Pandharpur Wari: वारकऱ्यांनो चोरांपासून सावध राहा! पंढरपूरच्या वारीत चोरीच्या घटनांमध्ये वाढ

पुणे,  संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्‍वर महाराज यांच्या पालखीमध्ये (Pandharpur wari 2022) गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी वारकऱ्यांच्या मौल्यवान वस्तूंवर हात साफ केल्याच्या घटना समोर येत आहेत (theft incidents in Pandharpur wari). विठुरायाच्या भक्तीमध्ये तल्लीन असलेल्या भक्तांच्या मोबाईल आणि दागिन्यांवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे.  मोबाइलची चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला युनिट 2 च्या पथकाने पाठलाग करून पकडले. […]

Pandharpur Wari: वारकऱ्यांनो चोरांपासून सावध राहा! पंढरपूरच्या वारीत चोरीच्या घटनांमध्ये वाढ
Follow us
| Updated on: Jun 24, 2022 | 12:03 PM

पुणे,  संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्‍वर महाराज यांच्या पालखीमध्ये (Pandharpur wari 2022) गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी वारकऱ्यांच्या मौल्यवान वस्तूंवर हात साफ केल्याच्या घटना समोर येत आहेत (theft incidents in Pandharpur wari). विठुरायाच्या भक्तीमध्ये तल्लीन असलेल्या भक्तांच्या मोबाईल आणि दागिन्यांवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे.  मोबाइलची चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला युनिट 2 च्या पथकाने पाठलाग करून पकडले. प्रेमराज राजेश पट्टपू (शिंदेवस्ती, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्या चौकशीत त्याचा साथीदार दीपक ऊर्फ दिप्या (रा.देहूरोड) याच्या मदतीने साधू वासवानी चौकाजवळ वुडलँड हॉटेल येथे मोबाईल हिसकावल्याचे त्याने सांगितले.

पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे, आरोपीच्या ताब्यातून एक मोबाईल जप्त करण्यात आला आहे. शहरात पोलिसांकडून मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त आहे. पोलिसांना पेट्रोलिंग करत असताना एकजण संशयितरीत्या फिरत असल्याचे आढळले. त्यानंतर चौकशी दरम्यान तो पळून जात असताना त्याला पाठलाग करून पकडले.

हे सुद्धा वाचा

याशिवाय इंदिरानगरमधील दत्त मंदिरासमोर संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखीचे दर्शन घेताना तीन महिलांच्या सोनसाखळ्या गर्दीचा फायदा घेऊन चोरल्याचा प्रकार काल समोर आला. याबाबत एका अनोळखी महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यंदा लाखोंच्या संख्येने वारकरी वारीमध्ये सामील झाले आहेत. गर्दीचा फायदा घेत चोरीच्या घटना घडत असल्याने वारकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.