Ganpati Bappa: आज संकष्टी चतुर्थी गणपती बाप्पाची आराधना करताना ‘या’ गोष्टी कधीच विसरू नका, बाप्पाचे आशीर्वाद लाभतील
संकष्टीच्या उपवास करून चंद्रोदय झाल्यावर चंद्राला व गणपतीला नैवेद्य दाखवावा त्यानंतर उपवास सोडावा.
गणपत्ती बाप्पाची (Ganpati Bappa) कृप्पा ज्याव्यक्तीवर लाभते तो सुख, (Happiness) समृद्धी आणि आनंदी जीवन जगतो. गणपती बाप्पांना विद्येची देवता मानलं जातं. तुम्हाला श्री गणेशाचे आशीर्वाद (Blessings) हवे असतील. गणपती बाप्पाला प्रसन्न करायचे असेल तर यागोष्टी नक्की करा.श्री गणेशाच्या पूजा करताना हळद- कुंकू अर्पण करावे. कुंकू वाहिल्याने गणेशाची कृपा लाभते. त्यासोबत घरात सुख, शांती समृद्धी नांदते.
पूजा करताना दुर्वांचा वापर
श्री गणेशाला प्रसन्न करण्यासाठी पुजेत दुर्वा अर्पण करा. दुर्वाला गणपती बाप्पांना अत्यंत आवडत्या असतात. पुजा करताना 21 दुर्वा एकत्र करून एक गाठ बांधावी आणि त्यानंतर गणेशाच्या डोक्यावर 21 दुर्वा अर्पण कराव्यात.
शमी पत्र
गणपती बाप्पांची पुजा करताना पुजेत शमीच्या पानांचा वापर करावा. श्रीगणेशाला शमीची पानं अर्पण केल्याने बुद्धी तीक्ष्ण होते. आयुष्यातील दु:खांचा नाश होतो. मानसिक समाधान लाभते.
पूजा कशी कराल
संकष्टीचा दिवसभर उपवास केल्याने गणपती पूजन करताना. गणेश अथर्वशीर्ष किंवा गणपती स्त्रोत 11 किंवा 21 वेळा म्हणावे. तुम्ही खूपच बिझी असाल तर किमान एकदा एका जागी स्थिर बसून गणेश अथर्वशीर्ष म्हणावे याने मन व डोकं शांत राहतं. मन, डोकं आणि चित्तं शांत राहतं. मन आणि डोकं शांत असलं की नवनवीन गोष्टी आत्मसात करण्यास मदत होते.
संकष्टीच्या दिवशी गणपती बाप्पाला जास्वंदाचे फुल आणि दुर्वांची जुडी अर्पण करावी. दोन्ही गोष्टी गणपती बाप्पांच्या अत्यंत आवडीच्या आहेत. पण, या दोन्ही गोष्टी उपलब्ध नसतील तर तुम्ही पर्यात म्हणून लाल फुल, शमी पत्र देखील वाहू शकता. गणपतीच्या पायावर तांदुळ वाहावे.
उपवास कसा सोडावा
संकष्टी चतुर्थीचा उपवास सोडताना चंद्राचे दर्शन घेऊनच मग उपवास सोडावा. संकष्टीच्या दिवशी चंद्राचे दर्शन घेतल्यानंतरच उपवास सोडावा. चंद्राचे दर्शन घेणं शुभ मानलं जातं. चंद्र दर्शन घेताना चंद्राची पुजा करावी, चंद्राला दिवा दाखवून ओवाळावे.संकष्टीच्या उपवास करून चंद्रोदय झाल्यावर चंद्राला व गणपतीला नैवेद्य दाखवावा त्यानंतर उपवास सोडावा.
मोदकांचा प्रसाद
लाडू आणि मोदक गणेशाला खूप प्रिय आहेत तुम्ही गणपतीला अर्पण करू शकता. मोदक गणपती बाप्पाला खूप आवडतात. पण, जर मोदकांचा नैवेद्य दाखवणं शक्य नसेल तर तुम्ही गुळ खोबऱ्याचा नैवेद्य ही दाखवू शकता. गणेशाला मोदकांचा किंवा गोड पदार्थांचा नैवेद्य दाखविल्याने गणपती बाप्पा प्रसन्न होतात.
(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे. यासंदर्भात आम्ही कोणताही दावा करत नाही.)