Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जेव्हा पांडव आणि महादेव यांच्यात युद्ध झालं, जाणून घ्या नेमकं काय झालं होतं?

महाभारताच्या युद्धाच्या अखेरीस अश्वत्थामाने पांडवांच्या पुत्रांचा (Pandavas Fight With Lord Shiva) वध केला होता.

जेव्हा पांडव आणि महादेव यांच्यात युद्ध झालं, जाणून घ्या नेमकं काय झालं होतं?
Lord Shiva Pandavas
Follow us
| Updated on: Apr 05, 2021 | 9:19 AM

मुंबई : महाभारताच्या युद्धाच्या अखेरीस अश्वत्थामाने पांडवांच्या पुत्रांचा (Pandavas Fight With Lord Shiva) वध केला होता. पण काय तुम्हाला माहिती आहे की पांडव आपल्या मुलांच्या हत्येसाठी भगवान शिवला दोषी मानून त्यांच्याशी युद्ध करु लागले, चला जाणून घेऊ पांडव आणि भगवान शंकराबाबतच्या या कथेबाबत (Pandavas Fight With Lord Shiva After The Mahabharata Know The Katha)-

हा प्रसंग महाभारत युद्धाच्या अखेरच्या दिवसाचा आहे. युद्धाच्या अखेरच्या दिवशी दुर्योधनने अश्वत्थामाला आपल्या सेनेचा सेनापती म्हणून नियुक्त केलं. आपल्या मृत्यूची वाट पाहात असलेल्या दुर्योधनने अश्वत्थामाला म्हटलं, ‘मला कुठल्याही परिस्थितीत पाचही पांडवांचं कापलेलं शीर पाहायचं आहे’.

अश्वत्थामाने रचलं पांडवांच्या मृत्यूचं षड्यंत्र

दुर्योधनला वचन दिल्यानंतर अश्वत्थामा उर्वरित सानिकांसोबत पांडवांच्या मृत्यूचं षड्यंत्र रचू लागला. तिकडे, भगवान कृष्णांना हे माहिती होतं की महाभारताच्या शेवटच्या दिवशी काही ना काही नक्की घडेल. या संकटापासून वाचण्यासाठी श्री कृष्णाने आदि देव भगवान शिवची विशेष स्तुती आरंभ केली. स्तुती करताना श्री कृष्णाने भगवान शिवला सांगितलं की, हे! विश्वाचे पालनकर्ता, भूतांचे स्वामी… मी तुम्हाला प्रणाम करतो. भगवान तुम्ही माझे भक्त पांडवांची रक्षा करा.

श्री कृष्णाची स्तुती ऐकून भगवान शिव नंदीवर सवार होऊन हातात त्रिशूल घेऊन पांडवांच्या रक्षेसाठी आले. सर्व पांडव त्या वेळी शिविराच्या जवळच स्थित नदीत स्नान करत होते. मध्यरात्री अश्वत्थामा, कृतवर्मा आणि कृपाचार्य तिघंही पांडवांच्या शिविराजवळ आले पण बाहेर भगवान शिव यांना पहरा देताना पाहून जरा घाबरले. मग त्यांनी भगवान शिवची स्तुती वंदना आरंभ केली. भगवान शिव हे आपल्या प्रत्येक भक्तावर लवकर प्रसन्न होतात. तेव्हा ते त्या तिघांवरही प्रसन्न झाले.

शंकरजींनी वरदान म्हणून अश्वत्थामाला एक तलवार दिली आणि त्यांना पांडवांच्या शिविरात जाण्याची आज्ञाही दिली. मग अश्वत्थामाने आपल्या दोन्ही साथीदारांसोबत पांडवांच्या शिविरात जाऊन धृष्टद्युम्नसोबत पांडवांच्या पुत्रांचा वध केला. यानंतर ते तिघेही पांडवांचे कापलेले शीर घेऊन परतले. यावेळी शिविरात वाचलेल्या पार्षदशुदने या जनसंहाराची माहिती पांडवांना दिली.

पांडव पुत्रांची हत्या

जेव्हा ही माहिती पांडवांना मिळाली तेव्हा ते शोकाकूल झाले आणि हा विचार करु लागले की स्वत: महादेव असतानाही कुणी शिविरात घुसून आमच्या पुत्रांची हत्या केली? यामध्ये महादेवांचीच चुकी असेल. क्रोधात मर्यादा विसरुन भगवान महादेवाला आव्हान देऊ लागले. भयंकर युद्ध सुरु झालं.

पांडव जेवढे अस्त्र भगवान शिववर चालवत होते ते सर्व भगवान शिवच्या शरीरात सामावून जात होते. कारण, पांडव हे श्री कृष्णाच्या शरणमध्ये होते आणि भगवान शिव हरि भक्तांच्या रक्षेत स्वत: तत्पर राहातो. त्यामुळे शांत स्वरुप शिवने पांडवांना सांगितलं की तुम्ही श्री कृष्णाचे उपासक आहात म्हणून मी तुम्हाला क्षमा करतो, अन्यथा तुम्हा सर्वांचा वध केला असता. माझ्यावर आक्रमण केल्याच्या अपराधाचा फळ स्वरुप तुम्हाला कलियुगात जन्म घेऊन भोगावं लागेल. असं म्हणून भगवान शिव अदृश्य झाले (Pandavas Fight With Lord Shiva After The Mahabharata Know The Katha).

पांडवांनी शंकराकडे क्षमा याचना केली

दु:खी पांडवांनी कृष्णासोबत भगवान शिवजींची स्तुती केली. पांडवांच्या स्तुतीला प्रसन्न होऊन भगवान शिव प्रकट झाले आणि त्यांना वरदान मागायला सांगितलं. तेव्हा पांडवांकडून भगवान कृष्ण महादेवाला म्हाणाले, हे प्रभू! पांडवांनी जी मुर्खता केली होती त्यासाठी ते क्षमाप्रार्थी आहेत. अर्थात् त्यांना क्षमा करा आणि दिलेल्या श्रापातून मुक्त करा. भगवान शिव म्हाणाले, हे कृष्ण! त्यावेळी मी माझ्या मायेच्या प्रभावात होतो म्हणून मी पांडवांना श्राप दिला आणि मी आता दिलेला श्राप परत तर नाही घेऊ शकत पण मुक्तीचा मार्ग नक्की सांगू शकतो.

पांडव आपल्या अंशातून कलियुगात जन्म घेतील आणि आपले पाप भोगून श्रापातून मुक्ती मिळवतील. युधिष्ठिर, वत्सराजचा पुत्र बनून जन्म घेईल. त्याचं नाव बलखानी असेल आणि तो सिरीश नगरचा राजा असेल. भीम वीरानच्या नावाने बनारसमध्ये राज करेल. अर्जुनच्या अंशाने ब्रम्हानंद जन्म घेईल, जो माजा भक्त असेल. नकुलच्या अंशातून जन्म होईल कनेकोचचा, जो रत्ना बानोचा पुत्र असेल. सहदेव, भीमसिंहचा पुत्र देवसिंहच्या रुपात जन्म घेईल. दिलेल्या श्रापातून मुक्ति मिळवण्याचा मार्ग मिळाल्यानंतर पांडवांनी भगवान शिवला हात जोडून प्रणाम केला आणि भगवान शिव अंतर्ध्यान झाले.

Pandavas Fight With Lord Shiva After The Mahabharata Know The Katha

संबंधित बातम्या :

Chanakya Niti | ‘या’ गोष्टी करण्यापासून एखाद्या व्यक्तीने कधीही लाजू नये, अन्यथा नुकसान होणार

Somvati Amavasya 2021 | सोमवती अमावस्या कधी, जाणून घ्या महत्त्व आणि शुभ मुहूर्त…

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.