Navratri 2023 : स्कंदमातेच्या उपासनेने प्राप्त होते संतान सुख, करा हे उपाय
स्कंद म्हणजे ज्ञान आचरणात आणून कृती करणे. स्कंदमाता ही उर्जेचे एक रूप आहे जिच्या उपासनेचा उपयोग ज्ञान व्यवहारात आणण्यासाठी आणि पवित्र कर्मांचा आधार बनण्यासाठी केला जाऊ शकतो. अशा प्रकारे इच्छाशक्ती, ज्ञान शक्ती आणि कृती शक्ती यांचा मिलाफ असल्याचे शास्त्रात सांगितले आहे.
मुंबई : नवरात्रीचा उत्सव (Navratri 2023) दुर्गा देवीला समर्पित आहे. या दिवसात दुर्गेच्या 9 वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते. पंचांगानुसार यावेळी नवरात्रीच्या पाचव्या दिवसाची पूजा 19 ऑक्टोबरला म्हणजेच आज होणार आहे. पौराणिक मान्यतेनुसार माता स्कंदमातेची पूजा (Skandmata Puja) केल्याने संतती सुख प्राप्त होते. आज स्कंदमातेची पूजा केली जाणार आहे. देवी स्कंदमातेचे ध्यान केल्याने भक्तांना ध्यान आणि धार्मिक प्रगतीचा अनुभव येतो. शास्त्रानुसार, सिंहावर स्वार असलेल्या स्कंदमाता देवीला चार भूजा आहेत, ज्यामध्ये देवीने बाल कार्तिकेयाला तिच्या उजव्या हाताच्या वरच्या बाजूला आपल्या मांडीत घेतले आहे आणि खालच्या उजव्या हातात कमळाचे फूल धारण केले आहे. वरच्या डाव्या हाताने, ती जगत तरण वरद मुद्रा केली आहे आणि डाव्या हाताच्या खालच्या बाजूला कमळाचे फूल आहे. तिचा रंग पूर्णपणे गोरा आहे आणि ती कमळाच्या पीठावर विराजमान आहे, म्हणून तिला पद्मासन देवी असेही म्हणतात.
स्कंदचा अर्थ
स्कंद म्हणजे ज्ञान आचरणात आणून कृती करणे. स्कंदमाता ही उर्जेचे एक रूप आहे जिच्या उपासनेचा उपयोग ज्ञान व्यवहारात आणण्यासाठी आणि पवित्र कर्मांचा आधार बनण्यासाठी केला जाऊ शकतो. अशा प्रकारे इच्छाशक्ती, ज्ञान शक्ती आणि कृती शक्ती यांचा मिलाफ असल्याचे शास्त्रात सांगितले आहे. जेव्हा शिव तत्व त्रिशक्तीशी एकरूप होते तेव्हा स्कंद ‘कार्तिकेय’ जन्माला येतो. स्कंदमाता आपल्या भक्तांवर पुत्राप्रमाणे प्रेमाचा वर्षाव करते. आईच्या स्मरणानेच अशक्य कामे शक्य होतात. माता स्कंदमातेच्या कृपेने संततीचे सुख मिळते.
असा आहे स्कंदमातेचा स्वभाव आहे
स्कंदमाता कमळाच्या आसनावर विराजमान आहे, त्यामुळे तिला पद्मासन देवी असेही म्हणतात. धार्मिक ग्रंथांमध्ये, स्कंदमाता ही सूर्यमालेची प्रमुख देवता मानली जाते. देवी स्कंदमाता हिला पार्वती आणि उमा या नावांनीही ओळखले जाते.
अशाप्रकारे करा देवी स्कंदमातेची पूजा
नवरात्रीच्या पाचव्या दिवशी सकाळी स्नान करावे, स्वच्छ वस्त्र परिधान करावे आणि मातेचे ध्यान करावे. देवीची मूर्ती किंवा फोटो गंगाजलाने शुद्ध करा. त्यानंतर देवीला कुंकू, अक्षत, फुले, फळे इत्यादी अर्पण करा. देवीला पेढे आणि पाच प्रकारची फळे अर्पण करा. देवीचे मनोमन ध्यान करा. देवीसमोर शुद्ध तुपाचा दिवा लावावा. देवीची खऱ्या भावनेने पूजा करून आरती करावी. कथा वाचून शेवटी देवी स्कंदमातेच्या मंत्रांचा जप करावा.
उपासनेची पद्धत
सर्वप्रथम सकाळी लवकर उठणे, आंघोळ वगैरे केल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करावेत. यानंतर देवीच्या मूर्तीला गंगाजलाने अभिषेक करावा. त्यानंतर तिचे आवडते फूल अर्पण करावे. स्कंदमातेचे ध्यान केल्यानंतर मंत्राचा जप करावा. देवीची कथा वाचा आणि आरती करा.
माँ स्कंदमातेचा मंत्र
या देवी सर्वभूतेषु माँ स्कंदमाता रूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:।।
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)