देवापुढे तेलाचा दिवा लावावा की तुपाचा? काय आहे शुभ, तुम्ही तर या चुका करत नाहीत ना?

कार्तिक महिन्यामध्ये दीप प्रज्वलनाचं दीप पुजेचं खास महत्त्व असतं. दिवा लावताना काय काळजी घ्यावी? त्यासाठी कोणत्या प्रकारचं तेल वापरावं. दिव्यासाठी तेलाचा वापर करावा की तुपाचा? याची माहिती आज आपण घेणार आहोत.

देवापुढे तेलाचा दिवा लावावा की तुपाचा? काय आहे शुभ, तुम्ही तर या चुका करत नाहीत ना?
Follow us
| Updated on: Nov 22, 2024 | 8:16 PM

कार्तिक महिन्यामध्ये दीप प्रज्वलनाचं दीप पुजेचं खास महत्त्व असतं. दिवा लावताना काय काळजी घ्यावी? त्यासाठी कोणत्या प्रकारचं तेल वापरावं. दिव्यासाठी तेलाचा वापर करावा की तुपाचा? दीप प्रज्वलन करताना कोणत्या चुका टाळाव्यात ज्यामुळे तुम्हाला तुमचं इच्छित फळ मिळू शकतं याबाबत आज आपण माहिती घेणार आहोत. दिव्याला देवाचं रूप मानलं जातं. घरातील अंधार घालवून घर प्रकाशमान करण्याचं काम दिवा करतो. दीप प्रज्वलनाने तुमच्या घरातील नकारात्मक शक्ती नष्ट होऊन, सकारात्मकता येते. त्यामुळे दीप प्रज्वलन करताना विशेष काळजी घ्यावी.

दिव्याला परात्म्याचे स्वरूप मानलं जातं. त्यामुळे देवपुजेपूर्वी देवाच्या समोर दिवा लावला जातो. हिंदू प्रथा परंपरानुसार कोणत्याही शुभ कामाची सुरुवात ही दीप प्रज्वलनाने होते.ज्या घरात दररोज नित्य नियमाने दीप प्रज्वलन केलं जातं.त्या घरात लक्ष्मी मातेचा वास असतो. सुख समुद्धी येते.नकारात्मक शक्तींचा नाश होऊन सकारात्मकता येते.दीप प्रज्वलनाचे अनेक फायदे सांगितले आहेत. त्यामुळे सकाळी देवपुजेच्या वेळी आणि सांयकाळी घरामध्ये नित्यनियमाने दिवा लावणं हे अत्यंत शुभ आणि पवित्र मानलं जातं.

दिव्यासाठी कोणते तेल वापरावे?

हिंदू प्रथा परंपरानुसार देवपुजेच्यावेळी दिवा लावणं हे अत्यंत शुभ मानलं जातं.दिवा लावण्यासाठी विविध प्रकारच्या तेलाचा वापर होतो.मात्र शास्त्रानुसार दिवा लावण्यासाठी गायीच्या दुधापासून बनवलेलं तूप किंवा तिळापासून बनवलेलं तेल हे अत्यंत चांगले मानले जाते. दिवा लावताना एक वातीचा कधीच उपयोग करू नये, कमीत कमी दोन वाती असाव्यात असं शास्त्र सांगतं. तसेच तुम्ही दिवा लावतान एक काळजी घ्यावी दिवा हा कधीही दक्षिण दिशेकडे तोंड करून लावू नये, वर्षातून फक्त एकदाच यमद्वितेयाला दिवा हा दक्षिण दिशेकडे तोंड करून लावला जातो.

डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Walmik Karad :वाल्मिक कराडची कसून चौकशी अन् CID कडून 14 दिवसांची कोठडी
Walmik Karad :वाल्मिक कराडची कसून चौकशी अन् CID कडून 14 दिवसांची कोठडी.
'...अन् सर्व जेलमध्ये जाणार', संतोष देशमुख हत्येवर जरांगेंचं भाष्य
'...अन् सर्व जेलमध्ये जाणार', संतोष देशमुख हत्येवर जरांगेंचं भाष्य.
'तुम्हारा तो वक्त है, हमारा दौर...', अब्दुल सत्तारांची शेरो शायरी
'तुम्हारा तो वक्त है, हमारा दौर...', अब्दुल सत्तारांची शेरो शायरी.
पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या...
पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या....
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा.
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत.
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?.
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?.
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध.
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'.