फक्त आध्यात्मिकच नाही तर या शास्त्रीय कारणासाठीही केली जाते पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा
हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार, एखाद्या व्यक्तीचे आरोग्य चांगले नसल्यास, पीपळाच्या झाडाची 108 परिक्रमा करणे फायदेशीर आहे. पिंपळाच्या झाडाला मंत्रोच्चार करत प्रदक्षिणा केल्याने खूप आराम मिळतो.
मुंबई : तुळशी, वडासह अनेक झाडे आणि वनस्पतींची हिंदू धर्मात पूजा केली जाते, पिंपळ वृक्ष देखील त्यापैकी एक आहे. पिंपळाच्या झाडावर (Peempal Tree Upay) लक्ष्मीचा वास असते अशी धार्मिक श्रद्धा आहे. यामुळेच शनिवारी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण केल्याने लक्ष्मी देवीचा आशीर्वाद प्राप्त होते. शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावण्याचेही महत्त्व आहे. मान्यतेनुसार झाडाची पूजा केल्याने जीवनात सुख-समृद्धी येते. पिंपळाच्या झाडाच्या प्रदक्षिणालाही विशेष महत्त्व आहे. पीपळाच्या झाडाची परिक्रमा का केली जाते? त्याचे काय लाभ आहेत ते जाणून घेऊया.
पिंपळाच्या झाडाला धार्मिक महत्त्व तर आहेच, पण वैज्ञानिकदृष्ट्याही हे झाड खूप महत्त्वाचे आहे. पिंपळाचे झाड मानवासाठी आवश्यक असलेला प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजन सोडते. दुसरीकडे, हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार, एखाद्या व्यक्तीचे आरोग्य चांगले नसल्यास, पीपळाच्या झाडाची 108 परिक्रमा करणे फायदेशीर आहे. पिंपळाच्या झाडाला मंत्रोच्चार करत प्रदक्षिणा केल्याने खूप आराम मिळतो. असे म्हटले जाते की ते शरीरातील पित्त आणि वात संतुलित करते.
पिंपळा वृक्षाचे धार्मिक महत्त्व
हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार, पिंपळाच्या झाडावर सर्व देवी-देवतांचे निवासस्थान मानले जाते, ज्यामध्ये शनिदेव देखील प्रमुख आहेत. पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून दिवा लावल्याने शनिदेव प्रसन्न होऊन सुख व सौभाग्य प्रदान करतात. शनिदेव हे क्रोधित देवता मानले जातात. त्यांच्या त्यांच्या वक्र दृष्टीने अनेक कठीण परिस्थितीचा सामना करावा लागतो. पत्रिकेत उपस्थित शनिदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी अमावास्येला आणि शनिवारी पिंपळाच्या झाडाच्या सात परिक्रमा केल्यास लाभ मिळतो. प्रत्येक महिन्यात मोहरीच्या तेलाचा दिवा लावणे देखील शुभ आहे. हा उपाय केल्याने शनिदेवाच्या प्रकोपापासून मुक्ती मिळते.
पिंपळाचे झाड मनःशांती देते
मनःशांतीसाठी पीपळ वृक्ष परिक्रमाही केली जाते. ब्रह्म मुहूर्तामध्ये पिंपळाच्या झाडाची प्रदक्षिणा केल्याने मन शांत राहते, भीती किंवा वाईट विचार मनात येत नाहीत, असा समज आहे. दुसरीकडे पिंपळाच्या झाडाची रोज प्रदक्षिणा केल्यास आर्थिक संकटातून मुक्ती मिळते.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)