Papmochani Ekadashi 2021 | जाणून घ्या पापमोचनी एकादशी व्रताचं महत्त्व, शुभ मुहूर्त आणि कथा

वर्षभरातील 24 एकादशी भगवान विष्णू यांना समर्पित असतात (Papmochani Ekadashi 2021). धार्मिक दृष्टीने सर्व एकादशीला मोठं महत्वपूर्ण मानलं जातं.

Papmochani Ekadashi 2021 | जाणून घ्या पापमोचनी एकादशी व्रताचं महत्त्व, शुभ मुहूर्त आणि कथा
Lord-Vishnu
Follow us
| Updated on: Apr 07, 2021 | 8:59 AM

मुंबई : वर्षभरातील 24 एकादशी भगवान विष्णू यांना समर्पित असतात (Papmochani Ekadashi 2021). धार्मिक दृष्टीने सर्व एकादशीला मोठं महत्वपूर्ण मानलं जातं. प्रत्येक एकादशीचा वेगळं नाव आणि महत्त्व असतं. पापमोचनी एकादशी व्रत चैत्राच्या महिन्यात कृष्ण पक्षच्या एकादशीच्या दिवशी ठेवला जातो. पापमोचनी एकादशीला पापांतून मुक्ती प्रदान करणारी वाली एकादशी मानली जाते. यावेळी पापमोचनी एकादशी व्रत आज 7 एप्रिलला ठेवण्यात येईल. जाणून घ्या याबाबतची सर्व माहिती (Papmochani Ekadashi 2021 Know The Vrat Katha Shubh Muhurat And Importance) –

पापमोचनी एकादशी व्रतला पाप हरणारी एकादशी म्हटलं जाते. धार्मिक मान्यतेनुसार, जर व्यक्ती पूर्ण श्रद्धेने आणि भक्तीसह हे व्रत ठेवा आणि पश्चातापाच्या भावननेने भगवानकडे आपल्या पापांच्या समाप्तीसाठी प्रार्थना करा. तसेच, भविष्यात कुठलंही चुकीचं काम न करण्याची भावना ठेवा, तर भगवान त्या व्यक्तीची मनोकामना पूर्ण करतात आणि त्याला पापांतून मुक्तता मिळते. या दिवशी तन-मनाच्या शुद्धतेसोबतच गीतेचं पठन करावं आणि दान-पुण्य करावं.

शुभ मुहूर्त

एकादशी तिथी सुरु : 07 एप्रिल दिवस बुधवार

व्रत पारणाची वेळ : 08 एप्रिलला दुपारी 01 वाजून 39 मिनिटांपासून ते सायंकाळी 04 वाजून 11 मिनिटांपर्यंत

हरि वासरची वेळ : 08 एप्रिलला सकाळी 08 वाजून 40 मिनिटांवर

व्रत विधी

व्रताच्या दिवशी सूर्योदयावेळी उठा आणि स्नान केल्यावर व्रताचा संकल्प करा. यानंतर, गणेशाचे ध्यान करा आणि पूजा यशस्वी होण्यासाठी प्रार्थना करा. यानंतर भगवान विष्णूची मूर्ती स्थापित करा आणि धूप, दीप, चंदन, फुले, फळे, कपडे, भोग आणि दक्षिणा द्या. पापामोचनी व्रताची कथा वाचा आणि नंतर आरती करा. दिवसभर व्रत ठेवा. रात्री जागरण भजन कीर्तन करा. दुसर्‍या दिवशी द्वादशीला गरजूंना जेवण खाऊ घाला आणि दान द्या. मग आपला व्रत सोडा.

पापमोचनी व्रत कथा

एकदा, च्यवन ऋषींचा पुत्र गुणवंत मेधावी ऋषी घोर तपश्चर्येत मग्न होते. त्यांच्या तपश्चर्येमुळे सर्व देवता घाबरले आणि त्यांची तपश्चर्या भंग करण्यासाठी स्वर्गातील अप्सरा मंजुघोषाला पाठविलं. मंजुघोषाने नृत्य, गायन आणि तिच्या सौंदर्याने मेधावी ऋषीची तपश्चर्या भंग केली. यानंतर, मेधावी ऋषी त्या अप्सरेवर मोहित झाले आणि तिच्यासोबतच राहू लागले.

काही काळानंतर मंजुघोषाने स्वर्गात परत जाण्याची परवानगी मागितली. तेव्हा ऋषी मेधावी यांना त्यांची तपस्या भंग झाल्याच कळावं आणि ते संतापले. त्यानी मंजुघोषाला पिशाच होण्याचा श्राप दिला. मंजुघोषाने ऋषी मेधावीची क्षमा मागितली आणि श्रापातून मुक्त होण्यासाठी उपाय विचारला. तेव्हा मेधावी ऋषींनी त्यांना पापमोचनी एकादशी व्रत ठेवण्याचा सल्ला दिला (Papmochani Ekadashi 2021 Know The Vrat Katha Shubh Muhurat And Importance).

यानंतर जेव्हा मेधावी ऋषी आपल्या वडिलांच्या महर्षी च्यवनकडे पोहोचले. तेव्हा महर्षी च्यवन यांनी त्यांना पापमोचनी एकादशी व्रत ठेवण्यास सांगितले. जेणेकरुन ते श्राप देण्याच्या पापापासून मुक्त होऊ शकतील. व्रत ठेवल्यानंतर अप्सरा मंजुघोषा सुद्धा शापमुक्त होऊन आपल्या मूळ स्वरुपात आली. त्याच वेळी, मेधावी ऋषीसुद्धा पापातून मुक्त झाले.

Papmochani Ekadashi 2021 Know The Vrat Katha Shubh Muhurat And Importance

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

कृष्णाच्या यशोदा मातेला विष्णूचं खास वरदान, जाणून घ्या पौराणिक कथा

घरात शनिदेवाची मूर्ती ठेवणे वर्जित का? जाणून घ्या यामागील कारण…

रामायण काळातील वैशिष्ट्यपूर्ण विमानं, अत्याधुनिक तंत्रज्ञानही का पडते फिके?

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.