Pandharpur wari 2022: सायकल वारी करीत पर्यावरण जागृतीचा संदेश

दाभोळ, वारकऱ्यांचा श्वास असलेल्या पंढरीच्या वारीची (Pandharpur wari) महती सांगावी तितकी कमीच आहे. वारी ही बघण्यापेक्षा अनुभवण्याची गोष्ट आहे. पायी जाणाऱ्या वारकऱ्यांप्रमाणेच दापोलीतील सायकप्रेमींनी पुणे-पंढरपूर-पुणे अशी 460 किमीची सायकल वारी (Cycle Wari) पूर्ण केली. यावेळी त्यांनी मार्गावर भेटलेल्या सर्वांना पर्यावरण रक्षण आणि आरोग्यासाठी सायकल चालवण्याचे महत्व पटवून दिले. हा वेगळा आणि खूपच आनंददायी अनुभव असल्याचेही […]

Pandharpur wari 2022: सायकल वारी करीत पर्यावरण जागृतीचा संदेश
Follow us
| Updated on: Jun 25, 2022 | 7:00 AM

दाभोळ, वारकऱ्यांचा श्वास असलेल्या पंढरीच्या वारीची (Pandharpur wari) महती सांगावी तितकी कमीच आहे. वारी ही बघण्यापेक्षा अनुभवण्याची गोष्ट आहे. पायी जाणाऱ्या वारकऱ्यांप्रमाणेच दापोलीतील सायकप्रेमींनी पुणे-पंढरपूर-पुणे अशी 460 किमीची सायकल वारी (Cycle Wari) पूर्ण केली. यावेळी त्यांनी मार्गावर भेटलेल्या सर्वांना पर्यावरण रक्षण आणि आरोग्यासाठी सायकल चालवण्याचे महत्व पटवून दिले. हा वेगळा आणि खूपच आनंददायी अनुभव असल्याचेही या सायकलपटूंनी सांगितले. पंढरपूर वारीत सायकल चालवत पर्यावरण जागृतीचा संदेश त्यांनी यावेळी प्रत्येकापर्यंत पोहोचवला. आळंदी येथून दरवर्षी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका आणि देहू येथून संत तुकारामांच्या पादुका पालखीत (Sant Tukaram Palkhi) ठेवून ती पालखी रथातून पंढरपूर येथे मार्गस्थ होते. या आषाढी वारीमध्ये मोठ्याप्रमाणावर वारकरी समुदाय सहभागी होत असतो. पंढरपूरची ही वारी एक उत्सव असतो.

दापोलीतील सायकलप्रेमींनी 18 व 19 जूनला पुणे-पंढरपूर-पुणे असे तब्बल 460 किमी अंतर सायकल चालवत सायकल वारी पूर्ण केली. इंडो ॲथलेटिक सोसायटीतर्फे पुणे-पंढरपूर-पुणे या मार्गावर सायकलवारी आयोजित करण्यात आली होती. या वारीमध्ये दापोली सायकलिंग क्लबतर्फे 6 जणांची टीम सहभागी झाली होती. पंढरीच्या वारीमध्ये सहभागी व्हावे, अशी अनेक वर्षांपासूनची इच्छा होती; परंतु जास्त दिवस सुट्टी घेता येत नसल्यामुळे आम्ही पुणे-पंढरपूर-पुणे या 460 किमीच्या वारी मार्गावर सायकल चालवत सायकलवारी केली. यामध्ये दोन दिवस आम्ही प्रती दिवस 230 किमी सायकल चालवली. यासाठी आम्ही काही दिवसांपासून सायकल चालवण्याचा सराव करत होतो. वारी मार्गावर ठिकठिकाणी ग्रामस्थांकडून आमचे स्वागत, पाहुणचार, गप्पागोष्टी झाल्या. आम्हीही या सर्वांना पर्यावरण रक्षण आणि आरोग्यासाठी सायकल चालवण्याचे महत्व पटवून दिले, अशी माहिती क्लबच्या प्रमुखांनी दिली.

हे सुद्धा वाचा

मागील दोन दिवस पुण्यात पाहुणचार घेतल्यानंतर आज संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा सासवडच्या दिशेने तर जगद्गुरु तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा उरुळी कांचन कडे मार्गस्थ झाला आहे. यंदा 10 जुलैला आषाढी एकादशी आहे. त्यापूर्वी पंढरपूरात या पालख्या दाखल होणार आहे. दोन वर्षांनंतर पायी वारी होत असल्याने वारकर्‍यांमध्ये प्रचंड उत्साह आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.