Nirjala Ekadashi 2023 : निर्जला एकादशीच्या व्रताने मिळते वर्षभराच्या एकादशीचे पुण्य, पुजा विधी आणि नियम
ज्योतिषांच्या मते, निर्जला एकादशी व्रताच्या दिवशी सकाळी उठून प्रथम स्नान करून नवीन वस्त्रे परिधान करावीत. यानंतर पूजागृहात तुपाचा दिवा लावावा आणि व्रताचा संकल्प घ्यावा.
मुंबई : ज्येष्ठ महिन्यातील निर्जला एकादशी (Nirjala Ekadashi 2023) ही सर्व एकादशींमध्ये श्रेष्ठ मानली जाते. ही एकादशीही खूप कठीण असते. याला भीमा एकादशी म्हणतात. भगवान विष्णूची पूजा करण्यासाठी वर्षातून 24 वेळा एकादशी येते. या सर्व एकादशी वेगवेगळ्या नावांनी ओळखल्या जातात. निर्जला एकादशीला भीमा एकादशी सुद्धा म्हणतात. या व्रताला पूजा करण्याची पद्धत काय आहे आणि त्याचे महत्त्व काय आहे, याविषयी जाणून घेणे आवश्यक आहे, तर जाणून घेऊया या खास एकादशीबद्दल.
निर्जला एकादशी पूजा विधी
ज्योतिषांच्या मते, निर्जला एकादशी व्रताच्या दिवशी सकाळी उठून प्रथम स्नान करून नवीन वस्त्रे परिधान करावीत. यानंतर पूजागृहात तुपाचा दिवा लावावा आणि व्रताचा संकल्प घ्यावा. यासह, भगवान विष्णूची पूजा करण्यापूर्वी, प्रथम गंगाजलाने अभिषेक करा. यानंतर देवाला चंदन आणि हळदीचा तिलक लावावा. यानंतर भगवान विष्णूला फुले, पिवळे वस्त्र, जाणवे, अक्षत, नैवेद्य, तुळशीदल इत्यादी अर्पण करावे. यानंतर निर्जला एकादशीची व्रत कथा ऐका आणि जोडीदारासोबत आरती करा. दिवशी भगवान विष्णूसह लक्ष्मीजींची पूजा करा आणि अन्न आणि पाणी दोन्हीचा त्याग करा.
निर्जला एकादशी व्रताचे नियम
निर्जला एकादशी व्रताचे नियम दशमी तिथीपासूनच सुरू होतात. दशमी तिथीच्या रात्री अन्नपाणी ग्रहण केले जात नाही. दुसऱ्या दिवशी एकादशी तिथीला सूर्योदय व सूर्यास्त होईपर्यंत अन्नपाणी ग्रहण करू नये. या दिवशी निर्जला व्रत पाळले जाते. द्वादशी तिथीला पारण झाल्यावरच पाणी किंवा अन्न ग्रहण केले जाते.
मुहूर्त
- निर्जला एकादशी: 31 मे 2023 बुधवार
- ज्येष्ठ शुक्ल पक्ष एकादशी तिथी प्रारंभ: 30 मे 2023 मंगळवार
- ज्येष्ठ शुक्ल पक्ष एकादशी तिथी समाप्त: 31 मे 2023 बुधवार
- निर्जला एकादशी पारण मुहूर्त: 1 जून 2023 गुरुवार
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)