Neem Karoli Baba: या तीन चुका आयुष्यात कधीच करू नये, नीम करोली बाबांनी दिला होता उपदेश

महाराज म्हणतात की सर्व मानवांच्या हृदयात प्रभू श्री राम पहा. देवाचे रूप ओळखा. यानंतर तुम्ही सर्वांच्या प्रेमात पडाल. या संपूर्ण समाजात तुमचा शत्रू कधीच राहणार नाही.

Neem Karoli Baba: या तीन चुका आयुष्यात कधीच करू नये, नीम करोली बाबांनी दिला होता उपदेश
नीम करोली बाबाImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Feb 10, 2023 | 10:53 AM

मुंबई, प्रत्येक व्यक्तीकडून आयुष्यात कधी ना कधी नकळत चुका होतात. चुका होणे स्वाभाविक आहे. पण काही चुका अशा असतात ज्या चुकूनही करू नयेत. नीम करोली बाबांनी या विषयावर सविस्तर माहिती दिली आहे. नीम करोली बाबा (Neem Karoli Baba) यांचे नाव 20 व्या शतकातील महान संतांमध्ये गणले जाते. लोकं त्यांना हनुमानाचा अवतार माणतात. नीम करोली बाबांनी सांगितले होते की कोणत्या तीन मोठ्या चुका माणसाने चुकूनही करू नयेत.

1. सेवेची स्तुती-

नीम करोली बाबांनी त्यांच्या उपदेशाच्या तीन मुख्य स्तंभांमध्ये सेवेला सर्वोच्च मानले आहे. जे निस्वार्थीपणे दुसऱ्यांची सेवा करतात. देव त्यांना कोणत्या ना कोणत्या स्वरूपात फळ नक्कीच देतो. पण काही लोकं जाणूनबुजून किंवा नकळत इतरांसमोर आपल्या सेवेची फुशारकी मारू लागतात किंवा प्रशंसा करू लागतात. ही सवय काही लोकांमध्ये अनेकदा दिसून येते. सेवा किंवा परोपकार करणे ही खूप चांगली गोष्ट आहे. परंतु कोणत्याही प्रकारचे दान, श्रम किंवा मदत दिखाव्यासाठी करू नये.

महाराज म्हणतात की सेवेच्या भावनेने केलेली कामे आपण नेहमी गुप्त ठेवली पाहिजेत. जेव्हा तुम्ही अशा कामाची बढाई मारता तेव्हा तुमच्या मदतीची किंमत शून्य होते. जे तुम्हाला कधीच नको असेल. नि:स्वार्थीपणे केलेली सेवा कधीच व्यर्थ जात नाही. त्याचे फळ देव तुम्हाला नक्कीच देईल.

हे सुद्धा वाचा

2. असत्य आणि अन्यायाचे समर्थन करणे-

नीम करोली बाबा म्हणतात की आपण नेहमी सत्य आणि न्यायाचे समर्थन केले पाहिजे. या तत्त्वांचे पालन करणाऱ्या लोकांच्या जीवनात काही अडचणी नक्कीच येतात. पण देव न्यायप्रेमी लोकांची बाजू कधीच सोडत नाही. महाराज म्हणतात की, आपण कधीही कोणाचा हक्क मारू नये. आपण कधीही कोणावर अन्याय करू नये. तुम्ही सत्याच्या पाठीशी उभे राहिलात तर देव तुमच्या पाठीशी उभा राहील.

3. विषमतेची भावना-

नीम करोली बाबा म्हणतात की ज्या व्यक्तीच्या जीवनात विषमतेची भावना असते, त्याला कधीही सन्मान आणि यश मिळत नाही. जो गरीब-श्रीमंत-उच्च-नीच असा भेद लक्षात ठेवतो, त्याला कधीच भगवंताचा आशीर्वाद मिळत नाही. महाराज म्हणतात की समाजात राहणारा प्रत्येक माणूस समान आहे. देवाने प्रत्येकाला त्याच्या देवत्वाने परिपूर्ण बनवले आहे. दैवी रूप प्रत्येकामध्ये असते.

महाराज म्हणतात की सर्व मानवांच्या हृदयात प्रभू श्री राम पहा. देवाचे रूप ओळखा. यानंतर तुम्ही सर्वांच्या प्रेमात पडाल. या संपूर्ण समाजात तुमचा शत्रू कधीच राहणार नाही. समाजात तुम्हाला प्रिय स्थान मिळेल. विश्वाच्या प्रत्येक पात्राशी कनेक्ट व्हा. प्रत्येक पात्रावर प्रेम करा आणि असमानतेची भावना आतापासून सोडा.

मग देवाने आपल्याला किती दिव्यत्व दिले आहे ते बघता येईल. आपण किती भाग्यवान आहोत की देवाने आपल्याला या पृथ्वीवर जन्म दिला. मानवी शरीर मिळणे हे एक अमूल्य रत्न आहे. त्यामुळे हे जीवन व्यर्थ जाऊ देऊ नका. चांगल्या शिकवणीचा अवलंब करा.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.