Video | अरे हे काय? कुत्र्याला का झेंडुचा हार घातलाय? काय आहे ही प्रथा?
दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी इथे कुत्र्याची पूजा केली जाते. त्याला झेंडुच्या फुलांचा हार घातला जातो. त्याला कुकुर तिहार असं म्हणतात.
मुंबईः भारतात दिवाळीला (Diwali) धडाक्यात सुरुवात (Diwali Celebration) झाली आहे. लक्ष्मीपूजनाच्या (Laxmipujan) दिवशी घरातील धनलक्ष्मीची पूजा करण्यात आली. त्याआधी धनत्रयोदशी आणि वसुबारसेला गायीची पूजा करण्यात आली. पण एका ठिकाणी आज चक्क कुत्र्याची पूजा करण्यात आली. त्याला झेंडूच्या फुलांचा हार घालण्यात आलाय.
ही पूजा आहे नेपाळची. नेपाळ हा भारतासारखाच हिंदू संस्कृती इथे पाळली जाते. नेपाळमध्ये दिवाळीसारखाच चार दिवसांचा सण असतो. त्याला तिहार म्हणतात.
आपल्याकडे दिवे लावतात, दाराला झेंडुच्या फुलांचं तोरण लावतात, पणत्या लावतात. तसाच नेपाळचा हा तिहार सण.
दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी इथे कुत्र्याची पूजा केली जाते. त्याला झेंडुच्या फुलांचा हार घातला जातो. त्याला कुकुर तिहार असं म्हणतात.
दिवाळीत नेपाळमध्ये वेगवेगळ्या प्राण्यांची पूजा करतात. आधी गाय, कुत्रा, मग कावळा, बैल आदींची मनोभावे पूजा केली जाते. त्यांना फुलांचे हार घालतात.
आपण गाय-बैलाला लावतो, त्याप्रमाणे कुत्र्याला गंध लावतात. त्यांना दही दिलं जातं. तसेच दूध आणि अंडीही देतात.
पाहा नेपाळमधील पूजा-
VIDEO: Dogs in Nepal are treated to flower garlands and snacks for the Hindu festival of Kukur Tihar pic.twitter.com/KscXGLTUCK
— AFP News Agency (@AFP) October 24, 2022
पण कुत्र्यांचं पूजन का केला जातं, असा प्रश्न आहे. तर नेपाळमधील हिंदु संस्कृतीनुसार, कुत्रा हा यमाचा दूत मानला जातो. आपल्या मृत्यूनंतरही कुत्रे आपलं रक्षण करतात, असा समज आहे. कुत्र्याने आपल्याबरोबर सदैव राहवं, यासाठी ही पूजा केली जाते.
नेपाळमधील समज आणि श्रद्धा असली तरीही भटक्या कुत्र्यांना, भटक्या प्राण्यांना जेऊ घालण्याची आत्मीयता आपल्याकडेही अनेकजण बाळगतात. दिवाळीला रस्त्यावरील भटक्या प्राण्यांना जेऊ घालतात. कोरोना काळात तर अनेक स्वयंसेवी संस्थांनी या प्राण्यांना जगवण्यासाठी सरकारकडून विशेष परवानगी घेऊन त्याना खाऊ घातलं, हेही विसरता येणार नाही.