Navratri 2023 | नवरात्रीमध्ये नऊ दिवस खा हे पदार्थ, उपवासाोबत तोंडाची चवही राहिल कायम!
नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये कोणते नवीन पदार्थ करायचे असा प्रश्न लोकांना पडतो. त्यामुळे आता आपण अशा नऊ पदार्थांबाबत जाणून घेणार आहोत जे तुम्ही नवरात्रीच्या दिवसांमध्ये करू शकता. तर आता आपण हे नऊ पदार्थ कोणते आहेत याबाबत जाणून घेणार आहोत.
मुंबई : सध्या नवरात्रीचा उत्सव मोठा उत्साहात साजरा केला जात आहे. नवरात्रीच्या दिवसांमध्ये बहुतेक लोक उपवास करतात. तर नवरात्रीच्या दिवसांमध्ये घरांमध्ये सात्विक अन्न तयार केले जाते. तसेच जेवणामध्ये कांदा, लसूणचा वापर केला जात नाही, त्यामुळे बहुतेक लोकांना नवरात्रीचे नऊ दिवसांमध्ये नेमके कोणते पदार्थ करायचे असा प्रश्न पडतो. कारण एकच पदार्थ सारखा सारखा खाल्ल्यामुळे कंटाळा येतो.
दुधी भोपळ्याचा हलवा – नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये तुम्ही दुधी भोपळ्याचा हलवा करू शकता. जर तुम्हाला काही गोड खाण्याचं मन होत असेल तर तुम्ही दुधी भोपळ्याचा हलवा करू शकता. हा हलवा बनवायला खूप सोपा आहे. यासाठी दुधी भोपळा किसून घ्या आणि तो तुपात तळून घ्या त्यानंतर त्यात साखर आणि दूध घाला आणि ड्रायफ्रूट्स घाला आणि ते छान शिजवून घ्या. हा हलवा खायला खूप स्वादिष्ट लागतो त्यामुळे तुम्ही ट्राय करू शकता.
आलू पराठा – नवरात्रीच्या काळामध्ये तुम्ही आलू पराठा ट्राय करू शकता. आलू पराठा खायला खूप स्वादिष्ट लागतो. तसेच बनवायला देखील खूप सोपा असतो. गव्हाच्या पिठामध्ये उकडलेला बटाटा मॅश करा आणि त्यामध्ये हिरव्या भाज्या, मिरची मिक्स करून त्याच्यापासून छान आलू पराठा तयार करा.
कुट्टूचा हलवा – नवरात्रीच्या काळात तुम्ही एखाद्या दिवशी कुट्टूचा हलवा बनवू शकता. हा हलवा खायला खूप चविष्ट लागतो. हा हलवा बनवायला देखील खूप सोपा आहे. यासाठी कुडट्टूचे पीठ छान भाजून घ्या नंतर ते दुधात चांगले शिजवून घ्या. त्यानंतर त्याच्यावर ड्रायफ्रूट्स टाका, हा हलवा खायला खूप स्वादिष्ट लागतो.
कसुरी आलू – पुरी – नवरात्रीच्या दिवसांमध्ये तुम्हाला वेगळा काही पदार्थ ट्राय करायचा असेल तर तुम्ही कसुरी आलू आणि पुरी बनवू शकता. हे बनवायला खूप सोप्पे आहे. त्यासाठी बटाटे उकडून घ्या आणि त्याचे बारीक काप करा. त्यानंतर एका फ्राय पॅनमध्ये तेल, जिरे, हिरवी मिरची आणि कसूरी मेथी आणि बटाटा घालून ते छान मिक्स करा आणि त्याची छान भाजी बनवा आणि ती पुरी सोबत खा.
मखनाची भाजी – पुरी – नवरात्रीच्या दिवसांमध्ये तुम्हाला चटपटीत काही खायची इच्छा असेल तर तुम्ही मखनाची भाजी आणि पुरी बनवू शकता. मखनाची भाजी बनवण्यासाठी दही आणि शेंगदाण्यापासून ग्रेव्ही बनवून घ्या आणि त्यानंतर त्यामध्ये मखना घालून ते शिजवून घ्या आणि त्यामध्ये तुमच्या आवडीनुसार मसाले टाका. तयार झालेली भाजी पुरीसोबत खा.
राजगिऱ्याची खीर – उपवासाच्या दिवसांमध्ये तुम्ही राजगिऱ्याची खीर आणि रोटी खाऊ शकता. तर राजगिराची खीर बनवण्यासाठी राजगिरा घ्या आणि तो दुधात चांगला शिजवून घ्या. त्यानंतर त्यामध्ये साखर आणि ड्रायफ्रूट्स घाला. ही तयार झालेली खीर तुम्ही रोटी सोबत खाऊ शकता.
डोसा – उपवासाच्या दिवसांमध्ये तुम्ही बटाट्याची भाजी आणि डोसा बनवू शकता. तांदळाचे पीठ बारीक करून त्याच्यापासून डोशाचे पीठ बनवा आणि त्यानंतर तुम्ही घरच्या घरी छान डोसे बनवू शकता. तसेच बटाट्याच्या भाजी सोबत ते तुम्ही खाऊ शकता.
शिंगाड्याची कढी – जर तुम्हाला चटपटीत काही खाण्याचं मन होत असेल तर तुम्ही उपवासाच्या दिवसांमध्ये शिंगाड्याची कढी बनू बनवू शकता. यामध्ये बेसन पिठाऐवजी तुम्ही पाणी टाकून, त्याला मोहरीची फोडणी देऊन ही कढी बनवू शकता.
पुलाव – नवरात्रीच्या दिवसांमध्ये तुम्ही पुलाव बनवू शकता. पुलाव बनवताना तुम्ही काजू, जिरे, वेगवेगळ्या भाज्या, मसाले वापरून स्वादिष्ट असा पुलाव बनवू शकता. तसेच हा पुलाव खायला देखील खूप चविष्ट लागतो.