Pitru Paksha 2022: या वृक्षांची पूजा केल्याने दूर होतो पितृदोष, प्रत्येकाच्याच घराजवळ असतात ‘हे’ तीन वृक्ष
श्राद्ध पक्षात या विशेष वृक्षांची पूजा केल्याने पितृदोष दूर होण्यास मदत होते आणि संपत्ती तसेच सौभाग्य संबंधी समस्या दूर होतात. चला जाणून घेऊया पितृपक्षात कोणत्या झाडांची पूजा केल्याने पितृदोष दूर होतो.
10 सप्टेंबरपासून पितृ पक्ष सुरू झाला आहे. शास्त्रानुसार पितृपक्षात (Pitru Paksha) श्राद्ध आणि पिंडदान (Pindadan) केल्याने पितरांच्या आत्म्यांना मोक्ष प्राप्त होतो आणि ते आपल्या वंशजांना सुख-समृद्धी देतात. पितृपक्षात दानधर्म, प्राण्यांना अन्नदान, ब्राह्मण भोजन आदी काही कर्मे केल्याने पितरांच्या आत्म्यांना मोक्ष प्राप्त होतो, असेही मानले जाते. याशिवाय काही विशेष झाडे आणि वनस्पतींची पूजा केल्याने पितृदोष असणाऱ्यांना खूप फायदा होतो असेही सांगण्यात आले आहे. श्राद्ध पक्षात या विशेष वृक्षांची पूजा केल्याने पितृदोष दूर होण्यास मदत होते आणि संपत्ती तसेच सौभाग्य संबंधी समस्या दूर होतात. चला जाणून घेऊया पितृपक्षात कोणत्या झाडांची पूजा केल्याने पितृदोष दूर होतो.
पिंपळाचे वृक्ष
हिंदू धर्मात पिंपळाचे झाड सर्वात पवित्र मानले जाते. पौराणिक दृष्टीकोनातून पाहिले तर भगवान विष्णू स्वतः पिंपळाच्या झाडात वास करतात. यामुळेच कोणत्याही धार्मिक विधीमध्ये पिंपळाच्या पानांचा वापर केला जातो. ज्योतिष शास्त्रात असेही सांगण्यात आले आहे की, पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने मनुष्य अनेक प्रकारच्या दोषांपासून मुक्त होतो. पितृदोष हा त्यापैकी प्रमुख आहे. त्यामुळे पितृ पक्षात पिंपळ विशेषत: पारस पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने खूप फायदा होतो. पारस पिंपळ केवळ पितृदोष दूर करण्यासाठी प्रभावी नाही तर ते अनेक प्रकारचे औषधी फायदेही देते. त्यामुळे घरातील बागेत पारस पिंपळाचे रोप लावल्याने आरोग्याशी संबंधित अनेक समस्या दूर होतील.
वडाचे झाड
शास्त्रामध्ये वटवृक्षालाही खूप लाभदायक वृक्ष मानले गेले आहे. मान्यतेनुसार, भगवान शिव या झाडामध्ये वास करतात, त्यामुळे अनेक धार्मिक विधींमध्ये वटपूजेच महत्त्व आहे. पितृपक्षात या झाडाची पूजा केल्याने पितरांच्या आत्म्याला शांती मिळते आणि पितृदोषापासूनही मुक्ती मिळते. श्राद्ध पक्षात काळे तीळ पाण्यात मिसळून वटवृक्षात टाका आणि आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी प्रार्थना करा. या झाडाखाली बसून भगवान शंकराची पूजा केल्याने विशेष फायदा होतो.
बेलाचे झाड
भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी बेल फळ आणि बेलच्या पानांचा रस वापरला जातो. पितृ पक्षाच्या काळात या झाडाची पूजा केल्यास पितृदोषापासून मुक्ती मिळते. अकाली मरण पावलेल्या पितरांना शांती मिळते, असा समज आहे. धार्मिक मान्यतेनुसार भगवान शंकर आणि माता लक्ष्मी स्वतः बेलाच्या झाडावर वास करतात. त्यामुळे या झाडाचे महत्त्व अधिकच वाढते. घराच्या बागेत बेलचे रोप लावल्याने पूर्वज प्रसन्न होतात आणि त्यांना सुख-समृद्धीचा आशीर्वाद देतात.
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)