वास्तु शास्त्रात काही रोपांना विशेष महत्व आहे. काही विशिष्ट रोपं घरात लावल्याने घरात सुख समृद्धी येते. त्यारोपांपैकी एक मनी प्लांट आहे. हे रोप घरात असणं खूप शुभ मानलं जातं. हे लावताना काही गोष्टी लक्षात घेणं फार महत्वाचं आहे. मनी प्लांट लावताना कोणत्या बाबींकडे लक्ष दिलं पाहिजे.
योग्य दिशेला लावा मनी प्लांट - मनी प्लांट योग्य दिशेला लावणं गरजेचं आहे. मनी प्लांट हे दक्षिण पूर्व म्हणजेच आग्नेय कोपऱ्यात लावणं शुभ मानलं जातं. हे उत्तर पूर्व म्हणजे ईशान्य कोपऱ्यात अजिबात लावू नका त्याने घरातील सदस्यांवर नकारात्मक परिणाम होतात. घरात पश्चिम आणि पूर्व दिशेला मनी प्लांट लावू नका.
जमीनवर लोळू देऊ नका - मनी प्लांटची वाढ भरभर होते. मनी प्लांट रोपाच्या वाढत्या रोपाच्या फांदीला दोऱ्याने वरच्या दिशेला बांधा. वास्तुशास्त्रानुसार हे प्रगतीचे प्रतीक मानले जाते. या रोपाला देवी लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते. त्यामुळे मनी प्लांटच्या फांद्या जमीनीवर लोळत पडू देऊ नका.
सुखलेली पानं काढून टाका - मनी प्लांट सुखणं हे दुर्भाग्याचं प्रतीक मानलं जातं. याने घरातील आर्थिक स्थितीवर वाईट परिणाम होतो. त्युमळे नियमीत याची काळजी घेत रहा. काही पानं सुखली तर ती तोडून टाका.
दुसऱ्यांच्या घरातून मनी प्लांट आणू नका - कधी कोणाच्या घरातून मनी प्लांटचे रोप तोडून आणू नका. लोकांच्या घरातून तोडून आणलेले मनी प्लांट तुमच्या घरी लावू नका. इतकंच नाही तर तुमचं मनी प्लांटचे रोप कोणाला देऊ नका. वास्तुशास्त्रानुसार असं करणं चुकीचं मानलं जातं. जर कोणाच्या घरात काही त्रास असतील तर मनी प्लांटच्या माध्यमातून तुमच्या घरात येऊ शकतात. (दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.यासंदर्भात आम्ही कोणताही दावा करत नाही.)