अंकशास्त्रानुसार (Numerology 4 june 2022), एखाद्या व्यक्तीचा मूलांक हा त्या व्यक्तीच्या तारखेची बेरीज असतो. उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीचा जन्म 23 एप्रिल रोजी झाला असेल, तर त्याच्या जन्मतारखेच्या अंकांची बेरीज 2+3=5 आहे. म्हणजेच 5 या अंकाला त्या व्यक्तीचे मूलांक म्हटले जाईल. जर एखाद्याची जन्मतारीख दोन अंकी म्हणजेच 11 असेल तर त्याची मूलांकिका 1 + 1 = 2 असेल. तर एकूण जन्मतारीख, जन्म महिना आणि जन्म वर्ष याला भाग्यांक (4 june lucky number) म्हणतात. उदाहरणार्थ, जर एखाद्याचा जन्म 22-04-1996 रोजी झाला असेल तर या सर्व संख्यांच्या बेरजेला भाग्यांक म्हणतात. 2+2+0+4+1+9+9+6=33=6 म्हणजे त्याचा भाग्यांक 6 आहे. अंकशास्त्राच्या मदतीने तुम्ही तुमच्या दैनंदिन योजना यशस्वी करू शकता. अंकशास्त्राच्या आधारे तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही हे दैनिक अंकशास्त्रानुसार तुम्हाला कळू शकेल. आज तुम्हाला कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागू शकतो किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात. दैनिक अंकशास्त्र अंदाज वाचून, तुम्ही दोनीही परिस्थितीसाठी तयार राहाल.
- अंक- 1 नोकरीत आजचा दिवस त्रासाने भरलेला असेल. व्यवसायात फायदा होऊ शकतो. तुम्ही तुमच्या वैयक्तिक कामात व्यस्त असाल. जुन्या आठवणी सोडा आणि जीवनाचा आनंद घ्या. भविष्याचा विचार करून योजना बनवा. शुभ अंक- 25 शुभ रंग – नारिंगी
- अंक- 2 आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र आहे. आर्थिक व्यवहार करताना सावधानता बाळगा. कर्ज देणे टाळा, पैसे अडकण्याची शक्यता आहे. कुठलाही निर्णय विचारपूर्वक घ्या. शुभ अंक- 2 शुभ रंग – भगवा
- अंक- 3 आज तुमचा दिवस कुटुंबियांच्या सहवासात आनंदात जाईल. विद्यार्थी, प्रॉपर्टी, प्रॉपर्टीचे काम करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. वाणीवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे.
शुभ अंक- 6
शुभ रंग – निळा
- अंक- 4 आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. प्रेमात थोडी निराशा होऊ शकते. गोड बोलून परिस्थिती हाताळाल. भागीदारीतून एखादा नवीन व्यवसाय सुरू करता येईल.
शुभ अंक- 11
शुभ रंग- नारिंगी
- अंक-5 आज तुमची प्रकृती थोडी नाजूक असेल. कामाच्या ठिकाणी उत्साह कमी असेल. विचारांचा गोंधळ थांबविण्यासाठी ध्यान करा.
शुभ अंक- 4
शुभ रंग- राखाडी
- अंक- 6 आज घराच्या सजावटीवर खर्च होऊ शकतो. कुटुंबात आनंदाचे वातवरण राहील. जमीन किंवा घरासंबंधी व्यवहार मार्गी लागू शकतो. विवाहयोग्य असल्यास लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो.
चांगली संख्या 9
शुभ रंग – हलका हिरवा
- अंक- 7 आज तुम्ही भूतकाळातल्या आठवणीत रामाला. प्रेम संबंधासाठी काळ अनुकूल आहे. जोडीदारासोबतचे मतभेद दूर होऊ शकतात. मुलांकडून आनंदाची बातमी मिळू शकते.
शुभ अंक- 14
शुभ रंग – गुलाबी
- अंक- 8 प्रगतीसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. गुंतवणुकीचा निर्णय घेण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. राजकीय कार्यात प्रयत्नांमध्ये यश मिळू शकते.
शुभ अंक- 4
शुभ रंग – हिरवा
- अंक-9 आज तुम्ही उत्साही असाल. कार्यालयीन कामात वेळ रमेल. रखडलेली सरकारी कामे आज पूर्ण होतील.
शुभ अंक- 3
शुभ रंग- पांढरा
(वरील माहिती अंकशास्त्राच्या मान्यतेनुसार देण्यात आलेली आहे. याचा अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये.)