Parshurama Jayanti 2021 | परशुराम जयंती, जाणून घ्या या दिवसाचं महत्व, शुभ मुहूर्त, पूजा विधी

आजच्याच दिवशी परशुराम जयंती देखील साजरी केली जाते (Parshurama Jayanti 2021). धार्मिक मान्यतेनुसार, परशुराम भगवान विष्णूच्या दहा अवतारांमधील सहावा अवतार होते आणि महर्षी जमदग्नि आणि रेणुका यांचे पुत्र होते.

Parshurama Jayanti 2021 | परशुराम जयंती, जाणून घ्या या दिवसाचं महत्व, शुभ मुहूर्त, पूजा विधी
bhagwan parshuram
Follow us
| Updated on: May 14, 2021 | 10:00 AM

मुंबई : आज अक्षय्य तृतीया आहे. आजच्याच दिवशी परशुराम जयंती देखील साजरी केली जाते (Parshurama Jayanti 2021). धार्मिक मान्यतेनुसार, परशुराम भगवान विष्णूच्या दहा अवतारांमधील सहावा अवतार होते आणि महर्षी जमदग्नि आणि रेणुका यांचे पुत्र होते. मान्यतेनुसार, लोकांना क्षत्रिय धोक्यापासून वाचवण्यासाठी ते पृथ्वीवर आले. परशुराम जयंतीला त्रेतायुगाच्या प्रारंभाचा दिवस देखील मानला जातो. हिंदू दिनदर्शिकेनुसार, परशुराम जयंती वैशाख महिन्यात तृतीयाच्या दिवशी येते, जो शुक्ल पक्षाचा तिसरा दिवस आहे. (Parshurama Jayanti 2021 Know The Shubh Muhurat Importance And Puja Vidhi).

या दिवशी व्रत ठेऊन परशुरामांची पूजा केली जाते. चला जाणून घेऊयात परशुराम जयंतीच्या शुभ मुहूर्त, उपासना करण्याची पद्धत आणि महत्त्व

परशुराम जयंतीचा शुभ मुहूर्त

वैशाख शुक्ल पक्ष तृतीया तिथी प्रारंभ – 14 मे 2021 शुक्रवारी सकाळी 4.08 वाजता

वैशाख शुक्ल पक्ष तृतीया तिथी समाप्ती – 15 मे 2021 शनिवारी सकाळी 6:29 वाजता

परशुराम जयंतीचे महत्त्व

परशुराम नावाचा शाब्दिक अर्थ रामसोबत परशु आहे, जी एक कुऱ्हाड आहे. भगवान परशुराम हे शिवभक्त होते, ज्यांनी क्षत्रियांच्या क्रूरतेपासून पृथ्वीला वाचवण्यासाठी त्यांचं रहस्यमयी शस्त्र परशु दिले. भगवान परशुराम हे भगवान विष्णूचा सहावा अवतार आहे, त्यांनी प्रसेनजितची मुलगी रेणुका आणि भृगु वंशाच्या जमदग्नीचा पाचव्या पुत्राच्या रुपात जन्म घेतला.

लक्ष्मीचा अवतार धनवीशी त्यांनी लग्न केले होते. हिंदू पौराणिक कथेनुसार परशुरामांचा अवतार अमर आहे आणि ते अजूनही पृथ्वीवर राहतात. कल्की पुराणानुसार भगवान विष्णूचा दहावा आणि शेवटचा अवतार कल्की असेल तर भगवान परशुराम श्री कल्कीचे मार्शल गुरु असतील. परशुराम हा एक महान योद्धा मानला जात होते आणि भीष्म, द्रोणाचार्य आणि कर्ण यांचे गुरु होते.

मान्यता आहे की, परशुराम जयंतीच्या दिवशी पूजा केल्यास शुभ परिणाम प्राप्त होतात. या दिवशी दान देण्याचे विशेष महत्त्व आहे. ज्या लोकांना मुले नाहीत त्यांनी विशेष करुन हे उपवास केले पाहिजे. या दिवशी भगवान विष्णूसोबतच भगवान परशुराम यांचाही आशीर्वाद मिळतो.

परशुराम जयंती 2021 : कथा

हेद्य वंशातील हरिवंश पुराणानुसार, महिष्मती नगरचे (सध्या मध्य भारत) राजा कर्तवीर्य अर्जुन आपल्या कार्यात निर्दयी होता. त्यांच्या राज्यात क्षत्रियांच्या वागणुकीमुळे लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. जेव्हा पृथ्वी देवीने भगवान विष्णूला आवाहन केले तेव्हा ते परशुरामच्या रुपात त्यांचे सहावे अवतार म्हणून आले. त्याने क्षत्रियांपासून 21 वेळा पृथ्वीची सुटका केली.

परशुराम जयंतीला पूजा कशी करावी –

– दिवसाच्या सुरुवातीला भाविक सूर्योदयापूर्वी पवित्र स्नान करतात, पारंपारिक कपडे घालतात

– या दिवशी लोक उपवास ठेवतात

– ते प्रामुख्याने दूध, दुधाचे पदार्थ, फळे आणि सात्विक अन्न घेतात

– भाविक भगवान विष्णूचे एक रुप लक्ष्मीनारायणाची पूजा करतात

– पवित्र तुळशीची पाने, चंदन, कुंकू, ताजी फुले भगवान विष्णूला अर्पण केली जातात

– भाविक फळ आणि दुधाचे पदार्थांचं नैवेद्य दाखवतात

– हा उपवास ठेवल्याने संतान प्राप्ती होईल असा भाविकांचा विश्वास आहे

Parshurama Jayanti 2021 Know The Shubh Muhurat Importance And Puja Vidhi

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Parshuram Jayanti 2021 : परशुराम जयंती कधी आहे? शुभ मुहूर्त, महत्त्व, उपासना करण्याची पद्धत जाणून घ्या !

Parshurama Jayanti 2021 | राम ते भगवान परशुराम कसे बनले? जाणून घ्या त्यांच्या जीवनातील काही महत्त्वाच्या गोष्टी

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.