Numerology 19 june 2022: या लोकांनी उधार-उसने देणे टाळावे; अंकशास्त्रानुसार असा असेल तुमचा दिवस
अंकशास्रानुसार (Numerology 19 june 2022), एखाद्या व्यक्तीचा मूलांक हा त्या व्यक्तीच्या तारखेची बेरीज असतो. उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीचा जन्म 23 एप्रिल रोजी झाला असेल, तर त्याच्या जन्मतारखेच्या अंकांची बेरीज 2+3=5 आहे. म्हणजेच 5 या अंकाला त्या व्यक्तीचे मूलांक म्हटले जाईल. जर एखाद्याची जन्मतारीख दोन अंकी म्हणजेच 11 असेल तर त्याची मूलांकिका 1 + 1 = […]
अंकशास्रानुसार (Numerology 19 june 2022), एखाद्या व्यक्तीचा मूलांक हा त्या व्यक्तीच्या तारखेची बेरीज असतो. उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीचा जन्म 23 एप्रिल रोजी झाला असेल, तर त्याच्या जन्मतारखेच्या अंकांची बेरीज 2+3=5 आहे. म्हणजेच 5 या अंकाला त्या व्यक्तीचे मूलांक म्हटले जाईल. जर एखाद्याची जन्मतारीख दोन अंकी म्हणजेच 11 असेल तर त्याची मूलांकिका 1 + 1 = 2 असेल. तर एकूण जन्मतारीख, जन्म महिना आणि जन्म वर्ष याला भाग्यांक (19 june lucky number) म्हणतात. उदाहरणार्थ, जर एखाद्याचा जन्म 22-04-1996 रोजी झाला असेल तर या सर्व संख्यांच्या बेरजेला भाग्यांक म्हणतात. 2+2+0+4+1+9+9+6=33=6 म्हणजे त्याचा भाग्यांक 6 आहे. अंकशास्त्राच्या मदतीने तुम्ही तुमच्या दैनंदिन योजना यशस्वी करू शकता. अंकशास्त्राच्या आधारे तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की, नाही हे दैनिक अंकशास्त्रानुसार तुम्हाला कळू शकेल. आज तुम्हाला कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागू शकतो किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात. दैनिक अंकशास्त्र अंदाज वाचून, तुम्ही दोनीही परिस्थितीसाठी तयार राहाल.
- अंक-1 कर्जाची परतफेड करणे शक्य होईल. कामाच्या ठिकाणी गोड बोलून कनिष्ठांकडून कामं करून घ्यावी लागेल. दिवस संमिश्र राहील वातावरणातल्या बदलाचा आनंद घ्याल. शुभ अंक- 11 शुभ रंग – शेवाळी
- अंक- 2 जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना चांगली बातमी मिळू शकते. वडिलांसीबतचे मतभेद दूर होतील. अचानक अनावश्यक खर्च आल्याने चिडचिड होइल. कुटुंबियांसोबत संध्याकाळचा वेळ मजेत घालवाल. शुभ अंक- 21 शुभ रंग – पांढरा
- अंक- 3 आर्थिक व्यवहार करत असाल तर त्याचे साक्षीदार ठेवा, अन्यथा फसवणूक होण्याची शक्यता आहे. तुमच्या निर्णय क्षमतेचा फायदा तुम्हाला मिळेल. व्यवसायात प्रगती संभवते. शुभ अंक- 31 शुभ रंग- हिरवा
- अंक- 4 आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत फलदायी असेल. विद्यार्थ्यांना भविष्यासाठी योग्य दिशा सापडेल. चैनीच्या काही गोष्टींवर पैसे खर्च कराल. विरोधकांच्या कारस्थानावर लक्ष ठेवा. शुभ अंक- 51 शुभ रंग – भगवा
- अंक- 5 नोकरीच्या ठिकाणी उच्च अधिकार्यांच्या कृपेने तुम्हाला बढती किंवा पगारवाढ मिळू शकते. अति साहस घटक ठरेल. उधार उसने देणे टाळा. शुभ अंक- 19 शुभ रंग- नारिंगी
- अंक- 6 व्यवसायातील समस्या अनुभवी लोकांच्या सल्ल्याने सोडवा. कामामध्ये प्रामाणिकपणा ठेवा. मुलांच्या भविष्याची चिंता राहील. शुभ अंक- 17 शुभ रंग- तपकिरी
- अंक- 7 कामाच्या ठिकाणी कोणतीही प्रतिकूल परिस्थिती उद्भवली तरी तुम्हाला त्यात संयम ठेवावा लागेल तरच त्यातून तुम्ही बाहेर पडू शकाल. कुटुंबात आनंदी वातवरण राहील. मित्रांसोबत वेळ घालवाल. शुभ अंक- 15 शुभ रंग – गुलाबी
- अंक- 8 धार्मिक विधींमध्येही तुम्हाला रस असेल. नवीन मालमत्ता खरेदी करणार असाल तर ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. संध्याकाळी धनाशीसंबंधित काही शुभ माहिती ऐकायला मिळू शकते. शुभ अंक- 29 शुभ रंग – जांभळा
- अंक- 9 आजचा दिवस तुमच्यासाठी आनंददायी असेल. कुटुंबात उत्साहाचे वातावरण असेल. नवीन मालमत्ता खरेदी करण्याची तुमची इच्छा पूर्ण होईल. शुभ अंक – 27 शुभ रंग- लाल
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)