Numerology : या मूलांकाच्या सुना कशा निघतात? जाणून घ्या पटापट
मूलांकानुसार अनेक गोष्टी शोधल्या जाऊ शकतात. अशा परिस्थितीत, अंकशास्त्रानुसार, कोणत्या मूलांकातील सुना कशा असतात ते जाणून घेऊया.

कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 आणि 30 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 3 असतो. या राशीचा स्वामी ग्रह गुरू आहे, ज्याला सर्व ग्रहांचा गुरु म्हणतात. या मूलांक क्रमांकाच्या मुलींचं धैर्य, वागणं हे वाखाणण्याजोगं असतं. या तारखांना जन्मलेल्या मुलींची खासियत काय असते ते जाणून घेऊया.
मूलांक क्रमांक 3 असलेल्या मुलींची वागणूक प्रशंसनीय असतात. या तारखेला जन्मलेल्या मुली त्यांच्या वडिलांसाठी भाग्यवान तर असतातच, पण त्या सासरच्या घरालाही स्वर्गाप्रमाणे बनवतात. या मुलींच्या जन्मानंतर घरात संपत्ती आणि सुख-शांतीची कमतरता कधीच ते.
नशीबही चांगलं
कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 आणि 30 तारखेला जन्मलेल्या मुली भाग्यवान असतात. वास्तविक, 3 क्रमांकाचा स्वामी गुरु आहे आणि या प्रभावामुळे त्यांच्या जीवनात खूप आनंद आणि सौभाग्य येते.
वडिलांसाठी ठरतात भाग्यशाली
या मूलांकाच्या मुली वडिलांचं प्रत्येक लहान-मोठं काम हे आपलं मानून करत असतात. कोणत्याही परिस्थितीत आपल्या वडिलांचा सन्मान कमी होऊ देत नाहीत. याशिवाय त्यांच्या घरात संपत्तीची कमतरता जाणवत नाहीत.
पतीसाठीही ठरतात लकी
3 मूलांक असलेल्या मुलींचे वैवाहिक जीवन खूप आनंदी असते. लग्नानंतर या मुली सासरच्या लोकांना आनंदी ठेवतात आणि घराला स्वर्गासारखे सुंदर बनवतात. त्या त्यांच्या वडिलांसाठी जितक्या भाग्यशाली असतात तितक्याच त्या त्यांच्या पतीसाठीही लकी ठरतात.
घरात असतो आनंद
असे मानले जाते की 3 मूलांक असलेल्या मुली जेव्हा घरात पाऊल टाकतात, त्या क्षणीच घरात आनंदाचे वारे वाहू लागतात. त्यांनी एखादी गोष्ट ठरवली की ती पूर्ण करूनच राहतात.
करिअरमध्येही ठरतात यशस्वी
या मूलांकाच्या तरूणींचे व्यक्तीमत्व खूप आकर्षक असतं. त्या करिअरमध्येही प्रचंड यशस्वी ठरतात.
लक्ष्मीची नेहमी असते कृपा
याशिवाय या मुलींवर देवी लक्ष्मीची कृपा नेहमीच असते. यामुळे त्यांच्याकडे संपत्तीची कमतरता जाणवत नाही. परिस्थिती शीही असो, ती बदलण्याची क्षमता देखील त्यांच्याकडे असते.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)