अंकशास्त्रात (Numerology 10 June 2022) , एखाद्या व्यक्तीचा मूलांक हा त्या व्यक्तीच्या तारखेची बेरीज असतो. उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीचा जन्म 23 एप्रिल रोजी झाला असेल, तर त्याच्या जन्मतारखेच्या अंकांची बेरीज 2+3=5 आहे. म्हणजेच 5 या अंकाला त्या व्यक्तीचे मूलांक म्हटले जाईल. जर एखाद्याची जन्मतारीख दोन अंकी म्हणजेच 11 असेल तर त्याची मूलांकिका 1 + 1 = 2 असेल. तर एकूण जन्मतारीख, जन्म महिना आणि जन्म वर्ष याला भाग्यांक (10 June lucky number) म्हणतात. उदाहरणार्थ, जर एखाद्याचा जन्म 22-04-1996 रोजी झाला असेल तर या सर्व संख्यांच्या बेरजेला भाग्यांक म्हणतात. 2+2+0+4+1+9+9+6=33=6 म्हणजे त्याचा भाग्यांक 6 आहे. अंकशास्त्राच्या मदतीने तुम्ही तुमच्या दैनंदिन योजना यशस्वी करू शकता. अंकशास्त्राच्या आधारे तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही हे दैनिक अंकशास्त्रानुसार तुम्हाला कळू शकेल. आज तुम्हाला कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागू शकतो किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात. दैनिक अंकशास्त्र अंदाज वाचून, तुम्ही दोनीही परिस्थितीसाठी तयार राहाल.
- अंक-1
आजचा दिवस संमिश्र जाईल. उत्पन्न आणि खर्च दोन्ही असतील. पैशांचे नियोजन केल्याने बचत होईल. मात्र येत्या काही दिवसांत खर्च वाढू शकतो. विवाह इच्छुकांना मागणी येऊ शकते. मेहनतीचे फळ मिळेल. कायदेशीर बाबींमध्ये यश मिळेल.
शुभ अंक- 9
शुभ रंग – गुलाबी
- अंक- 2
पैसे कमवण्याचा दिवस आहे. आर्थिक प्रगती करू शकाल. कामाच्या ठिकाणी आज तुम्ही तणावात राहू शकता. कार्यालयीन सहकाऱ्यांपासून सावध राहा, तुमच्याबद्दल चहाड्या होऊ शकतात. भविष्यातील योजना बनवण्यासाठी जोडीदाराचे सहकार्य मिळेल. कमी अंतराचा प्रवासही शक्य आहे.
शुभ अंक- 5
शुभ रंग – निळा
- अंक-3
नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. नशीब साथ देईल. बुद्धीचातुर्यामुळे रखडलेली कामे मार्गी लागतील. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. प्रियकराला संतुष्ट करण्यासाठी तुम्हाला अधिक प्रयत्न करावे लागतील.
शुभ अंक- 9
शुभ रंग – पिवळा
- अंक- 4
दिवसभर उत्साह असेल. महत्वाचा निर्णय घेण्यापूर्वी विचार करा. कामाच्या ठिकाणी कौशल्य पाहून लोक प्रभावित होतील आणि आदरही मिळेल. व्यावसायिक प्रवास फायदेशीर ठरेल. नवीन करार होऊ शकतो.
शुभ अंक- 11
शुभ रंग – लिंबू
- अंक -5
आज भरपूर पैसा आणि नफा तुमच्या नशिबात आहे . ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. धार्मिक कार्यात सहभाग घ्याल. रागाला आवार घाला.
शुभ अंक- 12
शुभ रंग – हलका निळा
- अंक- 6
आज तुम्हाला काही चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कामाचे इच्छित फळ मिळेल.
शुभ अंक- 10
शुभ रंग – हलका निळा
- अंक- 7
आरोग्याच्या दृष्टीकोनातून आजचा दिवस चांगला त्रासदायक असेल. थकवा आणि अशक्तपणा जाणवल्याने तुमची चिडचिड होऊ शकते. परीक्षेत यश मिळेल. पैसा जपून वापरा.
शुभ अंक – 3
शुभ रंग – भगवा
- अंक- 8
नोकरदार लोकांसाठी आजचा दिवस खूप शुभ आणि यशस्वी राहील. कामाच्या ठिकाणी सम्मान मिळेल. ज्याने तुमचे मन प्रसन्न होईल. दुसरीकडे, व्यवसायात व्यस्त असलेल्या लोकांसाठी दिवस लाभदायक असेल.
शुभ अंक- 2
शुभ रंग- तपकिरी
- अंक- 9
वाडवडिलांच्या मालमत्तेतून लाभ मिळण्याची शक्यता आहे. कार्यालयातून आलेला फोन तुमचा दिनक्रम बदलू शकतो. मित्रांशी बोला, तुमचे मन हलके होईल.
शुभ अंक- 25
शुभ रंग- हिरवा
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)