पैसे मोजतांना कधीच करू नका या चुका, अन्यथा लक्ष्मी होऊ शकते नाराज!
तुमच्या घरात बरेच पैसे आहेत मात्र वेळेनुसार ते हातातून निघून जातात. म्हणजेच नको तेवढे पैसे खर्च होतात. असे झाल्यास समजून जा की तुमच्या वास्तूमध्ये मोठा दोष आहे.
मुंबई, माता लक्ष्मीला संपत्तीची देवी मानले जाते. ज्या व्यक्तीवर देवी लक्ष्मीची कृपा असते, तीच्या आयुष्यात कधीही धनाची कमतरता नसते पण पैशाच्या बाबतीत केलेल्या काही चुका देवी लक्ष्मीला नाराज करू शकते. नोटा मोजताना अनेकदा लोकं नकळत काही चुका करतात, ज्यामुळे माता लक्ष्मीचा कोप होऊ शकतो. त्यामुळे पैसे मोजताना आणि ते सांभाळताना काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. ते नियम (Astro tips For Money) काय आहेत ते जाणून घेऊया.
थुंकीचा वापर करू नये
तुमच्या घरात बरेच पैसे आहेत मात्र वेळेनुसार ते हातातून निघून जातात. म्हणजेच नको तेवढे पैसे खर्च होतात. असे झाल्यास समजून जा की तुमच्या वास्तूमध्ये मोठा दोष आहे. वास्तुच्या मते, कधीही पैसे मोजत असताना हाताने त्यावर थुंकीचा वापर करू नये. असे केल्याने पैशांचा अनादर होतो. जर का नोट एकमेकांना चिकटल्या असतील तर एका छोट्याशा भांड्यात पाणी घेऊन हलक्या हाताने बोटावर पाण्याच्या मदतीनं नोटा मोजाव्या.
खाण्या-पिण्याच्या गोष्टी ठेवू नये
पर्समध्ये पैशांसोबत कधीही खाण्या-पिण्याच्या गोष्टी ठेवू नये. त्याव्यतिरिक्त पर्समध्ये कोणत्याही प्रकारची थकबाकी असलेले बिलाची पावती ठेवू नका. तसेच कधीही हातातून किंवा पर्समधून पैसे पडल्यावर ते डोक्यावर लावूनच पुन्हा पर्समध्ये ठेवावे. असे न केल्यास समजून जा की भविष्यात तुम्हाला आर्थिक समस्येला सामोरे जायचे आहे.
पैसे देण्याची पद्धत
एखाद्याला पैसे देत असताना अनेकांना ही सवय असते की ते पैसे फेकून देतात. नोटा आणि नाणी फेकल्याने देवी लक्ष्मी खूप क्रोधित होऊ शकते. असे केल्याने माता लक्ष्मीचा अपमान होतो. बऱ्याचदा हातातून पैसे खाली पडतात आणि लोकं उचलतात आणि तसेच ठेवतात. असे करू नये. पैसे पडले तर ते उचलून आधी कपाळावर लावावे आणि नंतर योग्य ठिकाणी ठेवावे.
नोटा सांगतात भविष्य
जर का रस्त्यावर पडलेली कोणतीही नोट सापडली तर त्याचा अर्थ असा होतो की, तुम्हांला तुमच्या परिस्थितींना गंभीरतेने पाहणे गरजेचे आहे. स्वतःवर विश्वास ठेवून आपल्या निर्णयांना कार्यरूप देण्याची आवश्यकता आहेत. त्यामुळे तुम्हांला चांगलं यश प्राप्त होईल.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)