New Year 2024 : नवीन वर्षात राशीनुसार करा महादेवाचा अभिषेक, मिळेल भाग्याची साथ

नवीन वर्ष 2024 लागायला अवघे काहीच दिवस शिल्लक आहेत. येणारे वर्ष आपल्याला सुख समृद्धीचे जावो अशी प्रत्त्येकाचीच इच्छा असते. या नवीन वर्षाचा पहिला दिवस हा सोमवार येत आहे. सोमवार हा महादेवाला समर्पित असतो, त्यामुळे या दिवशी तुमच्या राशीनुसार महादेवाला अभिषेक केल्यास संपूर्ण वर्षभर नशीबाची साथ लाभेल.

New Year 2024 : नवीन वर्षात राशीनुसार करा महादेवाचा अभिषेक, मिळेल भाग्याची साथ
शिवलिंग
Follow us
| Updated on: Dec 19, 2023 | 5:35 PM

मुंबई : या वेळी सोमवारपासून नवीन वर्ष 2024 (New Year 2024) सुरू होत आहे. सोमवार हा महादेव शंकराला समर्पित आहे, म्हणून या दिवशी भोले शंकर आणि माता पार्वतीची पूजा विधीपूर्वक केली जाते. भगवान भोलेनाथ अत्यंत दयाळू आणि शिघ्र प्रसन्न होणारे देवता आहेत. म्हणूनच फक्त अभिषेक केल्यानेही महादेवाची कृपा प्राप्ती होते. महादेवाचा आशीर्वाद ज्याच्यावर असतो तो रंकाचाही राजा होतो. जर तुम्हालाही नवीन वर्षात भगवान शंकराचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर वर्षाच्या पहिल्या दिवशी तुमच्या राशीनुसार महादेवाला अभिषेक करा.

राशीनुसार असा करा अभिषेक

मेष – नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी मेष राशीच्या लोकांनी गंगाजलात मध आणि सुगंध मिसळून महादेवाला अभिषेक करावा.

वृषभ – नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी वृषभ राशीच्या लोकांनी भगवान शंकराला कच्च्या दुधाचा अभिषेक करावा.

हे सुद्धा वाचा

वृश्चिक – नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी वृश्चिक राशीच्या लोकांनी गंगाजलात सुगंध मिसळून भगवान शिवाला अभिषेक करावा.

धनु – नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी धनु राशीच्या लोकांनी गंगाजलात बेलपत्र आणि दुर्वा मिसळून महादेवाला अभिषेक करावा.

मकर – नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी मकर राशीच्या लोकांनी गंगाजलात काळे तीळ मिसळून भगवान शिवाला अभिषेक करावा.

कुंभ – नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी कुंभ राशीच्या लोकांनी गंगाजलात पांढरे फुल टाकून भगवान शिवाला अभिषेक करावा.

मिथुन – नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी मिथुन राशीच्या लोकांनी पाण्यात दुर्वा मिसळून भगवान शिवाला अभिषेक करावा.

कर्क – नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी कर्क राशीच्या लोकांनी तिन्ही जगाचा स्वामी असलेल्या महादेवाला कच्च्या दुधात गंगाजल मिसळून अभिषेक करावा.

सिंह – नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सिंह राशीच्या लोकांनी भगवान शिवाला उसाच्या रसाने अभिषेक करावा.

कन्या – नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी कन्या राशीच्या लोकांनी गंगाजलात बेलपत्र आणि भांगाची पाने मिसळून भगवान शिवाला अभिषेक करावा.

तूळ – नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तूळ राशीच्या लोकांनी भगवान शिवाला शुद्ध तुपाचा अभिषेक करावा.

मीन – नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी मीन राशीच्या लोकांनी कच्च्या दुधात बेलपत्र किंवा भांगाची पाने मिसळून भगवान शिवाला अभिषेक करावा.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.