Pandharpur wari 2022: बंधू भेट आणि रिंगण सोहळा संपन्न; दोन वर्षांनी अनुभवला नेत्रदीपक सोहळा

वारीच्या वाटेवर चार भावंडांचा पायी पालखी सोहळा निघतो. मात्र यापैकी दोन भावंडे म्हणजेच संत ज्ञानेश्वर महाराज (sat dnyaneshwar maharaj palkhi) आणि संत सोपानकाका यांच्या भेटीचा अनुपम सोहळा पार पडतो (Bandhu bhet sohala). माळशिरस आणि पंढरपूरच्या सीमेवरील हा सोहळा पाहण्यासाठी पंढरीच्या वाटेवरील वारकरी (Pandharpur wari 2022) नजरा लावून बसलेले असतात.  याच वेळेस सोपानकाकाकांचा पालखी सोहळा शेजारून […]

Pandharpur wari 2022: बंधू भेट आणि रिंगण सोहळा संपन्न; दोन वर्षांनी अनुभवला नेत्रदीपक सोहळा
Follow us
| Updated on: Jul 08, 2022 | 3:14 PM

वारीच्या वाटेवर चार भावंडांचा पायी पालखी सोहळा निघतो. मात्र यापैकी दोन भावंडे म्हणजेच संत ज्ञानेश्वर महाराज (sat dnyaneshwar maharaj palkhi) आणि संत सोपानकाका यांच्या भेटीचा अनुपम सोहळा पार पडतो (Bandhu bhet sohala). माळशिरस आणि पंढरपूरच्या सीमेवरील हा सोहळा पाहण्यासाठी पंढरीच्या वाटेवरील वारकरी (Pandharpur wari 2022) नजरा लावून बसलेले असतात.  याच वेळेस सोपानकाकाकांचा पालखी सोहळा शेजारून पुढे जातो. सोपानकाकांचा रथ माउलींच्या रथा शेजारी आल्यावर थोडा वेळ थांबतो यावेळी दोन्ही संस्थानकडून परस्परांना नारळ प्रसाद दिला जातो.  तत्पूर्वी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे ठाकूर बुवा समाधी येथे नेत्रदीपक गोल रिंगण संपन्न झाले. माउलीची पालखी वेळापूर येथून प्रस्थान झाल्यानंतर ठाकूर बुवा समाधी या ठिकाणी पालखी पोहोचली. या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचा माउली माउली, टाळ, मृदंगाचा जयघोष करीत रिंगण सोहळा पार पडला. त्यानंतर पालखी पुढे मार्गस्थ झाली. काही वेळातच माळशिरस तालुक्याच्या हद्दीत सोपानदेव महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज पालखीची भेट झाली.

मंदिर व्यवस्थापनाकडून महापूजेची तयारी संपन्न

आषाढी एकादशीची महापूजा (Pandharpur Mahapuja) संपन्न करण्याचा मान यंदा चार पुजारी मंडळींना मिळाला आहे. या पूजेचं एक वेगळे पण असते. आषाढी एकादशीची महापूजा ही महत्वाची असते. कारण या दिवशी महाराष्ट्रातील कोट्यवधी जनतेचे प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्री ही पूजा करतात. यंदा महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते ही पूजा पार पडणार आहे. याशिवाय वारीमध्ये आलेल्या एका जोडप्याला मुख्यमंत्र्यांसोबत पूजा करण्याचा मान मिळतो. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील संदीप कुलकर्णी, कृष्णा नामदास ,सुनील गुरव, आष्टेकर हे पुजारी ही एकादशीची महापूजा संपन्न करतील. मंदिर व्यवस्थापनाकडून महापूजेची तयारी पुर्ण झाली आहे.

हे सुद्धा वाचा

कशी असणार महापूजा

चार प्रमुख पुजारी पैकी संदीप कुलकर्णी यांच्याकडे प्रमुख म्हणजे मंत्रोच्चार करण्याचे काम असते. यामुळे त्या दिवशी संपूर्ण वातावरण मंगलमय झालेले असते. तर या मंत्रोच्चार प्रमाणे उपचार करण्याची जबाबदारी सुनील गुरव यांच्याकडे असते. देवाला स्नान घालणे गंध लावणे, पोशाख करणे, मुकुट डोक्यावर ठेवणे इत्यादींचा यामध्ये समावेश असतो. महापूजा करते वेळी मंत्रोच्चार करणे जसे महत्वाचे आहे. अगदी त्याच पद्धतीने पंढरपुरात देवा समोर यावेळी अभंग म्हणण्याची परंपरा आहे. यामधून वारकऱ्यांची देवाप्रती असलेली भावना मांडली जाते. ती जबाबदारी केशव नामदास पार पाडतात. अशा मंगलमय वातावरणात ही महापूजा संपन्न होते.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.