Numerology 2 july 2022: अंकशास्त्रानुसार कसा जाईल तुमचा आजचा दिवस?; ‘या’ भाग्यांकाच्या नशिबात आहे धनलाभ योग

अंकशास्त्राच्या मदतीने तुम्ही तुमच्या दैनंदिन योजना यशस्वी करू शकता. अंकशास्त्राच्या आधारे तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही हे दैनिक अंकशास्त्रानुसार तुम्हाला कळू शकेल.

Numerology 2 july 2022:  अंकशास्त्रानुसार कसा जाईल तुमचा आजचा दिवस?; 'या' भाग्यांकाच्या नशिबात आहे धनलाभ योग
Follow us
| Updated on: Jun 02, 2022 | 1:25 PM

अंकशास्त्रानुसार (Numerology 2 july 2022) , एखाद्या व्यक्तीचा मूलांक हा त्या व्यक्तीच्या तारखेची बेरीज असतो. उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीचा जन्म 23 एप्रिल रोजी झाला असेल, तर त्याच्या जन्मतारखेच्या अंकांची बेरीज 2+3=5 आहे. म्हणजेच 5 या अंकाला त्या व्यक्तीचे मूलांक म्हटले जाईल. जर एखाद्याची जन्मतारीख दोन अंकी म्हणजेच 11 असेल तर त्याची मूलांकिका 1 + 1 = 2 असेल. तर एकूण जन्मतारीख, जन्म महिना आणि जन्म वर्ष याला भाग्यांक (todays lucky number) म्हणतात. उदाहरणार्थ, जर एखाद्याचा जन्म 22-04-1996 रोजी झाला असेल तर या सर्व संख्यांच्या बेरजेला भाग्यांक म्हणतात. 2+2+0+4+1+9+9+6=33=6 म्हणजे त्याचा भाग्यांक 6 आहे. अंकशास्त्राच्या मदतीने तुम्ही तुमच्या दैनंदिन योजना यशस्वी करू शकता. अंकशास्त्राच्या आधारे तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही हे दैनिक अंकशास्त्रानुसार तुम्हाला कळू शकेल. आज तुम्हाला कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागू शकतो किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात. दैनिक अंकशास्त्र अंदाज वाचून, तुम्ही दोनीही परिस्थितीसाठी तयार होऊ शकता.

चला तर मग जाणून घेऊया अंकशास्त्राद्वारे तुमचा मूलांक, शुभ अंक आणि भाग्यशाली रंग कोणता आहे. (Numerology 2 july 2022)

  1. अंक 1

    तुमचा आजचा दिवस सामान्य असेल. पैशाच्या बाबतीत तुम्ही खूप भाग्यवान असाल. धनलाभ होण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रात चढ-उतार असतील त्यामुळे तुम्हाला अधिक शिस्तीने काम करावे लागेल. वैवाहिक जीवनासाठी आजचा दिवस चांगला असेल. जोडीदार तुमच्या भावना समजून घेण्यास सक्षम असेल, ज्यामुळे जुने मतभेद कमी होतील. कायद्याच्या विरोधात वागणे तुमच्यासाठी अडचणी निर्माण करू शकते, त्यामुळे सावधगिरी बाळगा. शुभ अंक- 25 शुभ रंग-  हिरवा

  2. अंक- 2

    आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला असेल. कामात यश मिळाल्याने मन प्रसन्न राहाल. कार्यक्षेत्रात तुमची स्थितीही चांगली राहील. कौटुंबिक वातावरणही आनंदी राहील तसेच तुम्ही घरात आणि बाहेर आत्मविश्वासाने पुढे जाल. आरोग्यासंबंधित तक्रारी जाणवू शकतात, आहाराचे पथ्य पाळावे. वैवाहिक जीवनातील परिस्थिती जशी चालू आहे तशीच राहील. मुले त्यांच्या क्षेत्रात प्रगती करतील, यामुळे तुम्हाला समाधान मिळेल. मात्र, प्रेमाच्या बाबतीत प्रकरणे बिघडू शकतात, त्यामुळे मन चिंतीत असेल. शुभ अंक- 9 शुभ रंग- गुलाबी 

  3. अंक- 3

    आज व्यवसायासंबंधित तुम्ही नवीन योजना आखाल. तुमच्या मनात जे विचार आहेत ते पूर्ण करण्याचा प्रयत्न केल्यास यश मिळेल. आवडत्या ठिकाणी फिरायला जाण्याचा बेत आखाल. वैवाहिक जीवनात जोडीदाराला तुमच्याकडून भावनिक साथ अपेक्षित असेल. जोडीदाराकडून शुभ वार्ता मिळेल. प्रेम प्रकरणात पुढे जाणे टाळा कारण यासाठी आजचा दिवस अनुकूल नाही. मुलं अभ्यासात चांगली कामगिरी करतील. तथापि, एखाद्या गोष्टीवरून त्यांचा तुमच्याशी वाद होण्याची शक्यता आहे. संयम दाखवणे हा एक चांगला पर्याय असेल. शुभ अंक- 5 शुभ रंग – निळा

  4. अंक 4

    आजचा दिवस तुमच्यासाठी सामान्य असेल. आरोग्यासंबंधित समस्या उद्भवू शकतात त्यामुळे तुम्ही तणावात राहाल. खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष देणे योग्य ठरेल. खर्च वाढतील, त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती बिघडू शकते, त्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. कुटुंबात समजदारीने वागणे तुमच्यासाठी हिताचे राहील. मुलं त्याचा मुद्दा अतिशयोक्तीने मांडेल, जो कदाचित तुम्हाला आवडणार नाही. तुमची प्रिय व्यक्ती तुमच्यासाठी समर्पणाची भावना ठेवेल आणि तुमच्यावर प्रेमाचा वर्षाव करेल. कामाच्या बाबतीत, कडू बोलणे टाळावे, कारण यामुळे तुमच्या कार्यक्षेत्रात अडचणी येऊ शकतात. शुभ अंक- 9 शुभ रंग- फिकट पिवळा

  5. हे सुद्धा वाचा
  6. अंक- 5

    आजचा दिवस तुमच्यासाठी खूप आरामदायी ठरेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्यांना बढतीचे योग आहेत. सरकारी नोकरीत असाल तर वेळ आणखी चांगला जाईल.  वैवाहिक जीवनात प्रेम वाढेल आणि जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. तुमच्यातील प्रेम वाढेल. प्रेमाच्या बाबतीत तुम्हाला संमिश्र परिणाम मिळतील. तुमच्या प्रिय व्यक्तीची तुमच्यावर चिडचिड होईल, पण प्रेम कायम राहील. शुभ अंक- 11 शुभ रंग – लिंबू

  7. अंक 6

    आजचा दिवस तुमच्यासाठी सामान्य असेल. व्यवसाय क्षेत्रात असणाऱ्यांना यशाची वाट दिसेल, व्यवसायात चांगले दिवस पाहायला मिळतील. कुटुंबात त्रासदायक परिस्थिती उद्भवू शकते आणि कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य तुमच्या चिंतेचे कारण ठरू शकते. मात्र, तुमच्या धैर्याच्या आणि पराक्रमाच्या जोरावर तुम्ही आव्हानांना सामोरे जाल. जोडीदारासोबत मतभेद होतील. जोडीदार तुमच्यावर संशय घेईल मात्र समजदारी दाखविल्यास गैरसमज दूर होतील. शुभ अंक- 42 शुभ रंग- गुलाबी

  8. अंक 7

    आजचा दिवस तुमच्यासाठी काहीसा अनिष्ठ असेल, त्यामुळे कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी तुम्ही थोडा वेळ थांबावे, कारण घाईने घेतलेला निर्णय महागात पडू शकतो. आज तुम्हाला कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा मिळेल, त्यामुळे तुम्ही तुमच्या कामात पुढे जाल. जुन्या मित्राची अचानक भेट होईल किंवा फोन येईल. कमी अंतराच्या प्रवासाला जाण्याची संधी मिळेल. वैवाहिक जीवन सुधारेल आणि जीवनसाथी तुमच्यासाठी समर्पित असेल. प्रेम जीवनात आनंद राहील आणि प्रेम व्यक्त करण्याची संधी मिळेल. कार्यक्षेत्रात तुम्हाला अधिक मेहनत करावी लागेल, तरच तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल. शुभ अंक- 10 शुभ रंग – फिकट निळा

  9. अंक 8

    आजचा दिवस तुमच्यासाठी सामान्य असेल. स्वतःला महान समजण्याची सवय टाळली पाहिजे. सामान्य जीवन जगा आणि लोकांना आधार द्या, यामुळे तुम्हाला यश मिळेल. कार्यक्षेत्रात चांगला काळ जाईल आणि व्यवसायातही यश मिळेल. पैसा मिळण्याचा मार्ग दिसेल. मात्र, खर्चही वाढतील. वैवाहिक जीवन सुरळीत राहील तसेच कौटुंबिक जीवनातही शांती आणि आनंद राहील. तुमचे मन कुटुंबामध्ये अधिक गुंतलेले असेल. मुलं तुम्हाला साथ देतील आणि तुमच्याबद्दल प्रेमाची भावना दर्शवतील. तुमच्या प्रेम जीवनासाठी वेळ चांगला असेल. शुभ अंक-3 शुभ रंग- केशरी 

  10. अंक 9

    आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. तुमच्या मनात अनेक विचारांची घालमेल सुरु आहे, त्यांना योग्य मार्ग द्या. वरिष्ठ कर्मचाऱ्यांसोबतचा वाद तुम्हाला कामाच्या ठिकाणी अडचणीत आणू शकतो. तुमच्या जोडीदाराचे विचार ऐका आणि समजून घ्या. जोडीदाराचे भावनिक पाठबळ मिळेल. प्रेम जीवनात यश मिळेल. आजचा दिवस तुमच्या मुलांसाठी चांगला असेल. शुभ अंक- 2  शुभ रंग- पांढरा 

(वरील माहिती अंकशास्त्राच्या मान्यतेनुसार देण्यात आलेली आहे. अंधश्रद्धा पसरविण्याचा कोणताही हेतू नाही.)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.