नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे ते बाबा महाराज सातारकर… प्रसिद्ध कीर्तनकाराचा 86 वर्षांचा प्रेरणादायी प्रवास

आठव्या वर्षांपासून ते श्री सद्गुरू दादामहाराज यांच्या कीर्तनात अभंगांच्या चाली म्हणत असत. वयाच्या ११ व्या वर्षांपासून त्यांनी पुरोहितबुवा, आग्रा घराण्याचे लताफत हुसेन खाँ साहेब यांच्याकडे शास्त्रीय गायनाचे धडे घेतले.

नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे ते बाबा महाराज सातारकर... प्रसिद्ध कीर्तनकाराचा 86 वर्षांचा प्रेरणादायी प्रवास
baba-maharaj-satarkar
Follow us
| Updated on: Feb 05, 2022 | 7:19 AM

मुंबई : नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे (Nilkanth Dnyaneshwar More) सातारकर यांचा जन्म 5 फेब्रुवारी 1936 रोजी सातार्‍यात (Satara) झाला. पुढे त्यांनी वकिलीचे पदवीपर्यंतचे शिक्षण घेतल. वारकरी संप्रदायातील प्रमुख फड म्हणून त्यांच्या घराण्याच्या सातारकर फडाचे नाव घेतले जात असे. त्यांच्या कुळात १३५ वर्षांपासून वारकरी (Warkari)संप्रदायाची परंपरा चालू आहे. घराण्यात गेल्या तीन पिढ्यांपासून कीर्तनाची व प्रवचनाची परंपरा त्यांनी पुढे केली. त्यांचे वडील ज्ञानेश्वर दादामहाराज गोरे हे उत्कृष्ट मृदूंगवादक होते. त्यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई ज्ञानेश्वर गोरे यांना संत वाङ्मयाची आवड होती. बाबा महाराज सातारकर यांचे चुलते आप्पामहाराज आणि अण्णामहाराज यांच्याकडून त्यांनी परमार्थाचे धडे घेतले. बाबा महाराजांनी इंग्रजी माध्यमातून एस. एस. सी. पर्यंतचे शिक्षण घेतले. आठव्या वर्षांपासून ते श्री सद्गुरू दादामहाराज यांच्या कीर्तनात अभंगांच्या चाली म्हणत असत. वयाच्या ११ व्या वर्षांपासून त्यांनी पुरोहितबुवा, आग्रा घराण्याचे लताफत हुसेन खाँ साहेब यांच्याकडे शास्त्रीय गायनाचे धडे घेतले.

१९५० ते १९५४ या काळात बाबा महाराज यांनी लाकूड सामानाचा म्हणजेच फर्निचरचा व्यवसाय केला. पुढे परमार्थाला वाहून घेण्याचा निश्चय करीत त्यांनी हा व्यवसाय बंद केला. सुमारे १५० वर्षे परमार्थात मग्न असलेल्या सातारकर घराण्यातील बाबा महाराज यांच्याकडे ८० वर्षांपासून श्री. ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात मानकरी ही परंपरा आहे. तुकाराम महाराज पालखी सोहळ्याबरोबर ही मानकरी म्हणून परंपरा सातारकर घराण्याने सुमारे १०० वर्षे राखली आहे. १९६२ साली आप्पा महाराज यांच्या देहावसानानंतर त्यांची परंपरा बाबा महाराजांनी पुढे चालू ठेवली.

समाजप्रबोधन कार्य

डिसेंबर १९८३ पासून दरवर्षी संतांच्या गावी कीर्तन सप्ताह आयोजित करण्याची परंपरा त्यांनी सुरू केली. भंडारा डोंगर, देहू , त्र्यंबकेश्वर, नेवासे, पैठण, पंढरपूर, पिंपळनेर आदी ठिकाणी त्यांनी कीर्तन सप्ताहांचे आयोजन केले. बाबामहाराजांनी सुमारे १५ लाख व्यक्तींना संप्रदायाची दिक्षा देऊन त्यांना व्यसनमुक्त केले. १९८३ साली त्यांनी जनसेवेसाठी श्री. चैतन्य अध्यात्मिक ज्ञान प्रसार संस्थेची स्थापना केली. या संस्थेमार्फत ६० ते ७० हजार भाविकांना विनामूल्य वैद्यकीय सेवा तसेच औषधे पुरविण्यात येतात.

Baba Maharaj Satarkar  Biography in Marathi – श्री बाबामहाराज सातारकर यांची थोडक्यात माहिती

  1. पूर्ण नाव – नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे
  2. जन्म – 5 फेब्रुवारी 1936
  3. जन्मस्थान-  सातारा, महाराष्ट्र
  4. वडील-  पिता ज्ञानेश्वर
  5. आई – माता लक्ष्मीबाई
  6. पत्नीचे- नाव रुक्मीणी
  7. अपत्ये – भगवती(1958), रासेश्वरी(1962), चैतन्य(1963)
  8. पेशा – कीर्तनकार, प्रवचनकार
  9. धर्म – हिंदू
  10. भाषा मराठी

श्री बाबामहाराज सातारकर यांचे ट्रस्ट

१. श्री चैतन्य आध्यत्मिक ज्ञान प्रसार संस्था – १९८३ साली २. श्री बाबामहाराज सातारकर ज्ञानपीठ प्रतिष्ठान – १९९० साली या दोन ट्रस्ट चे संस्थापक अध्यक्ष श्री बाबामहाराज सातारकर आहेत.

  • संदर्भ : मराठी विश्वकोश
  • मराठी बायोग्राफी
  • श्री बाबामहाराज सातारकर ट्रस्ट

(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)

संबंधीत बातम्या : 

vastu | घरात झाडं लावताय ? मग राशीनुसार रोपे लावा मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील

Ganesh Jayanti 2022 | तू सुखकर्ता तू दुःखहर्ता म्हणतं, गणेश जयंती निमित्ताने राज्यातील देवस्थानांचे गाभारे सजले

Vasant Panchami 2022 | श्री कृष्णाला प्रिय असणाऱ्या वसंत पंचमीच्या दिवशी या मंत्रांचा जप नक्की करा

Non Stop LIVE Update
राष्ट्रवादीकडून 38 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, काय आहे वैशिष्ट्य?
राष्ट्रवादीकडून 38 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, काय आहे वैशिष्ट्य?.
शिवसेनेकडून विधानसभेच तिकीट मिळताच गुलाबराव पाटील म्हणाले, मला खात्री
शिवसेनेकडून विधानसभेच तिकीट मिळताच गुलाबराव पाटील म्हणाले, मला खात्री.
'आता गनिमी काव्याने डाव..', जरांगेंचा लवकरच पहिला उमेदवार जाहीर होणार
'आता गनिमी काव्याने डाव..', जरांगेंचा लवकरच पहिला उमेदवार जाहीर होणार.
मलिक वेटिंगवर... NCPच्या पहिल्या यादीत नाव नाही, तिकीट मिळणार की नाही?
मलिक वेटिंगवर... NCPच्या पहिल्या यादीत नाव नाही, तिकीट मिळणार की नाही?.
माहीममध्ये यंदा बिग फाईट, मनसे-शिंदे गट अन् ठाकरे गटामध्ये तिरंगी लढत
माहीममध्ये यंदा बिग फाईट, मनसे-शिंदे गट अन् ठाकरे गटामध्ये तिरंगी लढत.
निलेश राणे धनुष्यबाण हाती घेणार, कुडाळ येथे पक्षप्रवेशाची जय्यत तयारी
निलेश राणे धनुष्यबाण हाती घेणार, कुडाळ येथे पक्षप्रवेशाची जय्यत तयारी.
महायुतीतून भाजपचे 99, शिंदेचे 45 उमेदवार जाहीर, या 18 जागांवर पेच कायम
महायुतीतून भाजपचे 99, शिंदेचे 45 उमेदवार जाहीर, या 18 जागांवर पेच कायम.
'संजय राऊत हा कुत्र्यासारखा...', शहाजी बापू पाटलांची घसरली जीभ
'संजय राऊत हा कुत्र्यासारखा...', शहाजी बापू पाटलांची घसरली जीभ.
दादांच्या राष्ट्रवादीकडून पहिली यादी जाहीर, 'या' 38 उमेदवारांना संधी
दादांच्या राष्ट्रवादीकडून पहिली यादी जाहीर, 'या' 38 उमेदवारांना संधी.
शिंदे-भाजपात 5 जागांचा वाद, 2019 ला बंडानं खेळखंडोबा, यंदा काय होणार?
शिंदे-भाजपात 5 जागांचा वाद, 2019 ला बंडानं खेळखंडोबा, यंदा काय होणार?.