ज्या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये चुकूनही केल्या नाही पाहिजेत.
मुंबई : सध्या नवरात्रीचे दिवस सुरू आहेत. नवरात्रीचा हा उत्सव लोक मोठ्या उत्साहात साजरा करत आहेत. तर या काळात लोक कडक उपवास करतात, देवीची पूजा करतात. तर नवरात्रीच्या दिवसांमध्ये लोक कडक असा व्रत पाळतात मग आहार असो किंवा काही अशा गोष्टी असतात ज्या नवरात्रीमध्ये खूप कडक पद्धतीने पाळल्या जातात.
नवरात्रीच्या काळामध्ये तुम्ही तुमच्या घरातील देव घराची नीट स्वच्छता करावी, देव्हाऱ्यासोबतच तुमच्या घराची देखील स्वच्छता करावी. तसेच देव्हाऱ्याची स्वच्छता केल्यानंतर तो देवारा छान, नीट सजवावा. कारण जर तुम्ही घरात अस्वच्छता ठेवली तर तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते, त्यामुळे नवरात्रीच्या दिवसांमध्ये घराची पूर्ण स्वच्छता करावी.
नवरात्रीच्या पवित्र सणामध्ये बहुतेक लोक त्यांचे केस कापतात. पण नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये केस कापण्याची चूक करू नका. कारण असे केल्यास दुर्गा मातेच्या प्रकोपाचा तुम्हाला सामना करावा लागू शकतो. त्यामुळे या दिवसांमध्ये केस कापणे टाळावे. नवरात्रीच्या दिवसांमध्ये तुम्ही चमड्याच्या वस्तू म्हणजेच पर्स असेल शूज असेल चप्पल असेल किंवा बेल्ट असेल अशा वस्तू वापरू नका.
नवरात्रीमध्ये तुम्ही घरामध्ये नख कापू नका. कारण नखे कापल्यामुळे देवी नाराज होते असे म्हटले जाते. त्याच्यामुळे या पवित्र दिवसांमध्ये नखे चुकूनही कापू नका. नवरात्रीच्या काळात मांसाहारी पदार्थांचे सेवन पण करू नका. मांसाहारी पदार्थांसोबतच मद्यपान करणे देखील टाळावे. मद्यपान आणि मांसाहारी पदार्थांचे सेवन केल्यामुळे देवीचा कोप होतो, त्याच्यामुळे चुकूनही या गोष्टींचे सेवन करू नका.
नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये कोणालाही अशुभ किंवा अपशब्द बोलू नये. तसेच या दिवसांमध्ये खोटं बोलण्याची चूक देखील करू नका. कारण नवरात्रीचे दिवस अगदी पवित्र मानले जातात त्यामुळे अपशब्द वापरू नका. नवरात्री अत्यंत पवित्र मानली जाते त्यामुळे या पवित्र दिवसांमध्ये चमड्याच्या गोष्टी वापरणे अशुभ मानले जाते. त्यामुळे चमड्याच्या वस्तू वापरणे टाळावे.